Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भारतातील प्रमुख नद्यांची माहिती- Bharatatil Pramukh Nadyanchi Marathi Mahiti - Marathi Information About Major Rivers In India.

भारतातील प्रमुख नद्यांची माहिती | Bharatatil Pramukh Nadyanchi Marathi Mahiti | Marathi Information About Major Rivers In India |






                 
भारतातील प्रमुख नद्यांची माहिती- Bharatatil Pramukh Nadyanchi Marathi Mahiti - Marathi Information About Major Rivers In India.
भारतातील प्रमुख नद्यांची माहिती- Bharatatil Pramukh Nadyanchi Marathi Mahiti - Marathi Information About Major Rivers In India.


        



मित्र-मैत्रिणींनो आज आपण भारतातील प्रमुख नद्यांची माहिती बघणार आहोत.



नदी म्हणजे काय? "नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह." नदीचा उगम विविध प्रकारे होतो. त्यामध्ये जलाशय, झरे, दलदली व बर्फाची पठारे यांचा समावेश होतो. नद्यांचे वर्गीकरण अवखळ नदी, जुनी नदी, पुनर्जीवित नदी असे वेगवेगळ्या प्रकारात होते.

नद्यांचा प्रमुख उपयोग पाण्याचा स्तोत्र म्हणून होतो त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी ही नदीचा उपयोग होतो. नदीचा उपयोग संरक्षणाची ढाल, वीजनिर्मिती आणि मोठी यंत्रे चालवण्यासाठी ही करून घेतला जातो. त्याचबरोबर अनेक काळापासून अन्न मिळवण्यासाठी ही नद्यांचा उपयोग होत आलेला आहे.

नद्यांतील जीवसृष्टीचे एक चक्र असते त्यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतात. फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी ही नदीच्या पाण्याचा उपयोग होत आलेला आहे. नदीतील वाळूचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. नदीने ही नेहमी उताराच्या दिशेने वाहते. त्यामुळे नदीचा वेग नियंत्रित करण्यासाठी बांधलेले काठ उपयोगी पडतात व अशा बांधलेल्या काठांना 'रुंद दगडी काठांचा घाट' असेही म्हणतात.

भारतात अनेक पवित्र समजल्या जाणाऱ्या सर्व मोठ्या नद्यांना घाट आहेत. आता आपण पाहूया भारतातील काही प्रमुख नद्या व त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती.



•  गंगा नदी - गंगा नदी ही भारतात खूपच पवित्र अशी मानली जाणारी नदी आहे. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगा नदीला इंग्रजीत Ganges असे म्हणतात. गंगेची लांबी 2,525 कि.मी आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातील गंगोत्री येथे होतो. हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र असे मानले जाते. तिला 'माता' म्हटले जाते. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायीनी आहे. गंगेमध्ये डॉल्फिनच्या दोन जाती सापडतात त्यांना 'गंगेतील डॉल्फिन' व 'इरावती डॉल्फिन' या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्क सुद्धा प्रसिद्ध आहेत. गंगेतील पाण्यातील झपाट्याने वाढते प्रदूषण यामुळे गंगा नदीतील प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहे व त्यामुळे गंगेतील जलचरांचे जीवन धोक्यात आलेले आहे. आपल्या मृत पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी भगीरथानी गंगेला पृथ्वीवर आणले असे मानले जाते. गंगा आपल्या उगम भागात भारत आणि बांगलादेशच्या शेती आधारित अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभारत लावतेच त्याचबरोबर ती तिच्या उपनद्यांसह मोठ्या क्षेत्रासाठी ही बारमाही सिंचनाचा स्तोत्र आहे. या भागात मुख्यतः तांदूळ, ऊस, डाळ, बटाटे, गहू, तेल, बिया ही पिके घेतली जातात. गंगा नदी ही तिच्या शुद्धीकरण क्षमतेसाठी जगभरात ओळखली जाते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या नदीतील पाण्यामध्ये बॅक्टेरिया फेज नावाचा व्हायरस आहेत जे बॅक्टेरिया व इतर हानिकारक सूक्ष्मजीव टिकू देत नाहीत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीतील प्रदूषण नियंत्रण व स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवली. त्यानंतर त्यांनी जुलै 2014 मध्ये भारताच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात 'नमामि गंगा' नावाचा प्रकल्प सुरू केला. आता प्रथमच हरी की पोडीतील गंगेचे पाणी पिण्यास उपयुक्त झाल्याचे सांगितले जाते.




