मराठी माहिती | पाच विविध तेलबीयांची माहिती | Pach Telbiyanchi Mahiti | Information On Five Oilseeds In Marathi |
![]() |
मराठी माहिती - पाच विविध तेलबीयांची माहिती - Pach Telbiyanchi Mahiti - Information On Five Oilseeds In Marathi. |
मित्र-मैत्रिणींनो आज आपण पाच विविध तेलबियांच्या प्रकाराबद्दल माहिती बघणार आहोत.
1. तीळ तेल - तीळ म्हणजेच Sesamum Indicum हे एक फुल येणारे लागवड योग्य झाड आहे. भारतात हे मोठ्या प्रमाणात आढळते त्याचबरोबर याच्यातील बियांसाठी त्याची बहुतेक सगळीकडेच लागवड केली जाते. याची फुले पिवळी असतात मात्र काही वेळे ते निळ्या व जांभळ्या रंगाची असतात. इंग्रजीमध्ये याला Sesame तर लॅटिनमध्ये याला Sesamum असे म्हणतात तसेच भारतात याला सर्वत्र तीळ असेच म्हणतात. तमिळ मल्याळम व कन्नड मध्ये याला एल्लू म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार तिळाच्या केलास तुपानंतर दुसरे महत्त्वाचे स्थान आहे. काळ्या तिळाचा वापर धार्मिक कार्यात होतो. शनि देवास तिळाचे तेल वाहण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदात पण याचा पुष्कळ वापर होतो. तिळाचे झाड हे एक बहुवार्षिक झाड असून ते सुमारे 0.5 ते 1 मीटर उंच वाढते याची पाणी विरुद्ध दिशेला असतात. तिळाच्या बियांचा रंग सामान्यता पांढरा मात्र काही वेळा किंचित गुलाबी लालसर व काळाही असतो. या ज्या तेलबीया आहेत याच्यापासून उच्च दर्जाचे खाद्यतेल निघते. तीळ पौष्टिक आहेत तसेच त्यांच्यात स्निग्धपणा आहे म्हणून तिळाचे तेल अंगाला लावतात. भारतात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटण्याचा प्रथा आहे. तिळाच्या अनेक जंगली जाती आफ्रिकेत सापडतात. पश्चिमी व मध्यपूर्वेकडे देशात याचा वापर होतो खाद्यपदार्थ याचा वापर तीळ व कूट करूनही करण्यात येतो. भारतात संक्रांतीला मोठ्या प्रमाणात याचा उपयोग करतात तिळाच्या पोळ्या तिळाचे लाडू तिळाची चिक्की असे तिळापासून काही प्रकार बनवले जातात त्याचप्रमाणे काही प्रमाणात भाज्यांमध्येही याचा वापर केला जातो. तिळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल काबूत ठेवायला मदत होते. जुन्या काळात बॉबीलोन येथील स्त्रिया तरुणपणा व सौंदर्य टिकाव म्हणून तिळापासून तयार केलेला हलवा खात असत. रोमन युद्धे बल व ऊर्जेसाठी याचे सेवन करीत. तिळाचे तेल हे शरीराच्या मसाजसाठी व आरोग्यासाठी वापरतात त्याचप्रमाणे अभ्यंग व शिरोधाला या क्रियेसाठी ही याचा वापर आयुर्वेदात होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळाचे लाडू देत "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणण्याची पद्धत आहे.
