मराठी संवाद लेखन | शैक्षणिक सहलीवर दोन मित्रांमधील संवाद | Shaikshanik Sahalivar Don Mitramadhil Sanvad | Sanvad Lekhan In Marathi |
![]() |
मराठी संवाद लेखन - शैक्षणिक सहलीवर दोन मित्रांमधील संवाद - Shaikshanik Sahalivar Don Mitramadhil Sanvad - Sanvad Lekhan In Marathi. |
शैक्षणिक सहलीवर दोन मित्रांमधील संवाद लिहा.
राम - श्याम, अरे श्याम कुठे आहेस?
श्याम - काय झाले रे राम? का हाका मारत आहेस?
राम - अरे! आज आपल्या शाळेच्या सूचनाफलकावर जी सूचना लिहिली आहे ती तू वाचलीस का?
श्याम - नाही रे राम! नाही वाचली. मी आत्ताच शाळेत आलो आहे.
राम - अरे मग जा आणि लवकर वाच. तुला माहित आहे का की दोन दिवसानंतर आपल्या शाळेची शैक्षणिक सहल जात आहे.
श्याम : अरे वा फारच छान. पण कुठे जात आहे रे ही शैक्षणिक सहल?
राम : अरे आपल्या शाळेची शैक्षणिक सहल नेहरू सायन्स सेंटर येथे जात आहे.
श्याम : काय? नेहरू सायन्स सेंटर?
राम : हो हो तिथेच.
श्याम : म्हणजे परवाच आपल्याला सरांनी ज्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली होती तेथेच ना? तेथे म्हणे निरनिराळ्या प्रकारचे सायन्सचे प्रोजेक्ट आहेत.
राम : अरे हो तेच. आपल्याला सर जे सांगत होते तेच आपल्याला आता प्रत्यक्षपणे बघायला मिळणार आहे.
श्याम : वा फारच छान! म्हणजे मग आपल्याला आता सायन्सचे वेगवेगळे नमुने व सायन्स वापर करून बनवलेल्या निरनिराळ्या कलाकृतींचे विविध प्रकारचे खेळ आणि प्रयोग प्रत्यक्षात पाहायला मिळणार. वाह वाह! मग तर फारच मज्जा येणार. आणि तेथून बरेच काही नवीन शिकायला ही मिळणार.
राम : हो ना. जेव्हापासून मी ती सूचना वाचली आहे तेव्हापासून मी पण त्या शैक्षणिक सहलीला जाण्यासाठी खूपच आतुर आहे.
श्याम : पण केव्हा जायचं आहे?
राम : मला वाटतं दोन दिवसांनी म्हणजेच परवा जायचे आहे. तू ही येणार आहेस ना?
श्याम : म्हणजे काय मी नक्की येणार. मला तर फारच आनंद झाला आहे काहीतरी नवीन नक्की शिकायला मिळेल.
राम : हो हो! आपण सर्वांनी नक्की या शैक्षणिक सहलीचा उपयोग करून घेऊ. जेणेकरून पुढील अभ्यासात आपल्याला ते उपयोगी पडेल.
श्याम : हो तुझे म्हणणे बरोबर आहे. आपल्या शिक्षकांनी आपला फायदा व्हावा यासाठी ही शैक्षणिक सहल आयोजित केली आहे तेव्हा आता आपण सर्वांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायलाच हवा.
राम : नक्कीच! आणि आपल्या सर्व विद्यार्थांसाठी उपयुक्त अशी ही शैक्षणिक सहल आयोजित केल्याबद्दल आपण आपल्या शाळेचे आणि आपल्या शिक्षकांचे मनापासून आभार ही मानलेच पाहिजे.
श्याम : नक्कीच. चल तर मग. आपण आपल्या शिक्षकांचे याबद्दल आभार मानून येऊ.
आमचे हे संवाद लेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.