Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कथालेखन मराठी - मोबाईल वेड - Kathalekhan Marathi - Mobile Ved - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी | मोबाईल वेड | Kathalekhan Marathi | Mobile Ved  | Story Writing In Marathi |



           

             
कथालेखन मराठी -  मोबाईल वेड - Kathalekhan Marathi -  Mobile Ved  - Story Writing In Marathi.
कथालेखन मराठी -  मोबाईल वेड - Kathalekhan Marathi -  Mobile Ved  - Story Writing In Marathi.




शिर्षक - मोबाईल वेड.




मोहन आणि त्याचे आई-वडील- सुखी कुटुंब- मोहनला मोबाईल भेटवस्तू- नेहमी इयरफोन कानामध्ये- वडिलांचे नेहमी रागावणे- लक्ष न देणे- एके दिवशी रस्ता पार करणे- गाडीने हॉर्न देणे- ऐकू न येणे- दुर्घटना- शिकवण- तात्पर्य.



एका गावात मोहन नावाचा एक मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. मोहन आणि त्याचे कुटुंब हे अतिशय आनंदी आणि सुखी कुटुंब होते. मोहन जा अभ्यासात हुशार आणि शिक्षकांचा नेहमी लाडका असलेला विद्यार्थी होता.

मोहनचे कुटुंबीय हे मध्यमवर्गीय असून त्याचे वडील मेहनत करून त्यांचे घर चालवत असत. एके दिवशी मोहनच्या वडिलांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांच्या कंपनीतर्फे एक मोबाईल बक्षीस म्हणून देण्यात आले.

मोहनला मोबाईलची खूप आवड असल्यामुळे त्याने वडिलांकडून ते मोबाईल खूप हट्ट करून मागून घेतले. आपल्या मुलाला आनंदी बघण्यासाठी त्याच्या वडिलांनी स्वतःला मिळालेला मोबाईल मोहनला दिला. मोबाईलच्या मागे जास्त न लागता आपल्या अभ्यासात लक्ष देऊन उरलेल्या वेळात तू मोबाईल वापरू शकतोस असे ही त्यांनी मोहनला सांगितले.

मोहनने वडिलांनी सांगितलेला हा नियम आपण मान्य करू असे वडिलांना आश्वासन देऊन तो मोबाईल स्वतःला घेतला. पहिले काही दिवस मोहन आपल्या अभ्यासाकडे नीट लक्ष देऊन उरलेल्या वेळेत तो मोबाईल वापरत असे परंतु काही दिवसांनी मोहनला त्या मोबाईलचे इतके वेड लागले की तो उठ सुट त्या मोबाईलच वापरीत असताना सर्वांना दिसत असे.

हळूहळू त्याचे अभ्यासावरील लक्ष ही कमी झालेले होते. मोहन मात्र सतत मोबाईल हातात घेऊन त्याचा हेडफोन नेहमी कानात लावून दिवसभर मोबाईल मध्ये गुंतलेला असे. ज्या ज्या वेळी मोहन आई-वडिलांना व शेजारी पाजाऱ्यांना तसेच त्याच्या मित्र-मैत्रिणींना दिसत असे त्याच्या कानात सतत मोबाईलचा हेडफोन लावलेला असेल त्यामुळे त्याच्याशी जो कोणी काही बोलत असे त्याला ते काहीच ऐकू येत नसेल तो आपल्याच मोबाईलचा विश्वात रममाण झालेला असे.

एके दिवशी त्याच्या वडिलांना त्याच्या या अशा सतत हेडफोन कानाला लावून बसलेल्या कृत्याचा राग आला व ते त्याच्यावर फारच रागविले. त्यादिवशी मोहन ने आपल्या वडिलांची माफी मागितली परंतु दुसऱ्या दिवसापासून मोहन जैसे थे वैसे आपल्या रोजच्या वागण्यावरच आला. पुन्हा तो ज्याला दिसेल त्याला हेडफोन कानात घालून आपल्या विश्वात रमलेला झालेलाच दिसू लागला.

मोबाईल आणि त्याच्या हेडफोनने मोहन चे आयुष्य जणू काही गुंतवूनच टाकले होते व ही गोष्ट त्याच्या स्वतःच्या सोडून इतर सर्वांच्या लक्षात येत होती. अनेक वेळा त्याची आई त्याला रागे भरत असे परंतु तो त्याच्या आईच्या बोलण्याकडे ही दुर्लक्ष करीत असे.

एके दिवशी असेच मोहन बाहेर फिरायला निघालेला असता मोहनच्या कानात तेव्हाही हेडफोनच होते व तो मोबाईलवर काहीतरी ऐकत ऐकत रस्त्याने जात होता. मोहन मोबाईलवर गाणी ऐकण्याच्या नादात रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालत होता हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. त्याच्या मागून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला खूप वेळ हॉर्न देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या कानातील हेडफोनमुळे त्याला त्या गाडीचा हॉर्न अजिबात ऐकूच आला नाही व त्याच्या बाबतीत अपघातासारखी एक दुर्घटना घडली.

मोहनला गाडीने धडक दिली होती व त्याच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झालेली होती. आजूबाजूला बरीचसे लोक जमा झाले होते व ते त्याला जवळच्या इस्पितळात घेऊन जात होते. त्यातील अनेक लोकांनी या अपघातात मोहनची चूक आहे व त्याने कानातील हेडफोन लावल्यामुळे गाडीने दिलेला हॉर्न त्याच्या लक्षात आला नाही हे त्याला सांगत होते.

आपल्या कानातील हेडफोन मुळे आपल्या बाबतीत दुर्घटना घडलेली आहे व आपले आई-वडील आपल्याला आतापर्यंत आपल्या भल्याचे समजावत होते परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या बाबतीत हा अपघात घडला आहे ही स्वतःची चूक त्याच्या आत्ता चांगलीच लक्षात आलेली होती.

काही वेळाने तेथे जमलेल्या लोकांनी मोहनच्या आई-वडिलांना त्या इस्पितळात बोलवून घेतली व जसे आई-वडील तेथे पोहोचले तसे मोहनने त्यांची मनापासून क्षमा मागितली व आता आपण या मोबाईलच्या व त्याच्या हेडफोनच्या आहारी अजिबात जाणार नाही असे मोहनने सर्वाना वचन दिले.



तात्पर्य -




( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )




आमचे हे कथालेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close