Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अभ्यास - मराठी सुलभभारती इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Sulabhbharati standard 7 Question-Answer.

अभ्यास - मराठी सुलभभारती इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Sulabhbharati standard 7 Question-Answer.





                     
अभ्यास - मराठी सुलभभारती इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Sulabhbharati standard 7 Question-Answer.
अभ्यास - मराठी सुलभभारती इयत्ता 7 वी प्रश्नोत्तरे - Marathi Sulabhbharati standard 7 Question-Answer.






2. श्यामचे बंधुप्रेम.



प्र.1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा.


अ ) नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
उ - नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो.

आ ) शामने कोणता निश्चय केला होता?
उ - गणेश चतुर्थीस घरी जाताना धाकट्या भावास कोट किंवा सदरा न्यावयाचा असा शामने निश्चय केला होता.

इ ) लहान भावाला आईने कसे समजावले ?
उ - लहान भावाला आईने समजावले की, "तुझे अण्णा -दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरू. "

ई ) श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?
उ - श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कोर्टकचेरीच्या कामासाठी जात.

उ ) श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
उ - लहान भावासाठी नवीन कोट घेऊन शाम घराकडे निघाला होता त्यामुळे तो आनंदी होता म्हणून त्याला चालण्याचे श्रमच वाटत नव्हते.


प्र - 2)

अ )शामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी?
उ - मफलर, जाकिटे व गरम कोट.

आ ) श्यामने आणलेला नवीन कोड बघून त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न?
उ - हा कोणाचा कोट? पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस? काफीचे दवडलेस? कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?


प्र - 3. का ते लिहा.

अ ) श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते?
उ - शामने आपल्या जवळील जमवलेल्या पैशात आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता तो हातात घेतल्यावर त्याचे डोळे अश्रूंनी न्याले होते.


आ ) श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको' असे म्हटले.
उ - श्याम पावसा पाण्यातून घरी जाण्यास निघाला होता त्यावेळी नदी नाल्यांना पूर आले असतील म्हणून तो ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको' असे म्हटले.


इ ) पिसाईचा पऱ्या दुथडी भरून वाहत होता.
उ - पिसळीच्या पऱ्यांच्या पाण्याला ओढ फार असल्यामुळे पिसायचा पऱ्या दूथडी भरून वाहत होता.


ई ) श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला.
उ - श्यामने आपल्या जमवलेल्या पैशातून आपल्या लहान भावासाठी कोट शिवून आणला होता. तो कोट घेऊन तो पावसा पाण्यातून घरी आला होता. श्यामचे हे बंधुप्रेम पाहून आईला गहिवर आला.



व्याकरण.


अ )


थंड x गरम


सापडणे x हरवणे


सुगंध x दुर्गंध


थोरला x धाकटा


जुना x नवीन


लक्ष x दुर्लक्ष


स्मृती x विस्मृती



आ )
1.  समीरा,विनिता, त्यांनी, निखिल - त्यांनी

2.  मी,सातपुते,त्याने,तिला - सातपुते

3.  हिमालय,सुंदर,प्रसन्न,भव्य - हिमालय

4.  लिहिणे, आम्ही, गाणे,वाचणे- आम्ही.



---------------------------------------------------------------------------------------------------------------



3. माझ्या अंगणात.



प्र.1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा.


अ ) कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?
उ - कवीच्या अंगण्यात मोती पवळ्याची रास पडते.


आ ) रानमेवा कुठे उगवला आहे?
उ - कवीच्या अंगणात रानमेवा उगवला आहे.


इ ) कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे?
उ - रानमेवा दिला घेतल्याने वाढतो असे कवीचे म्हणणे आहे म्हणून होण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे.


ई ) कवीच्या अंगणात पाखरे का येतात?
उ - कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपायला येतात.



प्र.2. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.


अ ) गहू ज्वारीच्या राशीचं राशी शेतात पडल्या आहेत.
गहू शाळावांचं मोती काळ्या रानात सांडलं.


