Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझा आवडता पक्षी पोपट - My Favorite Bird Parrot- मराठी निबंध - वर्णनात्मक

 माझा आवडता पक्षी- पोपट.


        
                    
माझा आवडता पक्षी पोपट - My Favorite Bird Parrot
माझा आवडता पक्षी पोपट



मित्रमैत्रिणींनो, लहानपणापासून पासूनच आपल्याला आई काऊ चिऊ च्या गोष्टी सांगते आणि त्या गोष्टी ऐकत ऐकतच आपण मोठे होत असतो. जसं जसे आपण मोठे होत जातो तसतसे आपल्याला निसर्ग आणि पक्षांची ओळख होत जाते. असेच आज मी मला आवडणाऱ्या एका पक्षाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तो  पक्षी आहे पोपट.

काही दिवसांपूर्वी मी आणि माझे आई बाबा आम्ही नवीन घरी राहायला आलो. माझ्या नवीन घरासमोर खूप मोठे झाड आहे. सकाळ झाली की तिकडे खूप पक्षांचा किलबिलाट होतो. त्या आवाजानेच रोज मला जाग येते. मी खडकीजवळ जाऊन नेहमी त्या झाडाकडे बघतो. त्या झाडावर अनेक घरटी आहेत. 

असेच एके दिवशी मला जाग आली ते कोणत्या तरी आवाजाने. पाहतो तर काय? चक्क माझ्या घराच्या खिडकीवर एक पोपट बसला आहे. मी पटकन आई ला बोलावले. तो पोपट हळू हळू त्याच्या भाषेत काही तरी बोलत आहे असे आईला जाणवलं. आईने पटकन एक मिरची खिडकीजवळ भिरकावली. जेणेकरून ती त्याला मिळेल. त्याने पटकन ती उचलली आणि तो उडून गेला. मला ही गोष्ट खूपच अनाभिज्ञ होती. तो उडून गेला परंतु माझ्या डोळ्यासमोर तो सारखा दिसत होता. दिवसभर मी त्याच्या परत येण्याची वाट बघत बसलो परंतु तो परत आलाच नाही. शेवटी निराश होऊन मी रात्री झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत कोणी तरी काही तरी बोलल्याचा आवाज झोपेत माझ्या कानावर येत होता. मध्ये मध्ये शिटी सारखा ही आवाज येत होता. डोळे उघडून बघतो तर काय कालचा तो पोपट आज परत आला होता. मला खूप आनंद झाला. आज परत मी एक मिरची त्याच्याकडे भिरकावली आणि तो ती घेऊन ना जाता तिकडेच खिडकीजवळ बसून खाऊ लागला. माझ्याकडून आता त्याला काही धोका नाहीय बहुतेक हे त्याच्या लक्षात आलं असावं. थोड्या वेळाने तो शिटी वाजवत निघून गेला.

आता तो रोज सकाळी मला शोधत आमच्या खिडकीजवळ येतो. मी त्यांचे नाव "मिठू" ठेवले आहे. मिठूचा रंग हिरवगार आणि त्याची चोच लाल भडक रंगाची आहे. त्याच्या मानेवर सुंदरसा काळ्या रंगाचा गडद पट्टा आहे जो त्याचा शोभून दिसतो. त्याचे डोळे छोटे आणि लुकलूकणारे आहेत. त्याची मान तो सारखी इकडे तिकडे फिरवत असतो आणि त्याच्या भाषेत तो काही तरी बोलत असतो. आता तो दिवसातून तीन-चार वेळा तरी मला भेटायला येतो. मी आई ला हाक मारली की तो ही माझ्यामागे ''आई -आई " असे आईला हाका मारतो. आम्ही दोघे आता चांगले मित्र झालो आहोत. 

मी त्याच्यासाठी आवर्जून बाबांना बाजारातून पेरू आणायला सांगतो. त्याला पेरूच्या बिया आणि मिर्चीच्या बिया खूप आवडतात. कधी कधी मी त्याला टोमॅटो पण देतो. आई त्याच्यासाठी आवर्जून चण्याची डाळ भिजत घालते. तो आईला सारख्या हाका मारत असतो. मी जे बोलतो तो तिचं तिचं वाक्य परत बोलण्याचा प्रयत्न करतो हे बघून मला खूप गंम्मत वाटते. 

मिठू रोज माझ्या घराच्या खिडकीवर येतो हे मी माझ्या मित्रांना ही सांगितले आहे. रविवारी ते ही आवर्जून मिठूला बघायला येतात. परंतु मी त्यांना मिठूला लांबूनच बघायला सांगितले आहे नाही तर तो घाबरेल आणि परत कधीच येणार नाही अशी मला भीती वाटते. मिठू आता फक्त एक पोपट नसून आमच्या घरचा एक सदस्यच झाला आहे. एकही दिवस जात नाही की तो मला भेटायला आल्याशिवाय राहत नाही. जर एकाद्या दिवशी त्याला यायला उशीर झाला तर मला आणि आईला बैचेनी होते. पण तो आईला हाका मारत झाडाच्या आसपासच फिरत असतो. 

खूपदा मनातं येत की हा आपल्या घरीच राहिला असता तर? पण नाही. तो एक पक्षी आहे आणि पक्षांचे खरे जीवन तर स्वछंदीपणे आकाशात फिरण्यासाठीचा असते. त्यांना पकडून पिंजर्यात ठेऊन आपण त्यांचा कोंडमारा करू नये. ज्यावेळी त्यांना जाणीव होईल की आपल्याकडून त्यांना काही धोका नाही त्यावेळी ते स्वतःहून आपल्याकडे ओढले जातात. जसा आमचा हा मिठू. त्याला मिठू हाक मारली की तो त्यांची मान इकडे तिकडे फिरवतो आणि तो ही "मिठू- मिठू" अशी हाक मारत फिरतो.
 
अश्या या मिठू नावाच्या पोपट पक्षाचा मला खुपच लळा लागला आहे. आणि म्हणूनच पोपट हा पक्षी मला खूप खूप आवडतो.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close