Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मी सूचना फलक बोलतोय - सुचना फलकाची आत्मकथा मराठी निबंध - Mi Suchna Falak Boltoy - Suchna Falakachi Aatmkatha Marathi Nibandh - Autobiography Of Notice Board Essay In Marathi - आत्मवृत्त.

मी सूचना फलक बोलतोय | सुचना फलकाची आत्मकथा मराठी निबंध | Mi Suchna Falak Boltoy | Suchna Falakachi Aatmkatha Marathi Nibandh | Autobiography Of Notice Board Essay In Marathi |

            

                       
मी सूचना फलक बोलतोय - सुचना फलकाची आत्मकथा मराठी निबंध - Mi Suchna Falak Boltoy - Suchna Falakachi Aatmkatha Marathi Nibandh
मी सूचना फलक बोलतोय - सुचना फलकाची आत्मकथा मराठी निबंध




मित्रमैत्रिणींनो, आज आपण सुचना फलकाचे आत्मवृत्त किंवा सूचना फलकाचे मनोगत हा निबंध बघणार आहोत.

आज श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार असल्यामुळे आमची शाळा लवकर सोडण्यात आली होती. जाता जाता वर्गशिक्षिकानी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिली की शाळेबाहेरील सूचना फलक वाचून मग घरी जा.

मी ही घरी जाताना सूचना फालकाजवळ जाऊन उभा राहिलो आणि त्यावर लिहिलेली सूचना वाचू लागलो. त्यावर आमच्या सहामाही परीक्षेचे दिनांक आणि वेळ दिलेली होती ती मी लिहून घेतच होतो इतक्यात आवाज आला, " कसा आहेस मित्रा? " मी दचकून आजूबाजूला पाहू लागलो तर तिथे कोण्ही नव्हते. तेव्हा पुन्हा आवाज आला, अरे मी बोलतोय मित्रा. मी सूचना फलक बोलतोय! आज मी तुझ्याकडे थोडे बोलणार आहे असे म्हणून तो बोलू लागला.

मी तुझ्या शाळेबाहेरील सूचना फलक बोलतोय. मी तुला आणि तुझ्या इतर छोट्या मित्रांना नेहमी शाळेत येता जाता बघत असतो. तू माझ्याकडे कधी नीटसे लक्ष दिले नसशील कदाचित पण मला अजून आठवतोय तुझा शाळेचा पहिला दिवस. किती घाबरला होतास तू. आईचा हात अगदी घट्ट पकडून ठेवला होतास तू. तेव्हापासून मी तुम्हा सर्वाना पाहतोय.

मी सूचना फलक आहे. मी तुम्हा सर्व मुलांना वेळोवेळी शाळेत होणाऱ्या विविध प्रकारचे कार्यक्रमांची माहिती देतो, शाळेतील विविध स्पर्धापरिक्षांची माहिती देत असतो. सुचना फलक म्हणून मी नेहमीच तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टीची आठवण करून देत असतो.

सूचना फालकावरच तुमची शाळा कधी एखाद्या दिवशी लवकर भरणार असेल किंवा लवकर सुटणार असेल, कधी तुम्हाला शाळेला सुट्टी दिली असेल तर ते ही लिहिले जाते. पावसाळ्याच्या ऋतू मध्ये कधी अचानक मोठा पाऊस झाला तर मी सूचना फलकच तुम्हाला ही सूचना देतो की शाळा बंद आहे.

तुम्ही मुले आपल्या शाळेतर्फे जेव्हा एखाद्या दुसऱ्या शाळेत किंवा संस्थेत गायन, नृत्य, वक्तृत्व किंवा चित्रकला स्पर्धेसाठी जाता आणि पारितोषिके घेऊन येता तेव्हा मी सुचना फलकच खूप आनंदाने बाकीच्या शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी देतो.

शाळेतील कित्येक विद्यार्थी आपल्या वस्तू शाळेतच विसरून जातात आणि मग सकाळच्या साफ सफाई कामामध्ये शाळेच्या शिपाई काकांना त्या मिळतात तेव्हा मीच सूचना फलक प्रत्येक शनिवारी त्या वस्तूंची यादी तुम्हाला जाहीर करतो जेणेकरून तुम्ही मुले आपापल्या वस्तू परत घरी नेऊ शकाल.

अरे मित्रा, तुला माहिती आहे का की जसा मी हा शाळेचा सूचना फलक आहे तसेच माझे अजूनही सुचना फलक मित्र आहेत. तुला माहिती आहेत का ते कोण आहेत? नाही ना? मग आज तुला त्यांच्याबद्दल ही थोडी माहिती देतो.