आ ) काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते.
काळ्याक्षार मातीतुनी मोती पवळ्याची रास.


इ ) शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते.
जीव दमतो, शिणतो घास भरवते माय.


ई ) रानातला रानमेवा एकमेकांना देत देत आनंदाने खाऊया.
तिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जण गुण्या. गोविंदाने खावा.



खेळूया शब्दांशी.



1.  काळेश्वर मातीतूनी मोती पवळ्याची रास.

2.  घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय.

3.  दूर उडूनिया जाता आसू येती गालावर.



आ ) समूहदर्शक शब्दांची यादी करा.


1.  लाकडाची - मोळी

2.  केळीचा - घड

3.  मुलांचा- घोळका

4.  पक्षांचा- थवा

5.  प्राण्यांचा- झुंड / कळप

6.  द्राक्षांचा- घड



इ ) खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.


अ ) सांडलं - पडलं.

आ ) रास - मिजास.

इ ) माय - साय.



ई )  खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा.


अ ) खावा- खावे.

आ ) माय - आई.

इ ) घरामंदी - घरामध्ये.

ई ) आसू -अश्रू.



---------------------------------------------------------------------------------------------------------------




4. गोपाळचे शौर्य.



प्र.1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा.


अ ) कर्णागड कुठे वसलेला आहे?
उ - नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या खेडेगावापासून आठ दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.


आ ) 'गाडी थांबवा' असे गोपाळ का ओरडला?
उ - घाटातून गाडी जात असताना वनव्यामुळे लागलेली आग विझवलीच पाहिजे असे गोपाळला वाटले त्यामुळे गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला.


इ ) गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
गोपाळने आग विझवण्यासाठी वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढून आग विझवण्याचा प्रयत्न केला.


ई ) आग वेळेवर विझली नसती तर कोणाचे नुकसान झाले असते?
आग विजवली नसती तर गडाचे तर नुकसान झालेच असते परंतु गुर व गुराख्यांचेही प्राण गेले असते.



प्र.2. कोण कोणास म्हणाले ते सांगा.


अ ) अरे वेड्या ही जंगलाची आग आपण कशी काय विजू शकू?
उ - हे वाक्य शिक्षक गोपाळला म्हणाले.


आ ) माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे ना?
उ - हे वाक्य गोपाळ गुराख्याला म्हणाला.


इ ) पण साहेब हे कसं शक्य आहे मला तर हा वेडेपणाच वाटतो.
उ - हे वाक्य शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थांना म्हणाले.


---------------------------------------------------------------------------------------------------------------



5. दादास पत्र.



प्र.1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.



अ ) विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?
उ - विद्यार्थ्यांना शाळेत विज्ञान केंद्रातर्फे पक्षासंबंधीची चित्रफीत दाखवली होती. ती पाहून पक्षांबद्दलची सांगितलेली माहिती ऐकून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.



आ ) अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्षाबद्दल काय सांगितले?
अभयारण्यातून फिरताना सरांनी माळढोक पक्षाबद्दल असे सांगितले की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला माळढोक हा अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वनविभागांव हे अभयारण्य घोषित केलेला आहे माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. शिवाय इतर पक्षांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते.



---------------------------------------------------------------------------------------------------------------



6. टप टप पडती.



प्र. 1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा.


अ ) कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?
उ - कवितेतील मुलांच्या अंगावरती जेव्हा टप टप प्राजक्ताची फुले पडतात तेव्हा त्यांचे गाणे जुळून येते.


आ ) गवत खुशीने का डुलते?
उ - वारा भराराने येतो तेव्हा गवत खुशीने डुलते.


इ ) मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते?
उ - मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, व मोर पिसारा फुलते.


ई ) कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?
उ - जे सुरात सूर मिसळून गाणे गात नाहीत त्यांना कवितेत खुळे म्हटले आहे.




प्र.2. कवितेच्या खाली ओळी पूर्ण करा.


