Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती | महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती | Information About Saints In Maharashtra In Marathi |




         
संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi
संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती.

               


आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अलौकिक अश्या संतांची परंपरा लाभलेली आहे. अश्या या आपल्या थोर संतांनी जनतेला त्यांच्या संतवाणीतून वेळोवेळी जीवन जगण्याचे मार्गसांगितले आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या या अत्यंत महत्वाच्या अश्या व्यक्तीबद्दल व त्याच्या जीवनकार्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. आज आपण महाराष्ट्रातील संतांनी माहिती व त्यांची कार्यें मराठीतून बघणार आहोत.


संत ज्ञानेश्वर -

संत ज्ञानेश्वर हे इ. स.१३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत व कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म आपेगाव येथे झाला. आपेगाव हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. संत ज्ञानेश्वरांना इतरही भावंडे होती. त्यातील त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ व इतर लहान भावडांची नावे संत सोपानदेव व बहीण संत मुक्ताबाई अशी होती.

संत ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, तत्वज्ञ व योगी होते. प्रसिद्ध अशी 'ज्ञानेश्वरी' (भावार्थदीपिका ), अमृतानुभव व हरिपाठाचे अभंग या त्यांच्या प्रसिद्ध काव्यरचना आहेत.
संत ज्ञानेश्वर हे आपले गुरु संत निवृत्तीनाथांना मानत असत. " जो जे वांचिल तो ते लाहो! " असे म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना संपूर्ण वारकरी संप्रदायासह सर्व भक्त प्रेमाने " माऊली " म्हणतात.

प्रसिद्ध अशी " भगवतगीता " मराठीतून लिहिण्याचे काम संत ज्ञानेश्वर यांनीच केलेले आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित " संत ज्ञानेश्वर " हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीतर्फे काढण्यात आलेला असून तो १८ मे १९४० रोजी मुंबई व पुण्यात एकाच वेळी प्रसिद्ध झाला होता. त्याचबरोबर "संत ज्ञानेश्वर" नावाचा एक हिंदी चित्रपट ही १९६४ मध्ये काढण्यात आला होता.

संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राला खूप चांगली आणि मौलाची शिकवण दिली व वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी आळंदी येथे इद्रायणी नदीच्या काठी जीवन समाधी घेतली. म्हणून आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनाच्या या संजीवन समधीचा सोहळा कार्तिक वदय षष्टी ते आमावस्येपर्यंत साजरा केला जातो.



संत मुक्ताबाई -


संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान बहीण होत्या. त्यांचा जन्म आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. संत ज्ञानेश्वरांसह त्यांना इतर २ भावंडे होती. त्यातील त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ व लहान संत सोपानदेव हे होते. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत व कवियित्री म्हणून प्रसिद्ध आहेत. 

संत मुक्ताबाईचे कल्याण पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य प्रसिद्ध आहेत. संत मुक्ताबाईनीं ताटीचे एकूण ४२ अभंग केलेले आहेत त्या अभंगामध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेल्या आपल्या भावाला म्हणजेच संत ज्ञानेश्वरांना दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केलेली आहे.

संत मुक्ताबाई यांचे ज्ञान फारच अफाट होते. त्यामुळे त्यांचे हे ज्ञान बघून योगी चांगदेवांनी त्यांना आपले गुरु मानले होते. संत मुक्ताबाईनीं "ज्ञानबोध" नावाच्या ग्रंथाचे लेखन ही केलेले आहे.

संत मुक्ताबाईनीं कोथळी (जळगाव ) येथे समाधी घेतलेली आहे. म्हणून संत मुक्ताबाई यांच्या नावावरून जळगावातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून त्याला "मुक्ताईनगर" असे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबरं पुण्यातील येरावडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉस्पिटलच्या आवारातच "मुक्ताई निवास" नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आलेली आहे.



संत नामदेव -


संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत व कवी होते. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी हिंगोली जिल्यातील नर्सिंग बामणी येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी व आईचे नाव गोणाई असे होते. संत नामदेवांचे वडील दामाशेट्टी यांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय होता.

संत नामदेव महाराज हे नामवेद व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संतकवी होते. त्यांनी वज्र भाषेतील अनेक काव्य रचलेली आहेत. संत नामदेव यांची श्री विठ्ठलाचा अगदी "जवळचा सखा " अशी ख्याती होती. संत नामदेव हे विसोबा खेचर यांना आपले गुरु मानीत असत.

