कथालेखन मराठी | जैसे कर्म तैसे फळ | Kathalekhan Marathi | Jaise Karma Taise Fal | Story Writing In Marathi |
![]() |
कथालेखन मराठी - जैसे कर्म तैसे फळ - Kathalekhan Marathi - Jaise Karma Taise Fal - Story Writing In Marathi. |
शिर्षक- जैसे कर्म तैसे फळ.
चार चोर मित्र- चौघाद्वारे चोरी करणे- चोरीचा वाटा समान करण्यासाठी जंगलात जाणे- भूक लागणे- दोन चोर मिठाई घेण्यासाठी जाणे- नियत बिघडणे- मिठाई मध्ये विष मिसळणे- जंगलातील दोन मित्रांच्या मनात हाव सुटणे- मिठाई आणायला गेलेल्या मित्रांना मारण्याची योजना- मिठाई घेण्यासाठी गेलेल्या मित्रांना विहिरीत ढकलणे- स्वतः मिठाई काढल्यावर मरण पावणे- तात्पर्य.
एका नगरात चार चोर मित्र होते. चौघेही एकत्र मिळून अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या चोऱ्या करीत असत आणि दरोडे घालीत असे व चोरी करून मिळालेल्या संपत्तीचा चौघेही नेहमी समान वाटा करीत असत. अशा प्रकारे कित्येक महिने त्यांचा हा उद्योग चालत आलेला होता.
एके दिवशी या चारही चोर मित्रांनी एक मोठी चोरी केली व त्यामुळे त्यांना भरपूर संपत्ती प्राप्त झाली होती. त्या चोरीमध्ये अनेक सोने, नाणे, रत्नजडित हिरे-जवाहारात त्याचप्रमाणे अनेक सुवर्णमुद्राही मिळाल्या होत्या. चोरी करून आलेला इतका सगळा माल पाहून चौघेही चोरमित्र अत्यंत आनंदी झाले व त्यांच्या आनंदाचा पारावर उरत नव्हता.
आपल्याला मिळालेल्या या अमूल्य अफाट संपत्तीचा चौघांनीही समान वाटा करायचा या हेतूने ते चौघेही एका जंगलात जाण्याचे ठरवितात. जंगलात जाऊन मिळालेल्या ऐवजाचे चार समान हिस्से करून आपापला वाटा घेण्यासाठी आतुर झाले होते. ज्यावेळी मिळालेले चोरीचे ऐवज चौघांनी उघडून पाहिले त्यावेळी मात्र चौघेही अवाक झाले होते.
अशातच त्या चौघांनाही खूप भूक लागली. म्हणून त्या चौघांनी पैकी दोघांनी ठरवले की जवळच असलेल्या गावी जाऊन खाण्यासाठी काही मिठाई आणि इतरही खाद्यपदार्थ घेऊन यावे आणि त्यानंतर चौघांचे चोरीच्या ऐवजाचे समान हिस्से करून घ्यावेत. ठरल्याप्रमाणे चार चोर मित्रांपैकी दोन चोर मित्र हे जवळच्या दुकानात खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले.
इथे जंगलात उरलेल्या दोन चोरांच्या मनात खाण्यासाठी आणायला गेलेल्या इतर दोन चोरांचा वाटाही आपणच घ्यावे याबद्दलची हाव निर्माण झाली. परंतु त्यांचाही वाटा जर मिळवायचा असेल तर त्यांना मारणे गरजेचे होते हे या दोघांच्या लक्षात आले होते. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला जे दोन चोर मित्र खाण्याचे आणण्यासाठी गेले होते त्यांच्याही मनात हाव निर्माण झाली व जंगलातील दोन चोरांना मारून त्यांचाही वाटा आपण दोघेही समान वाटून घ्यावा अशी योजना ते दोघेही बनवू लागले. त्याप्रमाणे त्यांनी योजनाही केली व मिठाई आणण्यासाठी गेलेल्या दोन्ही चोरांनी घेतलेल्या मिठाई मध्ये विष मिसळून जंगलात परत गेले.
जंगलातील दोन्ही चोरमित्र आपल्या इतर दोन मित्रांची वाटच पाहत होते. मिठाई घेऊन आलेले दोन्ही चोर हे हात पाय धुण्यासाठी विहिरीवर गेले असता जंगलातील दोन्ही मित्रांनी त्यांना विहिरीत धक्का दिला व विहिरीत पडून त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. आता त्या दोघांनी आणलेली मिठाई व इतर खाद्यपदार्थ आपण मनसोक्त खाऊन त्यांच्या वाटणीचा हिस्साही दोघांमध्ये समान वाटून घेऊ असे ह्या उरलेल्या दोन मित्रांनी ठरवले.
आपल्या चोरीच्या इतक्या अखंड हिस्सातील दोन वाटेकरी कमी झाल्यामुळे हे दोघे खूपच आनंदी होते आनंदाच्या भरात ते घाई घाईत मिठाई खाऊ लागले. मिठाई आणायला गेलेल्या दोन मित्रांनी आणलेल्या मिठाईत आधीच विष कालवले असल्यामुळे इतर दोन मित्रांनी ती मिठाई खाल्ल्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
अशा प्रकारे चारही मित्रांचा जास्त हाव केल्यामुळे व एकमेकांबद्दल एकमेकांच्या मागे कपट कारस्थान केल्यामुळे जागीच मृत्यू झालेला होता. व त्याचमुळे चोरी केलेले अमूल्य ऐवज त्या चौघांपैकी एकाच्याही वाट्याला आलेले नव्हते.
तात्पर्य -
( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )
आमचे हे कथालेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.