Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल एक शाप की वरदान - Mobile Ek Shap ki Vardan- मराठी निबंध

 मोबाईल एक शाप की वरदान | Mobile Ek Shap ki Vardan | Mobile Is A Curse Or A Blessing Essay In Marathi.


मोबाईल एक शाप की वरदान


moble- shap-vardan
मोबाईल - शाप की वरदान 


मित्र मैत्रिणींनो, मोबाईल आज कोणाकडे नाही ते सांगा? बहुतेक सर्वांकडेच आज मोबाईल आहे हो ना? पण खरंच यां मोबाईलने आपले जीवन सुखकर केलय की त्याचा काही उलट परिणाम आपल्यावर झालाय?  त्या मोबाईल आपल्यासाठी एक शाप आहे की वरदान यावर आज आपण थोडा विचार करूया. चला तर मग बघूया मोबाईल शाप की वरदान?

पूर्वी एखादी व्यक्ती घराबाहेर कामानिमित्त जात असेल तर तो पाकीट, पैसे, चाव्या, पेन हे सगळं बरोबर घेतलंय की नाही ते आवर्जून बघायचे पण कालांतराने त्यात भर पडली ते अजून एका महत्वाच्या वस्तूची ती म्हणजे मोबाईल. होय! मोबाईल. मोबाईल ही वस्तू हळू हळू आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग कधी बनली ते आपल्यालाच कळलं नाही.

काही वर्षांपूर्वी, ज्या वेळी लोकांकडे घरगुती लँडलाईन फोन होते. त्या वेळी लोक फक्त महत्वाचे निरोप देण्यासाठी किंवा आमंत्रण देण्यासाठी, एकमेकांची खुशाली विचारण्यासाठी कमीत कमी शब्दात त्यावर बोलायचे. त्या वेळी लँडलाईन फोनही खूप कमी लोकांकडे होते. ज्यांच्याकडे घरी फोन नसत ते आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला सार्वजनिक टेलेफोन वरून फोन करत असत.

त्यानंतर मोबाईल या वस्तूची आपल्या सर्वाना ओळख झाली. मोबाईल ही वस्तू म्हणजे आपण हवे तेव्हा हवे त्या आपल्या लोकांना संपर्क करू शकणारे एक उपकरण. हळू हळू उपकरण प्रत्येकाच्या हातात दिसू लागले आणि तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनला.

मोबाईल हातात आला आणि लोकांच्या आयुष्यात खुपश्या गोष्टी सुखकर झाल्या. पूर्वी घरातून कामानिमित्त बाहेर गेलेली आपली व्यक्ती संद्याकाळी परत घरी येईपर्यंत घरची लोक काळजी करत असत पण मोबाईल मुळे आता लगेच एकमेकांना फोन करून माहिती करता येते त्याचप्रमाणे काही प्रसंग अचानक घडले तर एकमेकांना लगेच संपर्क करू शकतो. 

काही मुले शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त घरापासून लांब बाहेरगावी राहतात त्यांच्या पालकांना रोज त्यांच्याकडे संपर्क साधता येते जे पूर्वी थोडे अवघड होते. आजच्या महागाईच्या जगात आज कित्येक जोडप्यानं दोघांनाही कामासाठी बाहेर पडावं लागत त्यांच्या घरी जर वयस्कर मंडळी असतील किंवा त्याच्याबरोबर लहान मुले पण असतील तरी मध्ये मध्ये त्यांची विचारपूस करण्यासाठी हा मोबाईल उपयोगी पडतो.

आजची स्त्री ही स्वावलंबी आहे ती ही घराबाहेर पडून नोकरीं करते आणि घराला बरोबरीचा हातभार लावते परंतु कधी कधी कामानिमित्त जर तिला उशिरा प्रवास करावा लागला तरी तिच्या सुरक्षेसाठी मोबाईलची भूमिका खुप महत्वाची ठरते.

जसं जसं तंत्रन्यान वाढल तस तस मोबाईलचे स्वरूपही बदलत गेले. पहिल्यांदा मोबाईल वर फोन केल्यावर आणि फोन आल्यावर पण पैसे मोजावे लागत असत परंतु हळू हळू ते स्वरूप बदलत गेले त्याच प्रमाणे आता तर मोबाईलवर आपण आपल्या व्यक्तीला बघू शकतो त्यांच्या कडे बोलू शकतो हे खरच खूप चांगलं आहे. 

मोबाईलवर खुपश्या गोष्टी बघून आपण त्या समजू शकतो शिकू शकतो. उदा. वेगवेगळ्या पाककृती, मनोरंजनासाठी चित्रपट, योगा, लहान मुलांसाठी गोष्टी गाणी, जगात आणि देशात काय चाललय त्या बातम्या असं जवळजवळ सगळंच जे आपल्याला विरंगुळा देऊ शकते ते यां एकच मोबाईल मध्ये आपल्याला मिळते आणि ते ही कधी ही कुठेही. 

