औषधी वनस्पती हळद माहिती | Aushadhi Vanspati Halad Marathi Mahiti | Information About Medicinal Plant Turmeric In Marathi |
![]() |
औषधी वनस्पती हळद माहिती- Aushadhi Vanspati Halad Marathi Mahiti - Information About Medicinal Plant Turmeric In Marathi. |
मित्र-मैत्रिणींनो आज आपण औषधी वनस्पती हळद बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करतो. त्यातील विशेषता आपण अनेक विविध प्रकारच्या म्हणींचा वापर करतो त्यातील एक प्रसिद्ध म्हण म्हणजे "पी हळद आणि हो गोरी!" ही म्हण आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलेली किंवा आपल्या व्यवहारात बोलली गेलेली आहे. म्हणजेच या म्हणीमध्ये हळदीचाच एक गुणधर्म आपल्याला सांगण्यात आलेला आहे. चला तर मग या गुणकारी आणि औषधी वनस्पती हळदीची आपण थोडक्यात माहिती घेऊया.
आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" नावाने ओळखली जाणारी हळद ही एक गुणकारी औषध म्हणून दैनंदिन जीवनात वापरण्यात येते. मराठीत हळद नाव असणाऱ्या या वनस्पतीला हिंदीमध्ये हल्दी तर इंग्रजीमध्ये turmeric टर्मरिक तर लॅटिनमध्ये कुरकुम लौगा असे म्हणतात. चमत्कारिक द्रव्याच्या रूपात मान्यता दिलेली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाच्या वेळी वर वधूला आवर्जून हळद लावण्याची पद्धत आहे.
आयुर्वेदात प्राचीन काळापासूनच हळदीला हळदी शिवाय हरिद्रा, कुरकुमा लौगा, वरवर्णीनी, गौरी, क्रिमीघ्न, योशीतप्रिया, हटविलासनी, हरदल, कुमकुम, टर्मरिक अशी नावं दिली गेलेली आहेत. हळद या वनस्पतीचा वापर तिच्या या औषधीय गुणधर्मामुळे भारतात फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरातील करण्यात येतो. अगदीच कोणाला छोटेसे कापले किंवा छोटीशी जखम झाली तरी स्वयंपाक घरातील चिमुटभर हळद तेथे लगेच लावण्यात येते. जेणेकरून, जखम झालेल्या जागेवर जंतुसंसर्ग होऊ नये.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळदीच्या लागवडीतून लाखो लोक आपले उत्पन्न काढत आहेत. हळदीचे अनेक प्रकार आहेत. पिवळी हळद ही खूप प्रसिद्ध असली तरी पांढरी हळद देखील तितकीच गुणकारी आहे असे म्हटले जाते. पांढऱ्या हळदीच्या गोड चवीमुळे तिला आंबेहळद असेही म्हणतात. ही हळद विशेषतः कोकण प्रांतात अधिक प्रमाणात पिकते. हळदी वनस्पती बारमाही आहे. त्याचप्रमाणे ही एक जंतुनाशक म्हणूनही ओळखली जाते.
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक आहे. हळदीचे उत्पन्न हे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा तामिळनाडू अशा अनेक ठिकाणी केले जाते. हळदी एक भारतीय वनस्पती असून ती आल्याच्या प्रजातीची पाच ते सहा फूट वाढणारे एक रोप आहे. हळदी पासून मिळणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत.
• हळद ही एक जंतुनाशक असून, हळद पावडर चा उपयोग किंवा हळदीच्या लेपाचा उपयोग त्वचेचा रंग उजळण्यासाठी ही केला जातो.
• हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दुधात हळद टाकून घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
• हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते.
• हळद चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास हृदय विकार मधुमेह कर्करोग मेंदूचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो.
• ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी हळदीचे सेवन त्याने त्यांची पचनक्रिया सुधारते.
• शरीरावर कोठेही लहान मोठी जखम झाल्यावर त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव ताबडतोब बंद होतो व जंतुसंसर्गाचा धोकाही टळतो.
• फेस पॅक मध्ये किंवा उठण्यामध्ये जर किंचित ची हळद पावडर टाकल्यास व त्याने त्वचेला लावणारा लेप तयार केल्यास मृत त्वचा निघून जाऊन अंगावरील बाळ कमी होते व हळूहळू वर्णात सुधार येऊ शकतो व शरीराचा रंग उजळण्यास मदत मिळते.
• ओल्या हळकुंडापासून भाजी तसेच लोणचे तयार करण्यात येते.
• हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव वाढण्या व्यतिरिक्त धार्मिक कार्यातही करण्यात येतो.
• हळदीची जंतुनाशक गुणधर्मामुळे सर्दी कफ झाले असेल तर हळदीचे दूध हा त्यावरील रामबाण उपाय म्हणून ओळखला जातो.
• ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे त्यांनी झोपताना आवर्जून हळदीचे दूध सेवन केल्यास त्यांना फायदा होतो.
• लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना हळदीचे दूध आवर्जून देण्यात येते.
• हळदीमध्ये असणारा कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट चे गुणधर्म भरपूर असतात. या घटकाचा उपयोग तणावग्रस्त व्यक्तींसाठी औषधात करण्यात येतो.
हळद ही एक आयुर्वेदिक वनस्पती असली तरी ती एक गरम मसाल्यातील गुणधर्म असलेल्या कुटुंबातील एक आल्याप्रमाणे दिसणारी एक वनस्पती आहे. तिचा वापर योग्य त्या प्रमाणात केल्यासच तिच्या औषधी गुणधर्माचा आपण पुरेपूर वापर करू शकतो अन्यथा जर ती आपल्या रोजच्या व्यवहारात प्रमाणापेक्षा जास्त वापरण्यात आल्यास तिचे काही दुष्परिणाम ही आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे हळदीचा वापर योग्य त्या प्रमाणात करून तिचा आपण आपल्या शरीरासाठी फायदा करून घेऊ शकतो पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो त्यामुळे हळदीचा वापर योग्य त्या प्रमाणात केल्यासच उपयुक्त ठरेल.
टीप - वरील कोणतेही उपाय करण्याआधी कृपया तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.