Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी माहिती - मराठी कवियित्री माहिती - Marathi Kaviyitri Mahiti - Information About Marathi Poetess In Marathi.

मराठी माहिती | मराठी कवियित्री माहिती | Marathi Kaviyitri Mahiti | Information About Marathi Poetess In Marathi |





         
मराठी माहिती - मराठी कवियित्री माहिती - Marathi Kaviyitri Mahiti - Information About Marathi Poetess In Marathi.
मराठी माहिती - मराठी कवियित्री माहिती - Marathi Kaviyitri Mahiti - Information About Marathi Poetess In Marathi.





मित्र-मैत्रिणींनो आज आपण मराठी कवियित्रींविषयी माहिती बघणार आहोत.


1. बहिणाबाई - बहिणाबाई यांचे संपूर्ण नाव बहिणाबाई नथुजी चौधरी असे आहे. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1880 साली महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असोदा या गावी  झाला झाला. त्यांच्या जन्माच्या दिवशी नागपंचमीचा दिवस होता. बहिणाबाई यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन व आईचे नाव भिमाजी उखाजी महाजन असे होते. त्यांना तीन भाऊ व तीन बहिणी होत्या. त्यांच्या भावाचे नाव अनुक्रमे घमा, गना आणि घना व बहिणींची नावे अनुक्रमे अहिल्या सीता आणि तुळसा अशी होती.

बहिणाबाई यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथूजी चौधरी यांच्याशी झाला. नथुजी चौधरी आणि बहिणाबाई यांना तीन अपत्य झाली त्यांची नावे ओंकार, सोपान आणि काशी अशी होती.

बहिणाबाईंकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती परंतु बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते म्हणजेच त्या निरक्षर होत्या. त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कोणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात आता नष्ट झाल्या आहेत. बहिणाबाईंना कविता करण्याची खूप आवड असल्यामुळे शेतकाम आणि घरकाम करता करता त्या ओव्या व कविता रचून गात असत. त्यांच्या कविता लेवा गण बोली म्हणजेच खानदेशी भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणाऱ्या असायच्या.

वयाच्या तेराव्या वर्षी विवाह झालेल्या बहिणाबाईंना वयाच्या तिसाव्या वर्षी वैधव्य आले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र असून बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या चीज वस्तू पाहताना सोपान देवांच्या हाती बहिणाबाईंनी रचलेल्या कवितांचे व गाण्यांचे श्री पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेले ते हस्तलिखित लागले व त्यानंतर कवी सोपानदेव चौधरी यांनी आचार्य अत्रे यांना ते दाखविले असता आचार्य अत्रे उद्गारले, "आहो हे तर बावनकशी सोने आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे." असे म्हणून त्या कविता प्रकाशित करण्यात अत्र्यांनी पुढाकार घेतला. बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे हे विशेष कारणीभूत ठरले.

बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या  रचलेला आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, शेतीतील साधने, कापणी, मळणी इत्यादी कृषी जीवनातील विविध प्रसंग, अक्षय तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे काही परिचित व्यक्ती असे आहेत.

जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आलेले आहे त्याला "बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट" असे नाव देण्यात आले आहे. बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारे भांडी पूजेचे साहित्य स्वयंपाकातील वस्तू या सर्व साहित्याची जपणूक आजही तेथे करून ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच त्यांचा हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता यावा म्हणूनच अशी तरतूद करण्यात आलेली आहे.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट मध्ये त्यांच्या अनेक वस्तूंचे जतन करण्यात आलेले असून कष्टकरी महिलांच्या आठवणींचा व श्रमाचा हा ठेवा बनवण्यात आलेला आहे. बहिणाबाईंचे हे संग्रहालय फारच विलोभनीय आणि बघण्यासारखे आहे.

'अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके- तेव्हा मिळते भाकर' व 'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' या त्यांच्या काही विशेष काव्यरचना आहेत. बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात विशेष समावेश केलेला असतो. बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद 'फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ' या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झालेला आहे. यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.

बहिणाबाईंची गाणी - संपादक लक्ष्मीनारायण बोल्ली, बहिणाबाईंची कहाणी आणि गाणी संपादक डॉक्टर श्रावण चौधरी, बहिणाबाई चौधरी व्यक्तित्व आणि कवित्व डॉक्टर काशिनाथ विनायक बहर्टे, बहिणाबाईंची गाणी मोडी आणि मराठी डॉक्टर उज्वला भिरूड, लेवा गणबोली: एक वास्तव डॉक्टर अरविंद कृष्णा नारखेडे ही बहिणाबाईंवर व त्यांच्या कवितांवरील काही पुस्तके आहेत.

बहिणाबाई या कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती. त्यांचे तत्वज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्वज्ञान आहे.

बहिणाबाई चौधरींच्या नावावरूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव "कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" असे ठेवण्यात आलेले आहे.

३ डिसेंबर १९५१ रोजी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात बहिणाबाईंचा मृत्यू झाला. दूरदर्शनने काही वर्षांपूर्वी बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात नायिका भक्ती बर्वे यांनी बहिणाबाईची भूमिका निभावली होती. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित 'बहिणाई' नावाच्या लघुपटाची निर्मिती केली होती.





2. शांता शेळके - शांता शेळके या एक मराठी कवियित्री होत्या. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जनार्दन शेळके असे होते. त्यांच्या शाळेचे नाव पुण्यातील हुजूरपागा शाळा असे असून त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण स. प. महाविद्यालय येथे झाले.

शांता शेळके या कवीयित्री तर होत्याच याशिवाय त्या एक प्राध्यापिका संगीतकार लेखिका अनुवादक बालसाहित्य लेखिका साहित्यिक व पत्रकारही होत्या. त्यांनी मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद विद्यालयामध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले.

