Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कथालेखन मराठी - आळशी गाढव - Kathalekhan Marathi - Aalshi Gadhav- Lazy Donkey - Story Writing In Marathi.


कथालेखन मराठी | आळशी गाढव
| Kathalekhan Marathi |  Aalshi Gadhav | Lazy Donkey | Story Writing In Marathi |



        
         
कथालेखन मराठी - आळशी गाढव - Kathalekhan Marathi - Aalshi Gadhav- Lazy Donkey - Story Writing In Marathi.
कथालेखन मराठी - आळशी गाढव - Kathalekhan Marathi - Aalshi Gadhav- Lazy Donkey - Story Writing In Marathi.

     
              

शिर्षक - आळशी गाढव.




एक मिठाचे व्यापारी ओझ्याचे गाढव - पाठीवर ओझे -  नदी ओलांडणे - गाढव पाण्यात पडणे -ओझे हलके होणे - गाढवाला दुसऱ्या नेणे - दुसऱ्या वेळेस गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादणे-  नदी ओलांडताना पडणे - ओझे जड होणे - गाढवाचे पडणे - शिक्षा - आनंद होणे - तात्पर्य.




एका गावात एक व्यापारी राहत होता. व्यापाऱ्याला सतत आपल्या कामानिमित्त दर आठवड्याला स्वतःच्या गावातून दुसऱ्या गावात जावे लागे त्यामुळे त्याने त्याचे सामान एका गावातून दुसऱ्या गावात ने- आण करण्यासाठी एक गाढव पाळले होते.

परंतु हे जे व्यापाऱ्याजवळील गाढव होते ते मात्र खूपच आळशी आणि सतत आराम करत असायचे. व्यापारी जेव्हा कधी त्याच्या पाठीवर सामानाचे ओझे लादून दुसऱ्या गावात नेण्यासाठी तयार करीत असे तेव्हा गाढवाला खूपच आळस येत असे व ते गाढव काही केल्या व्यापाराचे ऐकत नसे व तो जागेवरून हलता हलत नसे. गाढवाच्या या सवयीला व्यापारी फारच कंटाळून गेलेला होता.

एके दिवशी व्यापाऱ्याला तातडीने दुसऱ्या गावातील बाजारपेठेत स्वतः जवळील दहा-बारा मिठाच्या गोण्या विकण्यासाठी न्यायच्या होत्या म्हणून त्याने गाढवाच्या पाठीवर एकेक करून सर्व मिठाच्या गोण्या लादल्या व तो त्याला घेऊन दुसऱ्या गावातील बाजारपेठेच्या दिशेने निघाला.

सहाजिकच व्यापाऱ्याचे गाढव हे पहिल्यापासूनच आळशी आणि सुस्त असल्यामुळे त्याच्या पाठीवर लादलेल्या मिठाच्या गोण्याचं ओझे त्याला नकोसे झाले होते. त्यामुळे गाढव रस्त्याने हळूहळू चालत होते. तर कधी रस्त्यातच मध्ये ते उभे राहत होते आणि जागेवरून हलतही नव्हते.

म्हणजेच आळशी आणि सुस्त गाढवाने स्वतःच्या अशा वागण्याने व्यापाऱ्याच्या नाकी नऊ आणले होते. परंतु व्यापाऱ्यापुढे काहीही पर्याय शिल्लक नसल्यामुळे तो त्या गाढवाला खेचत खेचत त्या गावातून दुसऱ्या गावात नेण्याचा प्रयत्न करू लागला. व्यापारी राहत असलेल्या गावातून बाजारपेठ असलेल्या गावात जाण्याचा रस्ता फार काही दूर नव्हता परंतु त्या दोन गावांच्या मध्ये एक छोटीशी  नदी येत होती व ती नदी पार केल्याशिवाय दुसऱ्या गावात पोहोचणे अशक्य होते.

व्यापारी आपल्या गावातून निघून हळूहळू गाढवाला दुसऱ्या गावात नेण्याचा प्रयत्न करीत असतानाच व्यापारी व त्याचा गाढव नदीशेजारी येऊन थांबले. काही वेळातच नदी ओलांडून पलीकडे गेल्यानंतर बाजारपेठ असलेले गाव सुरू होणार होते. गाढवाच्या आळशी पणाला कंटाळलेला व्यापारी कधी एकदा ही नदी पार करून आपण दुसऱ्या गावी जाऊन गाढवाच्या पाठीवरील या मिठाच्या गोण्यांची विक्री करतो असे सतत विचार करत होता.

पाठीवरील दहा गोण्यांच्या वजनाने गाढव फारच कंटाळले होते. कधी एकदा आपल्या पाठीवरील या गोण्या हा व्यापारी काढून टाकतोय असे गाढवाच्या ही मनात आले होते. काही वेळातच व्यापारी आणि गाढव नदी पार करण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु नदी पार करताना पाठीवरील ओझे अति झाल्याने गाढवाला त्याचे पाय पुढे उचलता येत नव्हते.

व्यापाऱ्याच्या मागे मागे चालत हळूहळू तो गाढव  पाण्यातून रस्ता काढत नदी पार करू लागला. आता व्यापारी पुढे पुढे आणि गाढव त्याच्या मागे मागे असे त्या नदीतून चालू लागले. व्यापारी आणि गाढव नदीतील अर्ध्या वाटेवर येताच अचानक गाढवाचा पाय नदीतील एका दगडात अडखळून गाढव नदीत धडपडले. नदी जास्त मोठी नसल्यामुळे गाढव नदीत धडपडताच एका जागी बसून राहिले व त्याला उठता येईना.

