कथालेखन मराठी | एकीचे बळ | Kathalekhan Marathi | Story Writing In Marathi |
![]() |
कथालेखन मराठी - एकीचे बळ |
शेतकरी - चार मुले - आळशी - आपापसात भांडणे - शेतकरी हैराण - शेतकरी आजारी - मुलांना सुधारवण्यासाठी युक्ती - चार काट्या तोडायला लावणे - सहज तुटणे - परत चार काट्या एकत्र बांधणे - तोडण्यासाठी सांगणे - मुले असमर्थ होणे- मुलांची चूक लक्षात येणे - वडिलांची माफी मागणे - एकत्र समजूतीने राहणे- तात्पर्य
शिर्षक - एकीचे बळ.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात सखाराम नावाचा एक शेतकरी राहत होता. सखाराम खूप मेहनती व कष्टाळू शेतकरी होता. पत्नीच्या निधनानंतर त्याने आपल्या चारही मुलांचे शिक्षण पूर्ण केले व त्यांना कशाचीही कमी जाणवू दिली नाही. परंतु त्याची चारही मुले ही फारच आळशी आणि सतत एकमेकांकडे भांडणारी होती. त्या चौघांचेही एकमेकांकडे एक क्षण ही पटत नव्हते. त्यांच्या हया अश्या वागण्याने शेतकरी नेहमीच चिंतेत असे. त्याच्या या आळशीपणामुळे आणि भांडणामुळे तो खूपच हैराण झाला होता.
एके दिवशी शेतकरी खूपच आजारी पडला होता. आपल्यानंतर आपल्या या मुलांचे कसे होणार ह्याची चिंता त्याला सारखी भेडसावत होती. आपल्या हया भांडखोर मुलांना सुधारविण्यासाठी त्याने एक युक्ती केली.
त्याने मुलांना चार सामान आकाराच्या काट्या आणवयास सांगितल्या व एक एक काटी प्रत्येकाला दिली आणि ती तोडायला सांगितली तेव्हा चारही मुलांनी आपली आपली काटी लगेच तोडली.
आता त्याने त्या चारही काट्या एकत्र बांधून ठेवायला सांगितल्या व ती एकत्र केलेल्या काट्याची जुडी एक एक करून प्रत्येक मुलाला तोडण्यासाठी सांगितली. प्रत्येक मुलाने खुप जोर लावला परंतु ती जुडी कोणाकडूनही तुटली गेली नाही. शेतकऱ्याची चारही मुले त्या काट्याची जुडी तोडण्यास असमर्थ ठरली.
आता मात्र चारही मुले एकमेकांकडे बघू लागली कारण त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती. त्यांनी वडिलांची क्षमा मागितली व त्यांना एकीच्या बळाचे महत्व लक्षात आले.
शेतकरी खूप आनंदी झाला व त्यानंतर काही दिवसांनी शेतकऱ्याची तब्येतही सुधारली व शेतकऱ्याची मुले त्याला शेतीत मदत करू लागली व एकत्र समजूतीने राहू लागली.
तात्पर्य -
( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.