अ ) कुरणावरती,
कुरणावरती, झाडाखाली ऊन सावली विणते जाळी येतो वारा पहा भरारा,गवत खुशीने डुले!


आ ) हसते धरती
हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले!


इ ) पाऊस, वारा
पाऊस, वारा, मोर पिसारा या गाण्यातून फुले!



---------------------------------------------------------------------------------------------------------------


7. आजारी पडण्याचा प्रयोग.



प्र.1. केव्हा ते लिहा.


अ ) पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे वाटू लागले.
उ - पाठातील मुलाच्या घरचे कोणी ना कोणी सतत आजारी पडत असे त्यामुळे त्यांच्या दुःखात आपणही आजारी पडून सहभागी व्हावे असे मुलाला वाटू लागले.



आ ) मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
उ - मुलाच्या घरातील मंडळी बऱ्याच वेळा आजारी पडत होते परंतु मुलगा स्वतः कधीही आजारी पडत नव्हता त्यामुळे डॉक्टरांकडून काहीही झाले तरी स्वतःसाठी ही औषध आणायचे तसे मुलाने ठरवले.



इ ) मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.
उ - ज्यावेळी डॉक्टरांनी मुलाला तपासले व त्यांच्या गळ्यातील नळी छातीवर लावली,जीभ बघितली तेव्हा मुलाला धन्य झाल्यासारखे वाटले.



ई ) डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली.

उ - ज्यावेळी डॉक्टरांनी मुलाला सांगितले की तुझी तब्येत अगदी ठणठणीत आहे व तुला औषध देण्याची काही गरज नाही तेव्हा तू आता घरी जा. डॉक्टरांचे हे म्हणणे ऐकून मुलाची निराशा झाली.




---------------------------------------------------------------------------------------------------------------


8. शब्दांचे घर.



प्र.1. कोण ते लिहा.


अ) शब्दांच्या घरात राहणारे- स्वर.

आ ) घरात एकोप्याने खेळणारे- काना, मात्रा,वेलांटी, विरामचिन्हे.

इ ) अवतीभवती झिरपणारे - गाणे.



प्र. 2. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.


1) घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ.


2) एखाद्याची धुसफुस सुद्धा हवीहवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान.


3) कानो का ने कुछ पुसताना अंकुर मन कोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा.



---------------------------------------------------------------------------------------------------------------




9. वाचनाचे वेड.




प्र.1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा.



अ ) सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?
उ - सोनालीने अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत असे तिच्या आईला वाटत होते.



आ ) सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते?
उ - आईने सोनालीला दिलेले पुस्तक सोनाली पुन्हा वाचत होती हे पाहून तिच्या घरच्यांना नवल. वाटत होते



इ ) सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले?
उ - सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले.




प्र.2. खालील घटना मागील कारणे लिहा.


अ ) आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
उ - सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.



आ ) आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.
उ - गोष्टीच्या पुस्तकातून वाचलेल्या कथांपैकी नक्की कोणती कथा निवडावी हे सोनालीला कळत नसल्यामुळे आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला.



इ ) सोनालीला आता 'पुस्तक वाचत जा' असे सांगण्याची गरज उरली नव्हती.
उ - सोनालीला आता पुस्तक वाचत जा असं सांगण्याची गरज उरली नव्हती कारण तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करण्याचे ठरवले होते व तिच्या बाबांनी ही तिच्या वाढदिवसाला तिला एक छानसे पुस्तक भेट म्हणून दिले होते.



---------------------------------------------------------------------------------------------------------------



10. पंडिता रमाबाई.




प्र.1. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


अ ) पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली?
उ - शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिल्या पाहिजेत अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशन कडे केली.



आ ) पंडिता रमाबाईंना स्त्री जाती विषयी अपार प्रेम होते हे त्यांच्या कोणत्या उदगारावरून समजते?
उ - मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही श्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. त्यांच्या या उद्गारावरून समजते की पंडिता रमाबाईंना स्त्री जाती विषयी अपार प्रेम होते.


