Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मकरसंक्रात सण - Makarsankrant San -मराठी निबंध- Makarsankrant Festival- वर्णनात्मक

 मकरसंक्रात सण -Makarsankrant Festival.


        
         
मकरसंक्रात - Makarsankrant.
मकरसंक्रात -  Makarsankrant.


            

मकरसंक्रांत हा सण म्हंटल की " तिळगुळ घ्या गोड गोड बोला " हे वाक्य तर आपण लहानपणापासून ऐकतच आलो आहोत परंतु या सणाबद्दल आपण आज थोडी माहिती ही जाणून घेणार आहोत.


मकरसंक्रांत हा सण जानेवारी महिन्याच्या साधारणपणे चौदा तारखेला येतो. जानेवारी महिन्यात तशी बऱ्यापैकी थंडी चालू झालेली असते. अशा वेळी थंडीचे वातावरण सगळीकडे पसरलेले असते. म्हणून या वेळी तिळाचे लाडू बनवितात कारण तीळ हे उष्ण असते आणि तीळ खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. त्या तिळाच्या लाडू मध्ये गूळ मिसळून तिळगुळाचे लाडू बनवितात.

मकरसंक्रातीला हे तिळगुळाचे लाडू एकमेकांना देण्याची पद्धत आहे कारण थंडी मध्ये शरीराला उष्णतेची गरज असते आणि गुळामध्ये गोडवा असतो त्यामुळे एकमेकांना हे लाडू देऊन आपापसातील प्रेमाचा आणि स्नेहाचा गोडवा वाढत राहावा अशी या मागची भावना असते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाला या तिळगुळाच्या लाडूचे खूप महत्व असते. लोक एकमेकांना हे लाडू देताना   " तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला " असे म्हणतात. या दिवशी विवाहित स्त्रिया सुगड पूजतात आणि एकमेकींना हळदी कुंकू लावून 'वाण' म्हणून काही तरी वस्तू देतात ही पद्धत आहे. या दिवशी जेवणाला पुरण पोळी ही बनवितात. 

मकरसंक्रांतीच्या दिवशी लोक 'पतंग' ही उडवतात. मुले एकमेकांबरोबर पतंग उडवण्याच्या स्पर्धाही लावतात. या दिवशी आकाशात खूप साऱ्या पतंगी दिसतात. या पतंगाच्या स्पर्धा बघायला खूप मज्जा येते. संक्रांतीच्या दिवशी नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून तिचे कौतुक करण्याची पद्धत आहे. या दिवशी स्त्रिया काळी साडी नेसतात. संक्रांत ही एक देवता असून ती प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते असे मानण्याची पद्धत आहे.

जसे संक्रांतीच्या दिवसाला महत्व आहे त्याच प्रमाणे त्याच्या आधीच्या दिवसाला आणि नंतरच्या दिवसाला ही खूप महत्व आहे.
संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ' भोगी ' असे म्हणतात. भोगी हा दिवसही खूप उत्साहाने साजरा केला जातो. या काळातील अशा थंड वातावरणात ज्या शेंगभाज्या, फळभाज्या उपलब्ध असतात त्या मिळून एक मिश्र भाजी बनविली जाते तिला ' भोगीची भाजी ' असे म्हणतात ती भाजी भाकरी बरोबर खूप चवीने खाल्ली जाते.

मकरसंक्रांतीच्या पुढच्या दिवसाला ' किंक्रांत ' असे म्हणतात. काही भागात या दिवसाला ही महत्वाचे मानले जाते. 

असा हा संक्रांतीचा सण सगळीकडे खूप आनंदाने साजरा करतात.




आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close