संत नामदेवांच्या परिवारात त्यांची पत्नी,बहीण, चार मुलगे व एक मुलगी असे होते. त्याचबरोबर "संत जनाबाई " या स्वतःला "नामयाची दासी" म्हणत त्यामुळे त्या ही त्यांच्या परिवारात होत्या.
" नाचू कीर्तनाच्या रंगीं, ज्ञानदीप लावू जगी! " हे संत नामदेवांच्या आयुष्याचे ध्येय होते.

संत नामदेवांनी भागवत धर्माची माहिती पंजाबपर्यंत नेण्याचे मौलाचे कार्य केले होते. म्हणून संत नामदेव हे पंजाबातील शीख बांधवाना आपल्या जवळचे वाटतात म्हणून ते त्यांना " नामदेव बाबा " असे त्यांचे गुणगान करतात. पंजाबीमधील घुमान, येथे शीख धार्मियांनी संत नामदेवांचे मंदिर उभारले आहे. त्याचबरोबर, पंजाबप्रमाणे राजस्थानातही शिख बांधवानी संत नामदेवांचे मंदिर उभारले आहे. संत नामदेवांना " संत शिरोमणी " असे संबोधिले जाते.

पंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली व अखेर पंढरपूरामध्येच ते पांडुरंगाचरणी विलीन झाले.




संत तुकाराम -


संत तुकाराम हे सत्तराच्या शतकातील महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. त्यांचा जन्म देहू येथे झाला. संत तुकाराम यांच्या वडिलांचे नावा बोल्होबा व आईचे नाव कनकाई असे होते. त्यांच्या मोठ्यां भावाचे नाव सावजी व लहान भावाचे नाव कान्होबा असे होते. 

संत तुकाराम हे १७-१८ वर्षाचे असतानाच त्यांचे आईवडील निधन पावले व मोठा भाऊ तीर्थाटनाला निघून गेला त्यामुळे घरची सर्व जबाबदारी ही संत तुकारामांच्या अंगावरच होती. त्याचवेळी त्यांना भयंकर अश्या दुष्काळाला ही सामोरे जावे लागले. त्याच दुष्काळात त्यांचा मुलगा संतू हा देखील मरण पावला. त्यांच्या पत्नीचे नाव जिजाई ( आवली ) होते. 

" पंढरपूरचा विठोबा " हे संत तुकारामनाचे आराध्या दैवत होते त्यामुळे इतक्या वाईट परिस्थितीतही त्यांनी विठ्ठल्लाची भक्ती कायम ठेवली.

संत तुकारामांनी त्या वेळी अनेक अभंग केले व त्यांनी केलेले हे अभंग त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे हा कागदावर उतरवून घेण्याचे काम करीत असे. संत बहिणाबाई या संत तुकारामच्या शिष्या होत्या. संत तुकारामांनी संत बहिणाबाईंना "वज्रसूची" या ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले असे म्हंटले जाते.

इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीने "संत तुकाराम" हा चित्रपट बनविला व वेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कारही मिळाला.

संत तुकाराम यांना " जगद्गुरू " या नावानेही ओळखले जाते. म्हणूनच वारकरी कीर्तनाच्या शेवटी "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय " असा जयघोष करतात.

संत तुकाराम हे लोककवी होते. " जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणवा!" असे आपल्या अभंगातून त्यांनी जनतेला सांगितले.

संत तुकाराम महाराजांची ओळख ही महाराष्ट्रातील नर्भीड, वास्तववादी व वेळप्रसंगी समाजावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत अशी होती. ज्या दिवशी संत तुकाराम महाराज संदेह वैकुंठधामात गेले त्या दिवसाला " तुकाराम बीज " असे नाव पडले. असे हे " जगद्गुरू " संत तुकाराम आपल्या महाराष्ट्राला लाभले होते.



संत रामदास -


संत रामदास हे समर्थ संप्रदायचे संस्थापक व महाराष्ट्रातील कवी होते. त्यांचा जन्म २४ मार्च १६०८ मध्ये महाराष्ट्रातील जांब ( जालना ) येथे झाला. संत रामदासांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर व आईचे नाव राणूबाई असे होते. संत रामदासांचे घराणे हे सूर्योपासक होते.

संत रामदासांनी स्वयं प्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करून घेतला होता असे म्हंटले जाते. संत रामदासांच्या साधकावस्थेतच त्यांनी श्रीरामांची प्रार्थना केली होती तिलाच आपण "करुणाष्टके " असे म्हणतो. 

