Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कथालेखन मराठी - विश्वासघात - Kathalekhan Marathi - Vishwasghaat - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी | विश्वासघात | Kathalekhan Marathi | Vishwasghaat | Story Writing In Marathi |



      


               
कथालेखन मराठी - विश्वासघात - Kathalekhan Marathi - Vishwasghaat - Story Writing In Marathi.
कथालेखन मराठी - विश्वासघात - Kathalekhan Marathi - Vishwasghaat - Story Writing In Marathi.




शिर्षक - विश्वासघात.



एक गावकरी-  तिर्थयात्रेला जाणे - स्वत:जवळचे दागिने व्यापारयाजवळ ठेवणे -  परत आल्यावर व्यापाऱ्याकडुन नाकार - दागिने उंदरांनी खाल्ले- गावकऱ्यानी व्यापाऱ्याच्या मुलाला लपवणे - फुलपाखरानी नेले - व्यापाऱ्याने चुक कबुल करणे- तात्पर्य.




एक आटपाट नगर होते. त्या नगरात एक धनाढ्य व्यापारी राहत होता. व्यापाराकडे खूप धन संपत्ती होती. तो दररोज आपल्या व्यापारातून भरपूर नफा कमवत असे. त्यामुळे धनसंपत्ती आणि दाग दागिने हे त्याच्यासाठी रोजचेच झाले होते.

त्याच गावात रामू नावाचा एक गावकरी राहत होता. रामू कष्टाळू व आपल्या मेहनतीने आपले व आपल्या कुटुंबाचे पोटभरीत असे. अशाप्रकारे कष्ट करून रामुने काही पैसे जोडले होते व त्यातून त्याने आपल्या पत्नी व मुलीसाठी काही दागिने बनवून ठेवले होते.

परंतु एके दिवशी रामूला तीर्थयात्रेसाठी काही दिवस आपल्या कुटुंबासह बाहेर जावे लागणार होते. अशावेळी आपल्या घरी असलेले मौल्यवान दागिने आपण असेच घरी सोडून जाऊ शकत नाही त्यामुळे चोरांची व दरोडेखोरांची भीती त्याच्या मनात आली होती. अखेर खूप विचार केल्यानंतर रामूच्या डोक्यात एक कल्पना सुचली.

आपल्या गावातील त्या धनाढ्य व्यापाऱ्याकडे स्वतःचे दाग दागिने व पैसा जमा करण्यासाठी चांगली तिजोरी आहे हे गावात सर्वांनाच माहिती होते. मग जर का आपण आपले दागिने ही काही दिवसांसाठी गावातील त्या व्यापाऱ्याकडे ठेवण्यास दिले तर ते सुखरूप राहतील आपण आपल्या कुटुंबासह तीर्थयात्रेवरून परत आल्यावर ते दागिने सुखरूपपणे व्यापाऱ्याकडून परत घेऊ शकतो.

असा विचार करून रामू त्या गावातील व्यापाऱ्याकडे गेला व त्याने त्या व्यापाऱ्याला विनंती केली की माझे हे दागिने काही दिवसा करिता आपण आपल्याजवळ माझी अमानत म्हणून ठेवू शकाल का? असे झाल्यास मी आपला फारच आभारी राहील. जेणेकरून मला माझे दागिने घरातच ठेवून जाण्यास लागणार नाही व चोरांपासूनही त्यांचे संरक्षण होईल.

व्यापाऱ्याने रामूची ही विनंती मान्य केली व त्याचे सर्व दागिने स्वतःजवळ ठेवले. आता मात्र रामू निश्चितपणे तीर्थयात्रेला आपल्या कुटुंबासह निघून गेला व आपले दागिने व्यापाराकडे सुरक्षित आहेत आणि पुन्हा घरी आल्यावर ते आपल्याला सुखरूपपणे मिळणार आहेत या भावनेने त्याच्या मनातील दागिन्यांच्या चोरी विषयीची चिंता मिटली होती.

व्यापाऱ्याने रामू कडून त्याचे दागिने घेतल्यावर व्यापाऱ्याच्या मनात त्या दागिन्यांना आपलेसे करण्याची हाव निर्माण झाली होती. काहीही करून रामूचे हे दागिने कसे आपले होतील हा विचार व्यापारी करू लागला. पुढे काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी रामू तीर्थयात्रेवरून परत आपल्या घरी आला.

घरी येताच रामू तात्काळ व्यापाऱ्याकडे गेल्या व आपण त्याच्याजवळ ठेवलेले दागिने मागू लागला. व्यापाऱ्याला आता काही केल्या रामूला त्याचे दागिने परत करायचे नव्हते म्हणून त्याने एक युक्ती लढवली. तो रामूला सांगू लागला की तुझे दागिने तर मी सुखरूप ठेवले होते परंतु अचानक एके दिवशी घरी असलेल्या उंदरांनी ते दागिने खाल्ले तेव्हा तुझे दागिने आता माझ्याजवळ नाहीत.कृपया मला माफ कर आणि तू पुन्हा तुझ्या घरी जा.

