Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी पत्रलेखन - वाचनाचे महत्त्व कळले सांगणारे मोठ्या भावाला पत्र - Vachnache Mahatva Kalale Sangnare Mothya Bhavala Patra- Letter Writing In Marathi.

मराठी पत्रलेखन | वाचनाचे महत्त्व कळले सांगणारे मोठ्या भावाला पत्र | Vachnache Mahatva kalale Sangnare Mothya Bhavala Patra | Letter Writing In Marathi |





                
मराठी पत्रलेखन - वाचनाचे महत्त्व कळले सांगणारे मोठ्या भावाला पत्र - Vachnache Mahatva kalale Sangnare Mothya Bhavala Patra- Letter Writing In Marathi.
 वाचनाचे महत्त्व कळले सांगणारे मोठ्या भावाला पत्र - Vachnache Mahatva kalale Sangnare Mothya Bhavala Patra- Letter Writing In Marathi.


         

वाचनाचे महत्त्व कळले हे सांगणारे पत्र मोठ्या भावाला लिहा.




दिनांक-


प्रिय अमित दादा,

कसा आहेस? कालच तुझे पत्र मिळाले वाचून खूपच आनंद झाला. तुला आंतर शालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. असाच प्रगती करीत रहा. आम्हा सर्वांच्या वतीने तुला अनेक शुभेच्छा आहेत.

बरे दादा, आज मीही तुला मुद्दामून एक गोष्ट सांगण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. तुला आठवते का मागील वेळी तू जेव्हा सुट्टीत घरी आला होतास तेव्हा माझ्यासाठी निरनिराळ्या गोष्टींची पुस्तके घेऊन आला होतास. त्यानंतर शाळेतील गृहपाठ संपवून फावल्या वेळेत मी ती गोष्टीची पुस्तके नेहमी वाचत असे व अशी अनेक चांगली पुस्तके वाचून मला कधी हळूहळू वाचनाची गोडी कधी निर्माण झाली हे माझे मलाही कळले नाही. त्यानंतर मी शाळेतीलही मराठी,हिंदी, संस्कृत अशा अनेक भाषांची पुस्तके आवडीने वाचू लागलो.

पूर्वी मला ज्या मोठमोठ्या धड्यांचा वाचायला कंटाळा येत असे ते आता मला आवडू लागले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे मला आता माझ्या सहामाही परीक्षेत अगदी उत्तम गुण प्राप्त झालेले आहे. तू मला जे वाचनाचे महत्त्व पटवून दिलेले आहेत त्याचाच हा परिणाम आहे. तुझ्यामुळे मला वाचनाचे महत्त्व लक्षात आले आहे व वाचनामुळे आपल्या भाषेमध्ये शब्द संपत्तीची ही वाढ होते त्यामुळे आपली वकृत्व कला ही सुधारण्यास मदत होते हेही माझ्या लक्षात आलेले आहे.

माझ्या वकृत्व शैलीतील व माझ्या शब्दसामग्रीतील झालेली भर पाहून माझे शिक्षकही आनंदी आहेत. खरंच मला आता वाचनाचे महत्त्व कळलेले आहे व घरी मोकळ्या वेळेत मी वेगवेगळ्या प्रकारचे चांगली पुस्तके त्याचप्रमाणे वर्तमानपत्राचे ही वाचन करतो. त्यामुळे आता माझी इंग्रजी भाषा ही चांगली सुधारलेली आहे.

यावेळी सुट्टीत तू जेव्हा घरी येशील तेव्हा आपण दोघे मिळून खूप मजा करूया व छान छान पुस्तके ही वाचूया व निरनिराळ्या विषयांवर आपली मते मांडूया. मला तुझ्याबरोबर सुट्टी घालवण्यात फारच आनंद होईल. तेव्हा लवकरात लवकर सुट्टी पडल्यावर घरी ये. मी आणि आई-बाबा आम्ही सर्व तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत.


तुझा लहान भाऊ,
समीर.




आमचे हे पत्रलेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close