कथालेखन मराठी | खरा सण | Kathalekhan Marathi | Khara San | Story Writing In Marathi |
![]() |
कथालेखन मराठी - खरा सण - Kathalekhan Marathi - Khara San - Story Writing In Marathi. |
शिर्षक- खरा सण.
एक रहिवासी सोसायटी- अनेक लहान मुलं- पाच मित्र-मैत्रिणी- अजय, मिताली, राधिका, मयंक आणि विपुल- होळी सण जवळ येणे- सोसायटीमध्ये होळी खेळण्याचा कार्यक्रम- अजय उदास होणे- त्याला ताप असणे- होळी खेळताना येणे म्हणून नाराज- त्याला बगीच्यामध्ये बसवणे- मैत्रिणींनी ठरवणे- पाण्याने होळी न खेळता फक्त रंगांनी होळी खेळणे- अजय खुश होणे- सर्वांनी मिठाई खाणे- तात्पर्य सणांमध्ये आनंद शोधा.
एका शहरात नवजीवन नावाच्या एका सोसायटीमध्ये अनेक कुटुंब गुणा गोविंदाने राहत होते. नवजीवन सोसायटी तशी बरीच गजबजलेली आणि अनेक लहान-मोठा कुटुंबांनी भरलेली होती. या सोसायटीत अनेक कुटुंब असल्यामुळे साहजिकच तेथे अनेक लहान मुलेही होती. सोसायटीमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असल्यामुळे वर्षभर कोणताही सणसमारंभ असला की नवजीवन सोसायटी अगदी खुलून उठत असे.
सोसायटीतील लोक एकमेकांशी प्रेमाने व सलोख्याने राहत असल्यामुळे प्रत्येक जण कोणताही लहान मोठा सण असो अगदी मोठ्या उत्साहात साजरा करीत असे. सोसायटीच्या समोरच एक बगीचा होता तेथे मिळून सर्वजण कोणताही सणसमारंभ साजरा करीत असत.
या सोसायटी मधील अनेक मुलांपैकी अजय, मिताली, राधिका, मयंक आणि विपुल या चार-पाच लहान मुला-मुलींचा एक ग्रुप होता. शाळेतून घरी गेल्यावर आपापला गृहपाठ पूर्ण झाल्यावर ते पाच जण दररोज सोसायटी जवळच्या मैदानात खेळायला जमत असत. दररोज त्या सर्वांची चांगलीच गट्टी जमलेली असे. प्रत्येक सण ते सर्व भरपूर जल्लोषात साजरे करत असत.
असे करता करता एके दिवशी होळी हा सण जवळ आला. सोसायटीतील सर्व लोकांनी दरवर्षीप्रमाणे यावेळी ही होळी मोठ्या जल्लोषात साजरी करावी असे कार्यक्रम ठरवले. त्यामुळे ही सर्व मुले ही खूप खुश झाली होती परंतु होळीच्या एक दिवस आधी अचानक अजय या मुलाला थोडा ताप आला.
आपल्याला असा हा अचानक ताप आल्यामुळे आता आपण ही पाण्याची होळी कशी खेळणार हा विचार करून अजय मात्र नाराज होऊन बसला होता. अजयच्या इतर मित्र मैत्रिणींनी त्याच्या चेहऱ्यावरची ती नाराजी पाहिली होती.
होळीचा दिवस उगवला आणि सर्वजण सोसायटी बाहेरील बागेत होळी खेळण्यासाठी एकत्र जमले. परंतु अंगात ताप असल्यामुळे अजय मात्र यातील एका बाकावर एकटाच बसला होता. आता आपले इतर मित्र-मैत्रिणी मात्र पाण्याने होळी खेळणार आणि आपण लांब बसून बघणार यामुळे तो निराश झाला होता. परंतु अजयच्या मनातील हे उदासिन्य त्याच्या मित्र-मैत्रिणींनी ओळखून त्यांनी यावर्षी आपण पाण्याने होळी न खेळता फक्त रंगाने होळी खेळायची असे ठरवले.
रंगाने होळी खेळल्यामुळे अजयला ताप असूनही तो इतर मित्र-मैत्रिणींबरोबर थोडीफार होळी खेळू शकणार होता. हे समजताच त्याला फारच आनंद झाला. आपल्या मित्र-मैत्रिणींनी आपल्याबरोबर होळी खेळण्यासाठी यावर्षी पाण्याचा वापर न करता फक्त रंगाने होळी खेळायचा निर्णय घेतल्याबद्दल अजय त्या सर्वांचा फारच आभारी होता.
अजय व त्याच्या इतर मित्र-मैत्रिणींनी त्या दिवशी रंगांच्या सहाय्याने मनसोक्त होळीचा सण साजरा केला व त्यानंतर सोसायटीतील कार्यक्रमात खूप मिठाईही खाल्ली. अजय खूप खुश दिसत होता व त्याला पाहून त्याचे इतर मित्र-मैत्रिणी ही फारच खुश झाले होते.
अजयच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या या कृतीतून सर्वांनाही शिकवण दिली की, कोणताही सण साजरा करताना तो सण आपण कसा साजरा करतो यापेक्षा त्या सणात आपण तेथील प्रत्येकाला एकत्र आणून त्या सणात मनापासून समाविष्ट करून त्यांना मनसोक्त आनंद कसा प्राप्त करता येईल अशाप्रकारे जर तो साजरा केला तरच तो सण आपण खऱ्या अर्थाने गुण्या-गोविंदाने साजरा केला असे म्हणू शकतो.
तात्पर्य -
( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )
आमचे हे कथालेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.