•  यमुना नदी - यमुना नदी ही उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे. यमुना नदी यमुनोत्री नावाच्या ठिकाणावरून उगम पावते. हिमालयातून उगम पाहून ही नदी गंगेस मिळते. यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. यमुना नदी ही यमुनोत्री वरून उगम पाहून प्रयागराज येथील गंगेला मिळते. त्यामुळे प्रयाग मधील यमुना एक विशाल नदी म्हणून ओळखली जाते व तेथील प्रसिद्ध असे ऐतिहासिक किल्ल्याखालील गंगेमध्ये विलीन होते. ब्रजच्या संस्कृतीत यमुनेला महत्त्वपूर्ण स्थान आहे. जरी यमुना हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे तरी तिचा प्रवाह वेळोवेळी बदलत आलेला आहे असे पौराणिक निरीक्षणे आणि ऐतिहासिक संदर्भावरून दिसण्यात येते. ब्रजप्रदेशाच्या सांस्कृतिक हद्दीतील यमुना नदीचे पहिले प्रवेशद्वार बुलंद शहर जिल्ह्यातील खुर्जा तहसीलच्या 'जेबर" नावाच्या शहराजवळ आहे. सध्याच्या काळात यमुनेचा एकच प्रवाह आहे आणि वृंदावन तिच्या काठावर वसलेले आहे. तेथे अनेक धर्माचार्य व भक्त कवींनी मध्ययुगात वास्तव्य केले आहे आणि कृष्ण उपासना व कृष्ण भक्तीचा उपदेश केलेला आहे. वृंदावनामध्ये यमुनेच्या किनाऱ्यावर मोठे सुंदर घाट आहे व त्यांच्याकडे बरीच मंदिरे तीर्थ छत्री व धर्मशाळा आहेत हे यमुनेच्या किनाऱ्यांच्या सौंदर्यात भर घालत आहे ही नदी मथुरा शहरात प्रवेश करते.




•  नर्मदा नदी - नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे ही भारताच्या मध्य प्रदेश या राज्यातून वाहते. नर्मदा ही नदी भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीला रेवा, अमरजा, मेकर, कन्या, रुद्रकन्या, या नावाने ही ओळखले जाते. नर्मदा नदी ही उत्तरी भारत व दक्षिण भारत यांच्यातील सीमारेषा आहे. भारतातील नद्यांपैकी फक्त नर्मदेचीच परिक्रमा करण्यात येते. नर्मदा गुजरातच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील भरूच शहराजवळ खंभायताच्या आखातास मिळते. नर्मदेचे खोरे हे भूदोषामुळे म्हणजेच पृथ्वीचे भूकवच प्रसारण पावताना तयार झालेले जे चर असतात त्यामुळे बनलेले आहे. जीवाश्म विज्ञानाच्या दृष्टीने नर्मदेचे खोरे अत्यंत महत्त्वाचे आहे. नर्मदेच्या खोऱ्यात अनेकदा डायनासोरचे जीवाश्म आढळून आलेले आहेत. नर्मदा नदीच्या प्रदेशात असलेले भीम बेटका येथील पूर्व ऐतिहासिक गुंफा चित्र व मानवी निवासस्थाने संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहेत. नर्मदा नदीवर जबलपूर येथे धुवाधार नावाचा धबधबा आहे. नर्मदा नदीच्या नदीकाठी अमरकंटक, शुक्ल तीर्थ, ओंकारेश्वर, महेश्वर, सिद्धेश्वर, 64 योगिनींचे मंदिर, 24 अवतारांचे मंदिर, भोजपुरीचे मंदिर, भ्रूगू ऋषींचे मंदिर इत्यादी अनेक मंदिरे आहेत.' नार्मदीय ब्राह्मण' समाज नर्मदेला आपली कुलस्वामिनी मानतात. नर्मदे काठी वसलेली जबलपूर, बडवाणी, हुमांगाबाद, हरदा, नर्मदा नगर, ओमकारेश्वर, देवास, निमावर, पिपरिया, मंडलेश्वर, महेश्वर अशी अनेक महत्त्वाची शहरे आहेत. नर्मदेला तब्बल 41 उपनद्या येऊन मिळतात त्यातल्या 22 उपनद्या सातपुड्यावरून तर उर्वरित विध्य पर्वतावरून वाहणाऱ्या आहेत. नर्मदा नदीच्या काठी मार्कंडेय, कपिल, भ्रूगु, व्यास ऋषी, जमदग्नी ऋषी, अगस्ती ऋषी, दुर्वास ऋषी, वशिष्ठ,कृतू,अत्री,मरिची, गौतम, गर्ग, चरक, शौनक यांसारख्या अनेक ऋषींनी तप केल्याचे सांगितले जाते यापैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा 'नर्मदा परिक्रमा' केली.




