मी सफाई कर्मचारी बोलतोय-Mi Safai Karmachari Boltoy-Autobiography Of Sweeper Essay In Marathi.
![]() |
सफाई कर्मचारी |
मित्रमैत्रिणींनो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वावरताना आपण आजूबाजूला पडलेला जो कचरा बघतो त्या कचऱ्याची साफ - सफाई जी व्यक्ती करते त्याला सफाई कर्मचारी असे बोलतात. आज आपण अशाच एका सफाई कर्मचाऱ्याचे आत्मवृत्त किंवा एका सफाई कर्मचाऱ्याचे मनोगत पाहणार आहोत.
नमस्कार, माझे नाव दिनू आहे. आणि मी एक सफाई कर्मचारी आहे. होय, अगदी बरोबर एक सफाई कर्मचारी बोलतोय. माझे काम आहे तुमच्या आसपासच्या परिसतील कचरा जमा करून घेऊन जाणे. तुम्ही कदाचित रस्त्याने येता जाता मला आणि माझ्या सारख्या माझ्या इतर सहकाऱ्यांना कधी ना कधी नक्कीच बघितले असेल परंतु तुम्हाला त्यात काही विशेष असे लक्ष देण्यासारखे वाटले नसेल. बरोबर ना? त्यात मला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण मला त्याची आता सवय झाली आहे.
दिवसभर कामासाठी धावपळ करणारी लोक जेव्हा कचऱ्याचा डबा बाजूला असेल तर रस्ता बदलून थोडे लांबून निघून जातात कारण त्यांना तो दुर्गंध सहन होत नाही किंवा त्या कचऱ्यातील घाणीमुळे एखादी रोगराई होईल या भीतीने तुम्ही लांबच राहता. परंतु तुम्ही सर्वांनी कधी माझा विचार केला आहे का? सफाई कर्मचारी म्हणजेच रोज तुम्ही टाकलेला कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी जो रोज सकाळी न चुकता येतो तो मी.
मी रोज सकाळी येऊन तुमच्या दारातील, तुमच्या सोसायटीतील आणि तुमच्या आसपासच्या पारिसरातील कचरा गाडीमध्ये टाकून घेऊन जातो. ज्या कचऱ्याच्या जराश्या दुर्गंधीमुळे तुम्हाला श्वास घेणं असह्य होत त्यालाच मी आणि माझे इतर सहकारी उचलून घेऊन जातो जेणेकरून तुमचे आसपासचे परिसर स्वच्छ राहील. पण हे करीत असताना आम्हालाही या दुर्गधीचा त्रास होतो ह्याची जाणीव कदाचित कोणाला होत नसावी.
रोज न चुकता आमचा संपर्क या साफ सफाई मध्ये वेगवेगळ्या गोष्टीशी येतो त्यावेळी रोगराई होण्याची शक्यता एका सफाई कर्मचाऱ्याला जास्त असू शकते हे कोणाच्या कधी ध्यानातही येत नाही. सतत अशा साफ सफाईच्या कामामुळे बहुतेक वेळा माझ्या कपड्यांना दुर्गंधी ही येते परंतु मी ते नित्यानियमाने करतो. कारण माझे काम हे मी माझी जबाबदारी समजतो.
मला माझ्या कर्तव्यची पुर्ण जाणीव आहे की जर मी एक जरी दिवस सुट्टी केली तर खूप खोळंबा होऊ शकतो. त्याच प्रमाणे ज्या वेळी सणासुदीला इतर लोकांना सुट्टी असते पण मला नसते कारण जर मी सुट्टी घेतली तर तुमच्या घरातील आणि परिसरातील कचरा त्या दिवशी तसाच पडून राहील. आणि सणाच्या दिवशीचा आनंद तुम्हाला नीट उपभोगता येणार नाही. या कामामुळे कित्येक वेळा मला माझ्या कुटूंबाला सणासुदीला वेळ देता येत नाही त्याची मला खंत वाटते परंतु माझ्यामुळे कित्येक लोक स्वच्छ वातावरणात राहू शकतात याचा ही मला अभिमान आहे.
माझ्यासारखे अजून खूप सफाई कर्मचारी आहेत जे त्यांचे काम खूप मनापासून आणि अभिमानाने करतात. जसे शाळेतील सफाई कर्मचारी असो ज्यांना लहान मुलांनी टाकलेले कागदाचे छोटे छोटे तुकडे, पेन्सिलची टोक, किंवा अगदी डब्ब्यात आणलेले अन्न असो सगळच जमा कराव लागत तर कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांना रोजच्या रोज टेबलं खुर्च्या स्वच्छ करून, कमप्यूटर आणि फाईल स्वच्छ करावे लागते.
त्याच बरोबर तुमच्या घरी घरकामासाठी ज्या बाई येतात त्या ही तुमच घरी रोज नीट स्वच्छ करून देतात. हे सगळे सफाई कर्मचारी आपापली कामे खूप मनापासून आणि जबादारीने करतात. कारण आम्हा सर्वाना माहित आहे की आमचे काम खूप मह्त्वाचे आहे.
जर आम्ही रोजच्या रोज साफ सफाई केली नाही तर लोकांना त्यांनी कामे करण्यात त्रास होऊ शकतो. घाणीमुळे आणि दुर्गंधी मुळे त्यांचे मन प्रसन्न आणि सकारात्मक राहणार नाही.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.