मला पंख असते तर..
आज मैदानात खेळताना अचानक विमानाचा आवाज आला आणि माझे लक्ष वर आकाशात गेले. त्या उंच आकाशात उडणाऱ्या विमानाकडे बघून माझ्या मानात आले कीं जर मला पण पंख असते तर.. खरंच किती विलक्षण अनुभव असता तो आणि मी तोच विचार करू लागलो.
मला पंख असते तर मी रोज सकाळी उठल्या उठल्या मस्त आकाशात एक फेरफटका मारून आलो असतो. वेगवेगळ्या झाडांवर बसून अनेक प्रकारच्या स्वादिष्ट फळांचा आस्वाद घेतला असता. मला नेहमी कुतूहल असते कीं पक्षी त्यांची घरटी झाडाच्या फादीवर कशी काय बांधून राहतात? मला पंख असते तर त्या घराट्यामधील छोटी छोटीशी पिल्ले मला जवळून बघायला मिळाली असती.
मला पंख असते तर ज्या वेळी आई मला वाण्याकडे सामान आणायला पाठवते तेव्हा मी पटकन उडून ते सामान घेऊन आलो असतो. बाबा जर कधी ऑफिस मध्ये जाताना डब्बा विसरले तर मी माझ्या पंखामुळे लगेच त्यांना तो देऊन आलो असतो. मला पंख असते तर ताईच्या कॉलेज च्या खिडकीवर बसून मी तिला चिडवून आलो असतो.
मला माझे गाव खूप आवडते. मला पंख असते तर मी रोज उडून माझंही गावी जाऊन माझ्या आजी-आजोबांना भेटून आलो असतो. रस्त्याने जाणाऱ्या नदीवरून उडून जाताना किती आनंद झाला असता मला! मला पंख असते तर उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे देश विदेश फिरून आलो असतो. वेगवेगळी प्रसिद्ध स्थळें, डोंगर- दऱ्या आणि महत्वाचे म्हणजेच हिमालय ही बघून आलो असतो.
मला पंख असते तर मला शाळेला कधीच उशीर झाला नसता कारण कितीही उशीर झाला तरी मी लगेच उडून शाळेच्या आवारात जाऊन पोचलो असतो आणि घरातून उशिरा निघूनही शाळेत वेळेत पोहचून आणि शाळा सुटल्यावरही सर्वात पहिला घरी पोहचलो असतो. जर कधी मला शाळेत शिक्षक ओरडले तर मी लगेच उडून खिडकीवर जाऊन बसलो असतो. मधल्या सुट्टीत जेव्हा सगळी मुले डब्बा खात असतील तेव्हा मी उडून लगेच माझ्या घरी जाऊन आईने बनविलेले गरमा गरम जेवण खाऊन आलो असतो.
मला पंख असते तर मी ट्रेन, बस सगळ्या गाड्यांबरोबर शर्यत लावली असती. सुट्टीत वर्गमित्रांच्या घरी उडतच खेळायला गेलो असतो. किती मज्जा आली असती हाच विचार करुन मला आनंद होतोय.
परंतु मला पंख असते तर जसे मला खूप फायदे झाले असते तसें कदाचित तोटेही सहन करावे लागले असते ना? हो! मी तो विचार तर केलाच नाही. मला पंख असते तर ज्या वेळी मी आकाशात उंच भरारी घ्यायला गेलो असतो त्या वेळी इतर पक्षांनी मला एक विचित्र पक्षी समजुन माझ्यावर हल्ला चढावला असता. मला त्यांनी स्वतःचा शत्रू बनवून घेतला असता. मी जरा बाहेर दिसलो कीं ते मला टोचण्यासाठी माझ्यावर हल्ला करतील. बाहेर बाजारात गेलो तर लोक मला विचित्र पक्षी समजुन माझ्यापासून लांब पळतील. मला हाकलवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. ज्यावेळी मी ताईच्या कॉलेज मध्ये तिला भेटायला जाईन त्यावेळी मला पंख आलेले बघून तिचे मित्रमैत्रिणी तिला चिडवतील कदाचित आणि माझ्या शाळेतील मित्र तर माझ्या जवळच येणार नाहीत. मला बघून ते खूप घाबरतील आणि आरडा ओरड करतील. परिणामी शिक्षक मला शाळेतून काढून टाकतील.
मला पंख असते तर समाजातील काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक मला पकडून नेतील आणि मला एखाद्या प्रदर्शनात नेऊन उभे करतील आणि पंख आलेले मनुष्य असे उदाहरण म्हणून मला जगासमोर समोर उभे राहावे लागेल.
या सर्व घडामोडीमध्ये मला आणि माझ्या घरच्यांना किती मनस्ताप होईल याचा विचार मी केलाच नव्हता. माझ्या आईला माझ्या या हालअपेष्टा बघवणार नाहीत. ती खुप दुःखी होईल. बाबांना ही ऑफिस मध्ये लोक माझ्या या पंखाबद्दल खूप सारे लोक प्रश्न विचारून त्रास देतील.
त्यापेक्षा नको रे बाबा ते पंख! मला पंख असते तर ही कल्पनाच फक्त बरी आहे पण प्रतिक्षात मात्र हे पंख मला नको!
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.