अनुवादक समीक्षा स्तंभलेखिका वृत्तपत्र सहसंपादिका पडूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. त्याचबरोबर त्या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्या ही होत्या. १९९६ या वर्षी आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

शांता शेळके यांची अनेक प्रकारचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. अंगत पंगत, अनोळक, अलौकिक, आतला आनंद, आंधळी, आंधळ्याचे डोळे,इतार्थ, एक गाणे चुलीचे, कविता विसावया शतकाची, कविता स्मरणातल्या, कळ्यांचे दिवस फुलांच्या राती, काही जवळ काही दूर, किनारे मनाचे, गोंधण, चौघीजणी, जन्म जान्हवी,जाणता अजाणता, तोच चंद्रमा, धूळपाटी, नक्षत्र चित्रे, निवडक शांता शेळके ही काही साहित्यांची नावे आहेत.

त्याचबरोबर त्यांची काही गीतेही प्रसिद्ध आहेत. जसे वादळ वारं सुटलं गो, शालू हिरवा पाच नी, मनाच्या धुंदीत लहरीत, माझ्या सारंगा राजा, काय बाई सांगू, दाटूनी कंठ येतो, खोडी माझी काढाल तर, हे बंध रेशमाचे, पप्पा सांगा कोणाचे ही गीते आहेत.

कवियित्री शांता शेळके यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातील काही पुढील प्रमाणे आहेत:-

•  गदिमा गीतलेखन पुरस्कार 1996

• सुर सिंगार पुरस्कार (मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ) या गीतासाठी.

•  केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)

•  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (2001) साहित्यातील योगदानाबद्दल.


कवियित्री शांता शेळके यांच्यावर लिहिलेली काही पुस्तके पुढील प्रमाणे आहेत:-

•  आठवणीतील शांताबाई संपादक शिल्पा सरपोतदार.

•  शांताबाई (अनिल बळेल.)

• शांताबाईंची स्मृती चित्रे ( संपादक यशवंत किल्लेदार.)

• शब्दव्रती शांताबाई ( लेखिका नीला उपाध्ये)

शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली आहेत. ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे पुणे येथे निधन झाले.




3. डॉक्टर अरुणा ढेरे - डॉक्टर अरुणा ढेरे या मराठी भाषेतील लेखिका व कवयित्री असून त्यांचा जन्म इसवी सन 1957 रोजी पुणे येथे झाला आहे. त्यांचे वडील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रा.चिं. ढेरे हे आहेत.

अरुणा ढेरे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा येथील नूतन मराठी विद्यालय येथे झालेले असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण गरवारे महाविद्यालय आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे येथे झालेले आहे. त्यांना 1977 साली पुणे विद्यापीठात बी ए च्या परीक्षेत सर्वप्रथम सुवर्णपदक आणि 11 अन्य पारितोषिके प्राप्त करून झालेली आहेत.

डॉक्टर अरुणा ढेरे या कवयित्री असल्या सोबतच त्यांनी कथा,कादंबरी,ललित लेख, अनुवाद समीक्षा, लोकसाहित्य विषयक सामाजिक इतिहास पर किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व प्रकार हाताळलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि साहित्य विषयक समित्यांमध्ये डॉक्टर अरुणा ढेरे यांनी सदस्या म्हणून आपला सहभाग नोंदविलेला आहे.

मराठी भाषा आणि या भाषेतील उत्तम साहित्य समाजापुढे येण्यासाठी डॉक्टर अरुणा ढेरे या सतत कार्यरत असतात. काळोख आणि पाणी (1991), काळोखाचे कवडसे (1987) ही त्यांची काही समीक्षात्मक लेखने आहेत. त्याचप्रमाणे अंधारातील दिवे, अर्ध्या वाटेवर, उंच वाढलेल्या गवताखाली, उमदा लेखक उमदा माणूस, उर्वशी, कवितेच्या वाटेवर, कवितेच्या शोधात, जाणिवा जाग्या होताना अशी अशी अनेक वैचारिक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. त्याचबरोबर अज्ञात झाल्यावर रात्री, काळोखाने पाणी कृष्ण किनारा नागमंडल प्रेमातून प्रेमाकडे भगव्या वाटा मन केले ग्वाही मनातला आभाळ मैत्रेय रूपोत्सव लावण्या यात्रा वेगळी माती वेगळा वास हे हे त्यांचे कथासंग्रह आहेत.

डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या काही कवितासंग्रह पुढील प्रमाणे आहेत. जावे जन्माकडे निरंजन प्रारंभ मंत्राक्षर यक्ष रात्र निळ्या पारदर्शक अंधारात.

कवियित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांना मिळालेले काही पुरस्कार सन्मान आणि पदे पुढील प्रमाणे आहेत-

•  2019 साली यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

•  डॉक्टर अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉक्टर लाभ सेटवर प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा साहित्य सन्मान.

•  लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार.

•  सोलापूरचा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार.

•  म.सा.प. चा 2017 सालचा ग्रंथ पुरस्कार 'स्त्री लिखित मराठी कविता' या पुस्तकाला मिळाला आहे.

•  मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त मृत्युंजय प्रतिष्ठान तर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार. (2017)


स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेष कारकीर्द घडविलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केलेले आहे. त्यांचा  'विस्मृतीचित्रे' हा ग्रंथ अतिशय गाजला. 1989 ते 1991 या काळात राज्य शिक्षण शास्त्र संस्थेत साहित्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आणि 'पसाय' या मासिकाची संपादिका म्हणून डॉक्टर अरुणा ढेरे यांनी काम केलेले आहे त्यानंतर त्या पूर्णवेळ लेखन व संशोधन कार्य करीत आहेत. 



आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close