उंदरांनी माझे दागिने कसे काय खाल्ले असतील हा विचार रामू करू लागला व त्याला मोठा धक्का बसला. पण कष्ट करून एक एक पैसा जोडून आपल्या पत्नी व मुलीसाठी बनवलेले दागिने असे अचानक कसे काय नाहीसे होऊ शकतात हा विचार करूनच तो दुःखी झाला होता. उंदीर दागिने कसे काय खाऊ शकतात? व्यापाऱ्याने सांगितलेले हे कारण काही केल्या रामूला पटत नव्हते व व्यापारी आपले दागिने स्वतःजवळ ठेवण्यासाठी खोटी कारणे देत आहे हे व्यापाराच्या चेहऱ्यावरील भाव पाहून रामूला कळले होते.

तो व्यापाऱ्याला सारखा विनवणी करत होता की कृपया करून असे करू नका आणि माझे दागिने मला परत करा मी खूप विश्वासाने माझे दागिने तुमच्याजवळ ठेवायला दिले होते परंतु आता तुम्ही ते मला देण्यास तयार नाही हे मला कळले आहे. परंतु व्यापाऱ्याने त्याचे काहीही बोलणे ऐकून न घेता सरळ त्याला आपल्या घरातून हाकलून लावले.

रामू खूप दुःखी कष्टी होऊन आपल्या घराच्या दिशेने निघाला परंतु या व्यापाऱ्याला आपण चांगलाच धडा शिकवायचा असेच मनात ठरवून तो आपल्या घरी गेला. त्यानंतर या लोभी व्यापाऱ्याला कसा चांगला धडा शिकवू हा विचार तो दिवस रात्र करू लागला. मग त्याने एक शक्कल लढवली. व्यापाऱ्याला एक लहान मुलगा होता. त्याचे आपल्या मुलावर फारच प्रेम होते हे संपूर्ण गावाला माहीत होते. त्याच्या मुलाला जराही काही दुखले कुठले तर व्यापारी अस्वस्थ होत असे.

एके दिवशी रामू व्यापाऱ्याच्या मुलाला पळवून नेतो व आपल्या घरी लपवतो. अशावेळी अचानक हरवलेल्या आपल्या मुलाची बातमी कळताच व्यापारी अस्वस्थ होतो व सर्वत्र त्याला शोधू लागतो परंतु त्याचा मुलगा काही केल्या मिळत नाही. अशावेळी व्यापाऱ्याचा संशय रामूवर येतो कारण त्याने रामू बरोबर विश्वासघात केलेला असतो त्यामुळे तो रामूला बोलावून घेतो आणि त्याची खूप विनवणी करतो की काही करून माझा मुलगा मला परत दे.

व्यापारी रामूला बोलतो की मला माहित आहे माझा मुलगा तूच लपविला आहेस. मी तुझे दागिने परत करायला तयार आहे परंतु कृपया करून माझा मुलगा तू जेथे लपवला आहेस तेथून मला परत आणून दे.

रामूला व्यापाराच्या मुलाला काही इजा करायची नसते उलट तो त्याचे लाडच करत असतो परंतु व्यापाऱ्याला त्याने केलेल्या चुकीची चांगली अद्दल घडावी म्हणून तो त्याच्या मुलाला लपवून ठेवून देतो.

व्यापाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून रामू त्याला सांगतो की तुमचा मुलगा माझ्याजवळ नाही तर तो फुलपाखरांनी पळवून नेला आहे हे मी पाहिले आहे. एवढेसे फुलपाखरू माझ्या मुलाला कसे काय पळवून घेऊ शकतात? या गोष्टीत काहीही तथ्य नाही असे व्यापारी रामूला बोलतो.

त्याचवेळी रामू तत्काळ त्या व्यापाऱ्याला उत्तर देतो की, जर उंदीर माझे दागिने खाऊ शकतात तर फुलपाखरू तुमच्या मुलाला का नाही नेऊ शकत? हे वाक्य बोलल्यावर व्यापाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव होते व आपण रामूचे दागिने आपल्या हव्याचा पोटी स्वतः जवळच लपवून ठेवल्याबद्दल तो रामू कडे दिलगिरी व्यक्त करतो.

तसेच तो रामूची माफी ही मागतो की, तू खूप विश्वासाने तुझे दागिने माझ्याजवळ ठेवायला दिले असताना मी माझ्या मनातल्या हावेपोटी खोटे बोलून तुझे दागिने स्वतःचे बनवण्याचा चुकीचा प्रयत्न केला होता त्याबद्दल आज तू माझी चांगलीच अद्दल घडवली आहेस व पुन्हा माझ्याकडून असे कधीच होणार नाही. असे बोलून तो रामू चे सर्व दागिने त्याला परत करतो.

व्यापाऱ्याला आपण केलेल्या चुकीची चांगलीच अद्दल घडली आहे हे बघून रामू व्यापाऱ्याच्या मुलाला पुन्हा व्यापाऱ्याजवळ आणून देतो. व्यापाऱ्याच्या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यावा हा रामूचा हेतू नव्हता परंतु व्यापाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव व्हावी हा त्याचा हेतू होता. आपल्या मुलाला पाहून व्यापारी खूप आनंदी होतो व रामूचे आभार मानतो त्याचप्रमाणे व आपले दागिने परत मिळालेले पाहून रामूही खूप आनंदी होतो व खुशी खुशी आपल्या घरी जातो.

त्यानंतर व्यापाऱ्याने रामूचा केलेला विश्वासघात त्याच्या चांगलेच अंगाशी आला होता व पुन्हा तो आता असे काही करणार नव्हता हे मात्र आता स्पष्ट झाले होते.



तात्पर्य -




( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )




आमचे हे कथालेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close