कथालेखन मराठी - खोटी बोली - Kathalekhan Marathi - Khoti Boli - Story Writing In Marathi.
![]() |
कथालेखन मराठी - खोटी बोली - Kathalekhan Marathi - Khoti Boli - Story Writing In Marathi. |
शिर्षक - खोटी बोली.
शाळेत जाणारा मुलगा- घरून शाळेत जाताना वाटेत खेळत राहणे - शाळेत उशिरा पोचणे- आईच्या कामाचे कारण सांगणे- एक दिवस विटी लागून डोक्यास दुखापत होणे- आईने मारल्याची सबब गुरुजींना सांगणे- गुरुजी चौकशीसाठी मुलाच्या घरी जाणे - थाप उघडकीस येणे- दोघांकडून शिक्षा -धडा.
एका गावात अमित नावाचा एक शाळेत जाणारा विद्यार्थी होता. अमित ची शाळा त्याच्या घरापासून काही अंतरावरच होती त्यामुळे दररोज तो स्वतःच पायी शाळेत येत जात असे. तो दररोज वेळेवर शाळेत जात असे आणि वेळेवर घरी येत असेल त्यामुळे त्याच्या आईला त्याची फारशी चिंता लागत नसे.
परंतु एके दिवशी अमित शाळेत जात असताना वाटेत त्याला काही मुले खेळताना दिसली. तेथे खेळत असलेली मुले विटीदांडूचा खेळ खेळत होती अमितला विटी दांडू हा खेळ पूर्वीपासूनच आवडत असे शाळेत जाण्याच्या वेळेला बाकीचे मुले विटी दांडू खेळत असताना पाहून अमितला शाळेत जाण्याचे काही मन होईना. म्हणून त्याने तिथे खेळणाऱ्या मुलांकडून आपणही त्यांच्यात सामील होऊ शकतो का याची परवानगी घेतली व त्यानंतर त्या मुलांबरोबर तो काही वेळ तेथेच विटी दांडू खेळू लागला.
थोड्यावेळाने खेळ खेळून झाल्यावर अमित नेहमीप्रमाणे शाळेत गेला परंतु आज त्याला शाळेत जायला उशीर झाला होता. अमित हा रोज वेळेवर शाळेत येणारा मुलगा असून आज एकच दिवस त्याला शाळेत यायला उशीर झाल्यामुळे शिक्षक त्याला फारसे काही बोलले नाही.
परंतु त्यानंतर शाळेत जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला विटी दांडू खेळणारे त्याचे मित्र त्याला रोजच खेळायला बोलावू लागले. व तोही शाळेत जाता जाता काही वेळ विटी दांडू खेळून मग शाळेत जाऊ लागला त्यामुळे आता दररोज त्याला शाळेत जायला उशीर होऊ लागले.
आता दररोजच अमितला शाळेत जायला उशीर होत होता आणि हे शिक्षकांच्या चांगलेच लक्षात आले होते त्यामुळे एक दोन वेळा त्यांनी त्याला व्यवस्थित समजावून सांगितले की दररोज शाळेत वेळेवर येत जा.
उद्यापासून आपण शाळेत वेळेवर येऊ अशी शाश्वती अमितने शिक्षकांना दिली होती परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा अमित खेळ खेळून मग शाळेत गेला त्यामुळे त्याला शाळेत जायला पुन्हा उशीर झाला होता. आता मात्र शिक्षक त्याच्यावर फारच रागवले व दररोज त्याला शाळेत यायला का उशीर होतो याबद्दल त्यांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली.
शिक्षकांना जर कळले की आपण शाळेत येता येता काही वेळ थांबून खेळ खेळून येतो तर ते आपल्याला जबन मार देतील किंवा ओरडतील या भीतीने आम्ही त्यांच्याशी खोटं बोलला की शाळेत येताना तो आईला घर कामात थोडी मदत करून येतो त्यामुळे त्याला आजकाल शाळेत यायला उशीर होत आहे.
शिक्षकांना वाटते कदाचित अमित खरंच आईला मदत करत येत असेल म्हणूनच त्याला शाळेत यायला उशीर होत असेल म्हणून शिक्षक त्याला त्या दिवशी काहीच बोलत नाहीत व उद्यापासून जरा लवकर येण्याचा प्रयत्न कर असा सल्ला त्याला देऊन आईला मदत केल्याबद्दल त्याचे कौतुकही करतात.
काही दिवसानंतर अमित विटी दांडू खेळत असताना विटी त्याच्या डोक्याला लागते व त्याच्या डोक्याला जबर दुखापत होते. शिक्षकांना जेव्हा कळतं की अमितच्या डोक्याला मार लागला आहे तेव्हा ते त्याची चौकशी करतात त्यावेळी अमित पुन्हा एकदा खोटे बोलतो की आईने मला मारल्यामुळे माझ्या डोक्यालाही दुखापत झालेली आहे.
शिक्षकांना अमितच्या बोलण्याचं खरे वाटते आणि एवढा चांगला मुलगा जो आईला घर कामात मदत करून आपले शिक्षण ही पूर्ण करत आहे तरीही त्याला का बरे असे मारण्यात आले याची चौकशी करण्यासाठी ते स्वतः अमितच्या घरी जातात.
ज्यावेळी वर्गशिक्षक अमितच्या घरी जातात व आईला या सर्वाबद्दल विचारतात त्यावेळी आईला लक्षात येते की अमित आपल्याबद्दल शिक्षकांना खोटे बोलला आहे. अमित आईला व शिक्षकांना दोघांनाही थाप मारीत होता व खेळायला जात होता हे त्या दोघांच्याही लक्षात येते त्यामुळे ते दोघेही आता अमितला चांगली शिक्षा करायची असे ठरवतात.
अमित आई बद्दल शिक्षकांना व शाळेबद्दल आईला खोटे बोलल्याबद्दल शाळेतील वर्ग शिक्षक व आई दोघेही अमितला चांगलीच शिक्षा देतात व त्याला चांगला धडा शिकवतात म्हणजे यापुढे तो असे खोटे बोलणार नाही.
अमितला स्वतःची खोटी बोली चांगलीच अंगलट आली होती आणि म्हणूनच त्याला स्वतःची ही चूकही लक्षात आल्याबद्दल तो त्याच्या आईची व वर्गशिक्षकांची मनापासून माफी मागतो व पुन्हा असे कधीच वागणार नाही असे त्या दोघांनाही वचन देतो.
तात्पर्य -
( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )
आमचे हे कथालेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.