व्यायाम, उपासना व अध्ययन या तिन्ही गोष्टींना संत रामदासांच्या आयुष्यात महत्वाचे स्थान होते. जीवनातील १२ वर्षे त्यांनी कडक तपश्चया केली व त्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात.

संत रामदासांनी नाशिक येथे टाकळीला हनुमानाची मुर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्ती आणि बुद्धीची देवता आहे आणि त्यामुळे तिची उपासना केलीच पाहिजे असे त्यांना नेहमी वाटे. संत रामदासांनी गावोगावी जाऊन अनेक मारुतीची देवळे बांधली आहेत.

संत रामदास हे एकमेव महाराष्ट्रातील संत होते जे राजकारणात व धर्मकरणात जाणीवपूर्वक अंतरभुर्त होते. संत रामदास यांनी पर्यावरणावरही अनेक प्रबोधन व लिखाणे केलेली आहेत. संत रामदास हे प्रभू रामचंद्रना आपले गुरु मानत असत. 

संत रामदासांनीच प्रसिद्ध अश्या " दासबोध " व " मनाचे श्लोक " अश्या साहित्याची रचना केली आहे. भक्तिशक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ संप्रदाय व मठांची स्थापना हे कार्य ही त्यांनी केले. "जय जय रघुवीर समर्थ " हे संत रामदासांचे प्रसिद्ध वचन होते. संत रामदास स्वामी हे अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते त्याचबरोबर ते एक उत्तम असे निसर्ग प्रेमी ही होते.

" लवथवती विक्राळा ब्रम्हांडी  माळा " ही शंकराची प्रसिद्ध आरती संत रामदास स्वामी यांनीच लिहिली आहे. त्याचबरोबर दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, करुणाष्टके, अनेक अभंग, स्तोत्रे, स्फूट रचना, रुबाया, सवाया, भरुडे, कविता व अनेक आरत्याही त्यांनी रचल्या आहेत.

संत रामदास यांनी त्यांच्या अंतिम दिनी पद्मासन घातले होते व तीन वेळा " जय जय रघुवीर समर्थ " असे घोष करून ते पंचत्वात विलीन झाले. याच दिवसाला " दासनवमी " म्हणून ओळखले जाते.



संत एकनाथ -


संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत व कवी होते. संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण असे होते व आईचे नाव रुक्मिणी असे होते. लहानपणापासूनच संत एकनाथ यांचे पालनपोषण त्यांच्या आजी आजोबांनीच केले होते. त्यांच्या आजोबांचे नाव चक्रपाणी व आजीचे नाव सरस्वती असे होते.

संत एकनाथांनी आपले गुरु म्हणून सद्गुरु जनार्धन स्वामी यांना मानले होते. ते देवगिरी येथे राहणारे होते व दत्तोपासक होते. संत एकनाथ यांच्या पत्नीचे नाव गिरीजाबाई असे होते व त्यांना गोदावरी, गंगा व हरी अशी तीन मुले होती.

संत एकनाथ यांनी " बये दार उघड " असे म्हणत अनेक अभंग रचना, भरुडे, जोगवा, गोंधळ व गवळणी यांच्या सहाय्याने जनजागृती केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले होते.

संत एकनाथ हे संत कवी, पंत कवी व तंत कवी होते. ते स्वतःचा उल्लेख " एका जनार्धन " असा करीत. "एका जनार्धनी " ही संत एकनाथ यांची नाममुद्रा आहे. संत एकनाथ यांचा " एकनाथी भागवत " हा लोकप्रिय ग्रंथ आहे.

संत एकनाथ हे महावैष्णव होते त्याचबरोबर ते दत्त भक्त ही होते. " त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा " ही प्रसिद्ध अशी श्रीदत्ताची आरती ही संत एकनाथ यांनीची लिहिली आहे.

२६ फेब्रुवारी १५९९ रोजी संत एकनाथ यांनी आपला देह ठेवला आणि त्याच दिवसाला "एकनाथ षष्ठी" म्हणूनही ओळखले जाते.



संत गाडगेबाबा -


महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक संतांपैकी गाडगे महाराज हे एक संत आहेत. गाडगे महाराज हे थोर संत, कीर्तनकार व समाजसुधारक म्हणून ओळखले जातात.

संत गाडगे महाराजांच्या अंगावर नेहमी एक गोधडी व काहीसे फाटके कपडे असायचे व त्यांच्या हातात एक फुटके गाडगे असायचे म्हणून लोकांनी त्यांना "गाडगे बाबा" म्हणण्यास सुरुवात केली. गाडगे महाराजांना लोक "गोधडे महाराज" या नावानेही ओळखायचे.