2. सोयाबीन तेल - सोयाबीनचे शास्त्रीय नाव Glycine max, ग्लिसाईन मॅक्स, असे असून इंग्रजीमध्ये याला soya bean "Miracle bean" असे म्हणतात. सोयाबीन मध्ये ग्लास इन हे अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असते म्हणूनच याचे शास्त्रीय नाव ग्लासीन मॅक्स असे दिले गेले आहे. सोयाबीन हे एक प्रकारचे कडधान्य आहे. तरीही यापासून मिळणाऱ्या तेलामुळे याला तेल बियांमध्येही घडले जाते. सोयाबीन हे भारतातील इतर तेलबियांप्रमाणे महत्त्वाचे नगदी पीक आहे. सोयाबीन हे एक पौष्टिक कडधान्य आहे. सोयाबीन ची लागवड जून ते जुलै महिन्यात केली जाते. सोयाबीनचे दूध हे शरीरासाठी फारच पौष्टिक असते. सोयाबीनचे पीठ गव्हाच्या कणकात वापरून बनवलेल्या पोळ्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात त्याचप्रमाणे ब्रेड बिस्किटे नानकटाई केक यातही सोयाबीनचा वापर करण्यात येतो. पनीर सारख्या महागड्या दुग्धजन्य पदार्थाचा पर्याय म्हणून बराच द्या वापरले जाणारे टोपू म्हणजे ही सोया पनीरच असते. सोयाबीनचे तेल आहारात स्वस्त खाद्यतेल म्हणून वापरले जाते तर याच्या पेंडीचा उपयोग कोंबड्यांचे खाद्य म्हणून केले जाते. सोयाबीनच्या बियांचा उपयोग बायोडिझेल बनवण्यासाठीही केला जातो. भारतातील बहुतांशी सामान्य लोक नेहमीच्या आहारात सोयाबीनच्या तेलाचा वापर करतात. सोया सॉस हा तर एक अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे जो फ्रँकी पासून पिझ्झा पर्यंत कशातही सर्रास वापरला जातो. सोयाबीन पासून बनवलेले सोया नगर सोया चंक्स सोयाबीन ची भाजी सोया टिक्की सोया कबाब सोया कटलेट इत्यादी चविष्ट पाककृती फारच लोकप्रिय आहेत. जगामध्ये 60% सोयाबीन अमेरिकेत उत्पन्न होते तर भारतात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्य प्रदेशात होते मध्य प्रदेशातील इंदूर या गावीस सोयाबीनचे रिसर्च सेंटर ही आहे.
3. भुईमूग (शेंगदाणा तेल ) - भुईमूग हे एक शेंगावर्गीय पीक आहे. भुईमूग हा फेबॅसी या वनस्पती कुटुंबातील आहे. वनस्पती शास्त्रज्ञ कार्ल लिनियस याने या प्रजातीला हायपोगायिया म्हणजे 'जमिनीच्या खाली' असे नाव दिलेले आहे. भुईमूग हे तेल वर्गीय महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकात निराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता असते. भुईमूग म्हणजेच शेंगदाणा याचा वापर बटर तयार करण्यासाठीही केला जातो. शेंगदाणे हे अतिशय पौष्टिक आहार आहे. त्याचमुळे याचे. फिल्टर केलेले तेल स्वयंपाक आणि मार्गारीन बनवण्यासाठी वापरले जाते. शेंगदाणा तेल हे महत्त्वाचे खाद्यतेल आहेच व याचे पेंड पशुखाद्य म्हणूनही वापरले जाते. शेंगदाणे आरोग्य इतकेच लोकप्रिय आहे. ते प्रथिनेचा एक उत्कृष्ट स्तोत्र आहे व त्यात विविध जीवनसत्वे खनिजे आणि वनस्पती संयुगे मोठ्या प्रमाणात आढळतात. वजन कमी करण्याच्या आहाराचा एक भाग म्हणून ते उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर हृदयरोग आणि पित्तदोषाचा धोका कमी करू शकतात. शेंगदाणे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वस्तू तयार करण्यासाठी ही वापरले जातात. त्याचप्रमाणे शेंगदाणा तेलाचा महत्वपूर्ण उपयोग म्हणजे पेंट वार्निश वंगण तेल लेदर ड्रेसिंग फर्निचर पॉलिश कीटकनाशके व साबण आणि बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांमध्ये शेंगदाणा तेलाचा समावेश होतो. त्याचमुळे शेंगदाणे हे मानवी शरीरासाठी पौष्टिक मानले जाते व ते अक्रोड आणि बदामा इतकेच महत्त्वाचे स्थान मिळवते. बरेच लोक शेंगदाण्याला सामान्यांचा बदाम असे ही म्हणतात. म्हणजेच ज्याला महागडे बदाम आपल्या रोजच्या जीवनात खाण्यासाठी विकत घेणे परवडत नाही त्यांनी शेंगदाणे जरी आपल्या खाण्यात उपयोगात आणले तरी ही ते जवळपास बदमा इतकाच आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो.
