Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी | मागणी पत्र | शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र | Marathi Patralekhan | Magni Patra | Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra | Letter Writing In Marathi.



      
पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र
 शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र 



शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र लिहा.



दिनांक :


प्रति,
माननीय व्यवस्थापक,
सदाहरित ट्रस्ट,
राम मंदिर मार्ग,
नाशिक -××××××××


विषय - शाखेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.


महोदय,

मी अ.ब.क., बालमंदिर विद्यालय, नाशिक या विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आमच्या माननीय मुख्याधिपिकांच्या संमतीने आपणास हे पत्र लिहित आहे.


या वर्षी आमच्या शाळेला २५ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला असून त्याचे औचित्य साधून आम्ही आमच्या शाळेच्या मैदानात रोपे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व ही लक्षात येण्यास मदत होईल.


त्यामुळे आपल्याकडे या रोपांच्या लागवडीसाठी आम्हाला खालील रोपांची मागणी करावायची आहे.


रोपांची यादी :

क्र.        रोपे           नग / संख्या
1.        गुलाब          १०
2.        मोगरा          १०
3.        झेंडू             १०
4.        तुळस             ५
5.        चाफा              ५


कृपया रोपांचे बिल किती झाले ते ही कळवावे व वरील यादीतील रोपे लवकरात लवकर पाठविण्यात यावी ही विनंती. 



कळावे,
आपला विश्वासू,
अ. ब. क.
विदयार्थी प्रतिनिधी,
बालमंदिर विद्यालय,
आगरकर मार्ग,
नाशिक- ×××××××
Email-××××××××




( टीप - वरील पत्र हे ई -पत्रलेखनाचा नमुना आहे त्यामुळे शेवटी विद्यार्थ्यांनी एक नमुना ई-मेल टाकावे.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close