व्यापारी पुढे चालत असताना मागून आपले गाढव नदीत पडल्याचा आवाज त्याला आला आणि त्याने मागे बघताच डोक्यावर हात मारले. गाढव नदीच्या मधोमध बसून होता व त्याच्या पाठीवरील मिठाच्या सर्व गोण्या या नदीत पडल्यामुळे सारे मीठ नदीतील पाण्यात वितळून गेले व गोण्या अगदी रिकाम्या झाल्या होत्या.

व्यापाऱ्याने घाईघाईने गाढवाला पाण्यातून उठून बसवले असता त्याच्या लक्षात आले की गाढवाच्या पाठीवरील सार्‍या गोण्यातील मीठ हे पाण्यात वितळून गेले व त्याच्या पाठीवर बांधलेल्या गोण्या रिकाम्या झाल्यामुळे त्या अगदी हलक्या झाल्या होत्या.

गाढव पाण्यात उठून बसल्यावर त्याला आपली पाठ हलकी झाल्याचे लक्षात आले आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. परंतु दुसरीकडे मात्र व्यापारासाठी घेऊन निघालेल्या साऱ्या मिठाच्या गोण्या पाण्यात पडल्यामुळे व्यापाराचे नुकसान झाले व नाईलाजाने त्याला पुन्हा आपल्या गावी जावे लागले.

गाढव मात्र पुन्हा गावी जाताना मनातल्या मनात विचार करू लागला जर नदीत बसल्यामुळे किंवा पडल्यामुळे आपल्या पाठीवरचे ओझे रिकामे होत असेल तर पुढील वेळी हीच युक्ती केली तर नक्कीच आपल्या कामी येईल असा विचार करून गाढव आनंदाने पुन्हा घरी निघाला.

पुढील काही दिवस आपल्या मिठाच्या गोण्यांचे नुकसान झाल्यामुळे व्यापारी निराश होता पण गाढव मात्र खाऊन पिऊन मस्त आराम करून सुस्तावत तेथे पडलेला असे. परंतु गाढवाचा हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता कारण आता आपल्या आळशी गाढवाला एक चांगला धडा शिकवावा म्हणून
व्यापाऱ्याने यावेळी शेजारील गावातील बाजारपेठेत कापसाच्या गोण्या नेण्याचे ठरविले होते.

नेहमीप्रमाणे बाजारपेठेत जाण्यासाठी व्यापारी गाढवाच्या पाठीवर कापसाच्या गोण्या बांधू लागता गाढव मात्र त्याला आनंदी दिसले पण व्यापाऱ्याला ही गाढवाची युक्ती कळली होती. परंतु तो काही न बोलता गाढवाच्या पाठीवर पुन्हा दहा कापसाच्या गोण्या बांधून त्याला बाजूच्या गावाच्या दिशेने नेऊ लागतो.

व्यापाराचे गाढव मुळातच आळशी असल्यामुळे त्या कापसाच्या गोण्या घेऊन रस्त्याने जात असताना तो पुन्हा हळूहळू चालू लागतो व मनातल्या मनात विचार करू लागतो की कधी एकदा नदी येईल आणि मी त्या नदीत जाऊन मध्येच बसेन म्हणजे  मागच्यावेळी सारखे माझ्या पाठीवरचं ओझे अगदीच हलके होऊन जाईल व मला या कामातून सुटका मिळेल.

व्यापारी आणि त्याचा गाढव गावातून काही रस्ता चालल्यानंतर दुरूनच गाढवाला नदी दिसते. आता या नदीच्या अर्ध्या रस्त्यावर जाऊन कधी मी मध्येच पाण्यात बसतो आणि मी माझ्या पाठीवरचे ओझे हलके करतो असे गाढवाला झाले होते. व्यापाऱ्याला कळले होते की गाढव आपली युक्ती करणार आणि व्यापाऱ्याने ही आपली युक्ती लढवली होती.

व्यापारी आणि गाढव नदीच पाऊल टाकतात व्यापारी पुढे पुढे चालू लागला आणि गाढव पुन्हा त्याच्या मागे मागे चालू लागले. काही अंतर चालल्यानंतर गाढव नदीच्या मधोमध येऊन मुद्दाम अचानक खाली बसले. ज्याप्रमाणे व्यापाऱ्याने विचार केलेले त्याचप्रमाणे गाढव वागले होते.

गाढवाला काहीही न बोलता व्यापाऱ्याने हळूहळू त्याला उठवून उभे केले. गाढवाला वाटले आता पाण्यातून उभे राहिल्यानंतर आपल्या पाठीवरचे ओझे अगदी रिकामे झाले असेल परंतु जेव्हा गाढव उभे राहिले तेव्हा त्याच्या पाठीवरील कापसाच्या गोण्या पाण्यामुळे जास्त वजनाच्या बनून गाढवाच्या पाठीवरील ओझे हे दुप्पट वजनाचे झाले होते.

कापसाच्या गोण्यांचे वजन दुप्पट झाल्यामुळे गाढवाला आता पाण्यात धड उभे राहता येत नव्हते. गाढवाला त्याच्या आळशी पणाची शिक्षा मिळाली होती व त्याची चांगलीच फजिती झाली होती. गाढवाची झालेली ही फजिती पाहून व्यापाऱ्यालाही मजा आली. व्यापारी गाढवाला घेऊन त्याच्या पाठीवरील दुप्पट ओझ्यासह पुढे निघाला व गाढवाला आपल्या आळशी पणाची चांगलीच शिक्षा मिळाली.




तात्पर्य -




( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )





आमचे हे कथालेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close