सर्वात महत्वाचे आणि उपयुक्त म्हणजे दैनंदिन जीवनातील गरजांना उपयोगी ठरणाऱ्या ज्या कम्पुटर निगडित तांत्रिक बाबी आपण वापरू शकतो त्या ही मोबाईलच्या माध्यमातून आपण शिकू शकतो आणि आपला वेळ आणि मेहनत वाचवू शकतो. उदा. विजेचे बिल ऑनलाईन भरणे, शाळेची फी असो किंवा मोबाईल चे बिल असो अशा छोट्या मोठया गोष्टी आपण मोबाईल च्या माध्यमातून घरी बसल्या पुर्ण करू शकतो.

पूर्वी आपण बाहेर सहलीला गेलो की कॅमेरा न्यावा लागायचा जेणेकरून आपण आपल्या त्या सुंदर आठवणी त्यात साठून ठेऊ शकू परंतु ते कामही आता मोबाईल मुळे सोपे झाले आहे कारण त्यात आपण फोटोही काढू शकतो आणि विडिओ ही काढू शकतो. त्याच बरोबर ते त्याच वेळी आपल्या मित्रपरिवारास सोशल मीडिया वर टाकून शेयर पण करू शकतो. आणि आपल्या आनंदात एकमेकांना सामील करू शकतो.

सद्या नजरेस आलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल मुळे आज मुले घरी बसून ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. त्याच्या शिक्षणात कोणतीच अडचण येऊ नये यात मोबाईलचा महत्वाचा वाटा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.

मोबाईलमुळे एकाअर्थी जग जवळ आलं आहे पण त्याची दुसरी बाजू म्हणजे आपण त्याच मोबाईलमुळे एकमेकांपासून लांबही गेलो आहोत. ज्या मोबाईलने आपल्याला जगात कुठे काय चाललय ते एका क्लिक वर समजण्याइतकं जवळ आणलय त्याच मोबाईलमुळे एकाच घरात राहून माणसामध्ये कुठे तरी दुरावा पण वाढला आहे. म्हणजे मोबाईल मुले आपण जगाच्या विज्ञानाच्या आणि अनोळखी लोकांच्या जवळ येतोय पण घरातल्या घरात राहणाऱ्या आपल्या जवळच्या लोकांपासून लांब होत चाललोय. 

आज प्रत्येकजण आपल्या कामातून दमून स्वतःला एकांत शोधतो त्यात त्याला आपल्या जवळच्या लोकांबरोबर बोलण्यापेक्षा मोबाईल मध्ये जास्त रस येते. अगदी घरातील लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत प्रत्येकजण मोबाइलच्या जगात जास्त आनंदी दिसतो. घरातील लहान मुले सतत मोबाईल वर गेम खेळत बसतात त्यामुळे आजकाल पूर्वीच्या मनाने कमी वयातच लहान मुलांना चष्मा लागू लागला आहे. लोक सोशल मीडिया वर जास्त रमू लागलेत. 

आपल्या दैनंदिन जीवनात सतत काय चालू आहे ते लोक त्यावर पोस्ट करू लागलेत परंतु त्यावर समाजातील वाईट प्रवुत्तीही लक्ष ठेऊन असतात हे काही लोकांना लक्षात येत नाही. आणि नंतर त्यातील काही लोकांना याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. मोबाईलमुळे काही लोक सतत एकमेकांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात त्यामुळे ही नात्यामध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे.

पूर्वी लोक एखाद्या समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांच्या घरी जात असत परंतु आता ते मोबाईलवरच अशी कामे करून टाकतात त्यामुळे लोकांचे एकमेकांकडे जाणे येणे ही कमी झाले आहे.

तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मोबाईलच्या या तंत्रन्यानाचा वापर आपल्याला आपल्या चांगल्या कामासाठी करून घेता आला पाहिले आपल्या प्रगतीसाठी त्याची अजून कशी मदत मिळवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे त्याच बरोबर त्याच्यामुळे आपल्याला कोणते नुकसान होऊ नये यासाठी ही नेहमी दक्ष राहिले पाहिजे व आपल्या जवळच्या लोकांची ही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते या मोबाईलच्या जाळ्यात ओढले जाऊ नयेत.

जसे एखादया गोष्टीचे चांगले परिणाम असतात तसेच त्याचे दुसपरिणामही असतात त्यामुळे आता आपण स्वतः च योग्य तो निर्णय घावा की या मोबाईलला  आपण आपल्या आयुष्यात नक्की काय बनू द्यावे "शाप की वरदान "!





आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. 









close