•  सिंधू नदी - सिंधू नदी ही दक्षिण आशियातील प्रमुख नदी आहे. तिबेट भारत व पाकिस्तानातून वाहणारी ही एक प्रमुख नदी आहे. सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये झालेला असून ते भारतातील लडाख पर्यंत आणि नंतर पाकिस्तान मधून ही नदी वाहते. इंग्रजी भाषेत या नदीला इंडस (Indus) असे म्हणतात त्याचप्रमाणे सिंध नदीचे उर्दू नाव दर्या ए सिंधू, पंजाबी नाव सिंध दर्या, सिंधी नाव सिंधू दर्या असे आहे. या नदीची लांबी 3180 कि.मी. आहे. हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारीच रचले गेलेले आहेत. हिंदू व हिंदुस्थान हे शब्द याच नदीवरून पडलेले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधू नदी वरूनच पडलेले आहे. सिंधू नदीच्या पाच उपनद्या आहेत त्यांची नावे झेलम चंद्रभागा इरावती विपाशा सतलज ही आहेत. त्यातील सतलज ही सर्वात मोठी उपनदी आहे व या नदीवरील भाक्रा नांगल हे धरण आहे. या धरणामुळे पंजाबच्या शेतीला आणि विद्युत परियोजनांना खूप मदत मिळालेली आहे. सिंध नदी उत्तर भारतातील तीन मोठ्या नद्यांपैकी एक आहे. सिंधू नदीचे पाणी सिंचनासाठी जेथे जेथे उपलब्ध आहे तेथे गव्हाची शेती ही प्रामुख्याने होते त्याच व्यतिरिक्त कापूस व अन्य धान्याची ही शेती होते. सिंधू खोरे संस्कृती ( 3300- 1700 इ.स.पू.) जगाच्या प्राचीन नद्यांच्या. खोऱ्यातील संस्कृती पैकी एक प्रमुख संस्कृती होती.




•  गोदावरी नदी - गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिणगंगा असेही म्हटले जाते. गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. या नदीची लांबी 1465 कि.मी. इतकी आहे. गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलगू भाषिक आहेत. त्याचप्रमाणे भात हे तेलगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून तेथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. गोदावरीचे खोरे 312812 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. एकूण लांबी गोदावरीचा जगात 92 वा क्रमांक आहे. गोदावरी नदीत मुख्यतः गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती आढळून येतात. गोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नगर वस्त्यातून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक 85% प्रदूषण होते. अतिवृष्टी पुरांची नैसर्गिक संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोऱ्यात आढळून येतात. पुरांमुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभही परिसरातील प्रदेशाला होतो. गोदावरी नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत दोन्ही तटांची प्रदक्षिणा 'गोदावरी परिक्रमा' म्हणून सुप्रसिद्ध आहे.


अशा प्रकारे या अनेक नद्यांनी त्यांच्या सौंदर्याने आपल्या भारताला भौगोलिक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त करून दिलेले आहे.



आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close