गाडगे बाबांचा जन्म अमरावतीतील कोतेगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर व आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे होते.

डेबूजीचे लग्न हे लहानवयातच झाले होते व त्यांना चार मुली होत्या. परंतु त्यांचे मन संसारात रमलेच नाही म्हणून त्यांनी संसारातून संन्यास घेतला व तीर्थाटन करण्यास सुरुवात केली व अनेक ठिकाणी भ्रमण सुरु केले. गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनाद्वारे लोकजागृतीचे काम केले.

संत गाडगे बाबा हे संत तुकारामांना आपला गुरु मनात असत व त्याचबरोबर " मी कोणाचा गुरु नाही आणि कोणीही माझा शिष्य नाही " असे ते नेहमी म्हणायचे. गावातील सर्वसामान्य लोकांना आपले विचार कळावे म्हणून ते नेहमी आपले विचार ग्रामीण बोली भाषेत ( वऱ्हाडी ) भाषेत सांगायचे.

गाडगे महाराजांमध्ये सत्य ठणकावून सांगण्याचे अलौकिक सामर्थ्य होते. ते नेहमी आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा व रूढीवर टीका करत व त्याचबरोबर नेहमी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत असत.

संत गाडगे महाराजांना सामाजिक, न्याय व सुधारणा यात जाट रुची होती त्याचबरोबर ते वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते.

संत गाडगे महाराजांनी जनतेला स्वच्छता व चरित्र यांची ही शिकवण दिली. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व अनिष्ट रूढी परंपरा यांना दूर करण्याचे कार्य हाती घेतले होते. अस्पृश्यता व जातीभेद पाळू नका असे ते नेहमी आपल्या कीर्तनातून  लोकांना सांगायचे.

" गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा!" हे गाडगे बाबांचे आवडते भजन होते. म्हणून त्यांच्या जीवनावर "देवकीनंदन गोपाळा" हा चित्रपट निघाला आहे. संत गाडगेबाबांनी ऋणमोचन विदर्भ येथे लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले आहे.

आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांविषयी बोलताना सांगितले आहे की, " सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात! "

असे हे थोर संत गाडगेबाबा यांचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ रोजी वळगाव अमरावती येथील पेढी नदीच्या काठावर झाला. संत गाडगेबाबांचे स्मारक गाडगेनगर अमरावती येथे आहे.


संत जनाबाई -  


संत जनाबाई या हिंदू परंपरेतील एक मराठी संत कवयित्री होत्या. त्यांचा जन्म इसवी सन 1258 मध्ये महाराष्ट्रातील गंगाखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करुंड असे होते. संत जनाबाई यांचे कुटुंब मातंग समाजाचे होते.

त्यांची आई वारल्यानंतर त्या संत नामदेवांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करीत असत. जनाबाई नामदेवांपेक्षा मोठ्या होत्या व अनेक वर्ष त्यांचे पालन पोषण करीत होत्या. जनाबाईंचे मालक दामशेती व त्यांची पत्नी गोणाई हे अतिशय धार्मिक होते व सभोवतालच्या धार्मिक वातावरणामुळे जनाबाई ही विठ्ठलाच्या भक्त झाल्या होत्या.

कोणतेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नसले तरी जनाबाईंनी अभंग प्रकारातील अनेक उच्च दर्जाचे धार्मिक श्लोक रचले आहेत. त्याचमुळे महाराष्ट्रातील वारकरी पंथातील हिंदूंच्या मनात जनाबाईंना आदराचे स्थान आहे. जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या होत्या त्यामुळे त्या स्वतःला 'नामयाची दासी' म्हणून घेत असत.

संत नामदेव हेच त्यांचे परमार्थिक गुरु होते. गवण्या शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. " विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा | " हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे.

संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्येही आहेत. हरिश्चंद्राख्या नामक अख्ख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. वैष्णव कोणाला म्हणावे त्याचीही व्याख्या जनाबाई अगदी सहजपणे करून जातात  -  'अहंकार जाळून त्याचा अंगारा बनविणारा आणि सोहमरुपी भस्म लावणारा तोच खरा भला वैष्णव होय असे त्या म्हणत असत.'

संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शके बाराशे 72 या दिवशी समाधीस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.


अश्या प्रकारे अत्यंत महत्वाचे आणि मौलिक असे संत महात्मा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आहेत  आणि त्यांनी आपल्या संतवाणीने व अभंगानी महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या विचारांची शिदोरी दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close