मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द | Marathi Shabd Samuhabaddal Ek Shabd | A Word About A Phrase In Marathi |
मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द - Marathi Shabd Samuhabaddal Ek Shabd. |
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
• खूप दानधर्म करणारा - दानशूर
• झाडाला फुटलेली नवीन कोवळी पाने - पालवी
• जीवाला जीव देणारा - जिवलग
• तीन रस्ते एकवटतात ती जागा - तिठा
• पायाच्या नखपासून शेंडीपर्यंत - नखशिखांत
• ढग नसलेले आकाश - नीरभ्र
• स्वार्थाचा विचार न करणारा - निस्वार्थी
• झाडांची पाने गाळून पडणे - पानझड
• पंधरा दिवसांचा समूह - पंधरावडा
• पाहण्यास योग्य असे - प्रेक्षणीय
• न मोडली जाणारी कठोर प्रतिज्ञा - भीष्मप्रतिज्ञा
• काहीही न बोलण्याचा नियम - मौनव्रत
• जंगलात राहणारे - वन्यप्राणी
• व्यवसाय करणारा - व्यावसायिक
• वाचनास योग्य असे - वाचनीय
• दगडावर कोरलेले लेख - शिलालेख
• समाजाची सेवा करणारा - समाजसेवक
• स्वतःशीच केलेले भाष्य - स्वगत
• जमखर्चाची केलेली नोंद - हिशोबस
• हृदयाला भिडणारे - हृदयस्पर्शी
• आकार देण्यासाठी लोखंड गरम करण्याची जागा - झोतभट्टी
• ध्यान लावून बसलेले - ध्यानस्थ
• समाजात नाव व प्रतिष्ठा प्राप्त झालेला - नामांकित
• कुणाचाही आधार नसलेला - निराधार
• सतत चालत गेल्यामुळे तयार झालेली वाट - पायवाट
• पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक
• अचूक गुणकारी असणारे - रामबाण
• जंगलाचे रक्षण करणारा - वनरक्षक
• ज्याची पत्नी मरण पावली आहे असा - विधूर
• समाजाची सेवा करणारा - समाजसेवक
• दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा - संगम
• जमखर्चाची केली नोंद - हिशोब
• पावसाचे पाणी पिऊन जगणारा पक्षी - चातक
• स्वतःच्या फायद्याचे पाहणारा - अप्पलपोटी
• मागहून जन्मलेला - अनुज
• वर्णन न करता येण्यासारखे - अवर्णनीयस
• देव मानणारा - आस्तिक
• देव न मानणारा - नास्तिक
• श्रम न करता खाणारा - ऐतखावू
• बांगड्या भरणारा - कासार
• कपड्यामध्ये एकत्र बांधून ठेवलेल्या वस्तू - गाठोडे
• धान्य ठेवण्यासाठी बंदिस्त जागा - गोदाम
• चंद्रकिरणे पिऊन जगणारा काल्पनिक पक्षी - चकोर
• जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी - जिल्हाधिकारी
• सोने बनविणारा - सोनार
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.