इ ) पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते.
उ - अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर (चर्च) बांधताना काटकसर म्हणून पंडिता रमाबाईंनी स्वतः डोक्यावर विटांचे गमले वाहून बांधकामाला हातभार लावला होता यावरून पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे जाणवते.



प्र.2. खालील चौकटी पूर्ण करा.


अ ) पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्यासोबत झाला- बिपिन बिहारी मेधावी.

आ ) त्यांच्या मुलीचे नाव- मनोरमा

इ ) अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी- ब्रेल लिपी

ई ) सहस्त्रकातिल कर्मयोगिनी - पंडिता रमाबाई.




प्र.3. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन मध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा.

पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन मध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांमध्ये केळीच्या सोप्या पासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस,स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुकूटपालन, सांडपाणी - मैल्यापासून खत,  भांड्यांवर नावे घालणे,भांड्यांना कलई करणे,  हात मागावर कापड -सतरंज्या विणणे,  घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे- सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे- पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबी काम अनेक उद्योग सुरू केले होते.




---------------------------------------------------------------------------------------------------------------



11. लेक



प्र.1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा.


अ ) लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?
उ - लेख घरात नसताना कवियत्रीच्या उरास आस लागते व वेळ जागच्या जागीच थांबते आणि कवियत्रीचे मनही उदास होते.



आ ) कवित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे?
उ - लेक घरी असली की साऱ्या घरात हसत असते म्हणून कवियत्रीने तिला बोलकी चिमणी असे म्हटले आहे.



इ ) कवितेतील लेक केव्हा रुसून बसते?
उ - कवितेतील लेकीला थोडे रागवले की लेक रुसून बसते.




---------------------------------------------------------------------------------------------------------------




12. रोजनिशी.




प्र.1. खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.


अ ) वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला?

उ - वैष्णवीच्या शाळेत बाल दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आली शाळेतील मुलांनी पारंपारिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचन सादर केली या स्पर्धेमध्ये वैष्णवीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्ष भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला अशा प्रकारे वैष्णवीच्या शाळेत बाल दिन साजरा झाला.




आ ) शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली?

उ - शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी ज्वारीची कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढराशुभ्र कापूस पाहिला. त्याच बरोबर पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व फळे ही पहिली.




इ ) वैष्णवीचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा झाला?

उ - वैष्णवी च्या वाढदिवसानिमित्त सर्वजण आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेले. त्या वसतिगृहातील आदिवासी दुर्गम भागातील मुलं मुली शिक्षणासाठी राहतात. त्या सर्व मुलांना वैष्णवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊचे वाटप केलं. अशाप्रकारे वैष्णवी चा वाढदिवस साजरा झाला.




प्र.2.
अ ) वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले?
विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपापल्या मताने लिहावे.



आ ) वैष्णवीला गहिवरून आले.

आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील आदिवासी दुर्गम भागातील मुलं मुली आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेत होते त्यांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले.




---------------------------------------------------------------------------------------------------------------



13. अदलाबदल.



प्र.1. खालील आकृती पूर्ण करा.

अमृत व हिसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी.



प्र.2. खाली दिलेल्या वाक्याचा योग्य घटनाक्रम लिहा.

अ ) एका वात्र्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.

आ ) अमृत व इसाबने शर्टाची अदलाबदल केली.

इ ) गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.

ई ) अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.

उ ) हसन बाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार बाजारच्या बायकाही तिथे जमल्या.



प्र.3. पुढील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार लिहा.


अ ) घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी गळ घातली.


आ ) बाळू नवीन छत्री कुठेतरी विसरू नका हे पाहून आईचा पारा चढला.


इ ) रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या पोटात गोळा आला.


ई ) त्याची करून कहाणी ऐकून सर्वांची मने हेलकावून गेली.



---------------------------------------------------------------------------------------------------------------







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close