प्रदूषण एक समस्या- Pradushan Ek Samsya.
![]() |
प्रदूषण - एक समस्या. |
1. ध्वनी प्रदूषण : आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी अशा घडत असतात ज्यामुळे आपल्या कानांना त्रास होत असतो म्हणजेच ते ध्वनी प्रदूषण होत असते. मग हे ध्वनी प्रदूषण कोणत्याही प्रकाराने होऊ शकते जसे की बाहेर गेल्यावर रस्त्यावर गाड्यांचे हॉर्न काही लोक उगाच वाजवीत असतात. फक्त गरजेच्या वेळी गाडीच्या हॉर्न चा वापर करणे हितकर असते. परंतु काही लोक ही बाब लक्षातच घेत नाहीत. त्याचप्रमाणे जसे आपण एखादया लग्न समारंभाला गेलो असता किंवा एखादया सणासुदीला ही लोक जोरजोरात बँड बाजा वाजवीत जातात, किंवा मोठमोठया मिरवणूकांमध्येही ढोल ताशे वाजविले जातात त्यात खूप आवाज होतो आणि यामुळे मुख्यतः घरातील तान्हीबाळे, आजारी लोक आणि वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होतो. काही वेळा सणासुदीला लोक मोठमोठे फटाके वाजवितात. अशा वेळी ही ध्वनी प्रदूषणाचा त्रास खूप जाणवतो. यामुळे कित्येक लोकांच्या कानाचे आजार होतात. तर कित्येक लोकांची तर कायमची आपली ऐकण्याची श्रवणशक्ती संपून जाते.
2. जलप्रदुषण : जलप्रदूषण ही समस्या ही काही कमी नाही आहे. बहुतेक लोक सणासुदीला घरासाठी फुलांचे तोरण आणि पूजेसाठी फुले आणतात. परंतु दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य व्यवस्थित कुंडीत न टाकता ते नदीत किंवा तलावात वाहून टाकतात. त्यामुळे ते पाणी दूषित होते. ते हार फुले गाळ बनवून साचून राहते. त्याचप्रमाणे काही रासायनिक कंपन्या ह्या त्याचा रासायनिक निचरा आजूबाजूच्या नदीत किंवा तलावात सोडतात. त्यामुळे ते पाणी दूषित होऊन जाते. आणि त्यामुळे तलावातील माशांचा जीव धोक्यात येतो. पाणी प्रदूषित झाल्यामुळे त्या पाण्याला दुर्गंध येतो. आणि आजूबाजूच्या परिसरातील राहणाऱ्या लोकवस्तीतल्या लोकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. कारण अशा दूषित पाण्यामध्ये मच्छर प्रजाजनासाठी उपयोग करतात. आणि त्यामुळे जास्त रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे काही लोक नदी किनारी किंवा समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारायला आणि फिरावयास जातात तेव्हा खाण्याच्या वास्तूवरचे प्लास्टिक कव्हर पाण्यात टाकून देतात आणि ते प्लास्टिक जर माशांनी खाल्ले तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घेणेही आवश्यक आहे.
3. वायू प्रदूषण : वायुप्रदूषण ही सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला एका एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सतत वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे आजकाल प्रत्येकाकडे लहानमोठे वाहन असते आणि ती काळाची गरजही आहे. अशा वेळी बाहेर अनेक वाहने झाली आहेत त्यामुळे त्यामधून निघणारे धूर आपल्याला हानिकारक असते. त्या धुरामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार उध्दभवू शकतात. आपल्यला श्वासासंबधीत आजार होउ शकतात. शहरात किंवा गावाशेजारी जे कारखाने असतात त्यामधून निघणाऱ्या धुरामुळेही आपल्याला वायू प्रदूषणाचा त्रास होतो. यामुळे हवाही प्रदूषित होते व आपल्याला जीवनासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन प्राप्त करण्यास त्रास होतो.
4. मृदा प्रदूषण : साधारणतः आपण सार्वजण वरील तीन प्रदूषणांचा नेहमीच विचार करतो परंतु अजूनही एक गंभीर होत चाललेले सद्याचे एक प्रदूषण आहे ते म्हणजे मृदा प्रदूषण. मृदा प्रदूषण मुख्यतः सध्या चालू असलेले औद्योगीकरण आणि नको असलेलं टाकाऊ पदार्थ प्रक्रिया न करता तसेच ठेवणे यामुळे मृदा प्रदूषणाचे प्रकार जास्त वाढत चालले आहेत. त्याच प्रमाणे शहरांत खाणकाम ही वाढत चालेले आहेत ही ही याचे एक कारण आहे. या मृदा प्रदूषणामुळे ज्या मातीमध्ये आपण शेती करतो धान्य उगवतो तिचं जर प्रदूषित असेल तर मनुष्याबरोबरच प्राण्यानांही कमी दर्जाचे अन्न मिळते. आणि त्या मृदेचा दर्जा ही खालवतो. आणि हळू हळू अशी मृदा अनुपयुक्त होते.
अशा या घातक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काही उपाय स्वतःकडून करू शकतो.
• शक्य तितक्या वेळा जवळपास प्रवास करावयावचे असल्यास सार्वजनिक वाहनाचा वापर करावा जेणेकरून प्रदूषण थोडे कमी होऊ शकेल.
• जर एखादी मिरवणूक काढायची असल्यास कमी आवाजात भोंगे वाजवावेत. ढोल ताशे वाजवीताना आजूबाजूला एखादे हॉस्पिटल असल्यास तेथील आजारी व्यक्तींना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
• कारखान्यातील निचरा नदीपात्रात न सोडता त्यासाठी योग्यती व्यवस्था करावी. जेणेकरून तेथील जवळील रहिवश्याना आणि त्या नदीतील अथवा तलवातील माश्याना व अन्य जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका होणार नाही.
• नदी, तलाव अथवा समुद्रामध्ये कधीही प्लास्टिक फेकू नये.
अशा काही लहानमोठया बाबी लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला या वेगवेगळ्या प्रदूषणाच्या समस्यांपासून होणारा त्रास थोडा कमी होईल. आणि आपले आरोग्य सुखकर होईल.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.