4. सूर्यफूल तेल - सूर्यफुलाला इंग्रजीमध्ये सनफ्लॉवर, हिंदी व गुजराती सुरज मुखी, व लॅटिनमध्ये हेली ॲथस असे म्हणतात. सूर्यफूल ही एक बारमाही वनस्पती आहे याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व वर्तुळाकार कृतीच्या आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेलेले आहे. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. फार वर्षांपूर्वी सूर्यफुलाची लागवड ही फक्त शोभेसाठी केली जात असे. परंतु आता भारत रशिया व इजिप्त या देशांमध्ये सूर्यफुलाची लागवड हे तेल बियांकरता करण्यात येते. सूर्यफुलाचे पीक हे खरीप आणि रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेता येते कारण हवेतील तापमान व सूर्यप्रकाशाचा कालावधी यांचा या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही. सूर्यफूल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तेल बिया पीक आहे. सूर्यफूल हे पीक सर्व प्रकारच्या हवामानात येऊ शकते. या पिकाच्या वाढीसाठी वाळू मिश्रित जमीन अधिक चांगली असली तरी सूर्यफुलाच्या मूळच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असते. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती व पाककृतीमध्ये वापरले जाते इतर गोड्या तेलांपेक्षा हे किमतीने स्वस्त असते.
5. एरंड तेल - एरंड याला इंग्रजीमध्ये कॅस्टल बीन प्लांट ( castor bean plant, व लॅटिनमध्ये Ricinus communis ) असे म्हणतात. एरंड ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात व एरंडाच्या बियांपासूनच एरंडाचे तेल मिळते. एरंड ही वनस्पती प्रामुख्याने भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका या देशात आढळते. परंतु संपूर्ण जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन हे मात्र भारतातच होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते. एरंडाचे झाड साधारण दोन ते चार मीटर पर्यंत उंच वाढणारे व रानटी अवस्थेत आढळणारे असे असते. याची पाने बिया मूळ आणि तेल याचा औषधी उपयोग केला जातो.एरंडाची पाने हिरवट तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात. त्याचप्रमाणे याचे फळ दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ असे काटे असतात. एरंडीच्या बिया या काळ्या धुरकट रंगाच्या व त्यावर पांढऱ्या रेषा व ठिपके असणाऱ्या असतात यांना एरंडी असेही म्हणतात. एरंडाचे प्रकार हे त्यांच्या रंगावरून करण्यात येतात पांढरा एरंडात दोन उपप्रकार आहेत एक लहान बियांचा एरंड व दुसरा मोठ्या बियांचा एरंड. यांच्या एरंडाचे तेल व मूळ औषधांमध्ये वापरण्यात येते तर मोठ्या बियांच्या एरंडाची पाने औषधात वापरण्यात येतात. त्याचप्रमाणे तांबडा एरंड याचे तेल अधिक तीव्र असते व त्याचा उपयोग विशेषतः औषधांमध्ये वापरण्यात येतो. एरंडाचा उपयोग विशेषतः आयुर्वेदात खूप महत्त्वाचा मानला जातो. वातविकार, कावीळ, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, मूळव्याध, अजीर्ण, आमवात, संधिवात, मेदोरोग , हत्तीरोग, सूज येणे, कृमी होणे, पायाची आग होणे इत्यादी अनेक विकारांवर एरंडाच्या तेलाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. प्राचीन काळी एरंडेल तेलाचा वापर दिव्यांना इंधन देण्यासाठी, डोळ्यांची जळजळ यासारख्या विशेष आजारांवर उपचार करण्यासाठी व गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी देखील केला जात असे. परंतु एरंडाची पाने बिया तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्याने उलट्या होणे जुलाब होणे आम्हाशय व आतड्यांचा अशक्तपणा येण्यासारखे अनेक दुष्परिणाम ही दिसून येतात. एरंडाच्या प्रकारात मोगली एरंड हे एक वेगळेच औषधी झाड आहे. याच्या खोड्या पानांना चीक असल्याने जनावरे याला तोंड लावत नाहीत म्हणून मोगली एरंडाची झाडे कुंपणावर लावतात.
आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.