जसे मी आहे शाळेतील सूचना फलक तसाच माझा एक मित्र आहे तो आहे महामार्गवरील सूचना फलक. महामार्गांवरील सूचना फलक किंवा घाटातील रस्त्यातील सूचना फलक ह्यांचे काम ही खुप महत्वाचे असते. महामार्गवरील सूचना फलक हा तेथील येणाजणाऱ्या वाहनांना पुढे असणाऱ्या संभाव्य धोक्याची जाणीव करून देत असतात. हे सूचना फलक रस्त्यांच्या दिशा सर्वाना सांगतात. हे घाटावरील नागमोडी रस्त्यांवरील सूचना फलक घाटातून वाहने सावकाश चालवा हे वेळोवेळी तुमचा निर्देशित करीत असतात. जेणेकरून रस्त्यात कोणताही अपघात न होता तुमचा व इतरांचा ही जीव वाचू शकेल.

यासारखा माझा दुसरा एक मित्र आहे तो म्हणजेच तुम्ही राहता त्या सोसायटीमधील सूचना फलक. सोसायटीमधील सूचना फलकाचे कामही खुप महत्वाचे आहे कारण सोसायटीमधील काही अडचणी व महत्वाच्या नोटीस या सोसायटीमधील सूचना फलकावरच लिहिल्या जातात जसे पाणी कपात असेल किंवा एखादा कार्यक्रम सोसायटीमध्ये आयोजित केले गेला असेल तर याच सुचना फालकाद्वारे सर्वाना कळविण्यात येते.

अजूनही माझे काही सुंचना फलक मित्र आहेत जसे की क्रिडांगणावरील सूचना फलक, हॉस्पिटल बाहेरील सूचना फलक किंवा गावाच्या वेशीवरही सूचना फलक दिसण्यात येतात.

आम्हा सर्व सूचना फलकांचे काम एकच असते की तुम्हा सर्वाना वेळोवेळी महत्वाच्या बातम्या आणि पुढे असणारे कार्यक्रम याची सुचना देणे. आणि हे काम आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने अगदी चोखपणे करण्याचा प्रयत्न करीत असतो.

मी जरीं तुला या शाळेचा फक्त एक सूचना फलक वाटत असलो तरी मी या शाळेतील होणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे. गेली कित्येक वर्षे या शाळेत होणारे निरनिरळे कार्यक्रम, पारितोषिके, अनेक प्रकरच्या आनंदाच्या त्याचबरोबर मुलांना चांगली शिस्त लागावी म्हणून मुख्याध्यापकांनी दिलेल्या कडक शब्दांतील सूचना याच सूचना फलकावर मी तुम्हाला कळविल्या आहेत.

ही शाळा जशी तुम्हाला तुमची आपली वाटते तशी ती मला ही माझी तितकीच जवळची आहे. ज्या वेळी शाळेतील शिपाई काका नवीन सूचना घेऊन सूचना फलकावर लावण्यासाठी आणतात तेव्हा मला अत्यानंद होतो कारण मला माहित असते की आता तुम्ही सगळे छोटे दोस्त मला भेटायला येणार. माझ्या आसपासचा परिसर गजबजून जाणार. 

कारण जेव्हा तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात तेव्हा इथे एक भयाण शांतता असते. मी सुचना फलक संपूर्ण महिना तुम्हा मुलांची वाट बघत बसतो की शाळा पुन्हा कधी सुरु होईल? तुम्ही सर्व मुले वेगवेगळ्या सूचना वाचण्याच्या निम्मिताने मला भेटायला यात जाल.

तेव्हा मित्रा, मी तुझ्या शाळेतील सूचना फलक म्हणून तुझ्याकडून एवढीच अपेक्षा ठेवतो की मी ज्या सूचना तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना देतो किंवा सांगतो त्यांचे तुम्ही नियमित पालन करा किंवा त्या सूचना लक्षात ठेऊन कृती करा कारण मी सदैव तुमच्या मदतीसाठीच आहे म्हणून दिवसातून एकदा तरी मला भेट द्यायला येत जा आणि नवनवीन सूचनांवर लक्ष ठेवा त्या नियमितपणे वाचत जा. मी सूचना फलक तुम्हाला अशीच मदत करण्याचे काम करत राहीन व तुम्हा सर्वांचा कायम मित्रच राहीन.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close