Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझे आवडते शिक्षक- Majhe Aawadte Shikshak - मराठी निबंध- My Favorite Teacher- वर्णनात्मक

 माझे आवडते शिक्षक-Majhe Aawadte Shikshak.



माझे आवडते शिक्षक
माझे आवडते शिक्षक


मित्रमैत्रिणींनो, दिवसभरामध्ये आपण शाळेत आपला जास्त वेळ घालवतो. त्यामुळे आपल्या सर्वांगीण विकासामध्ये आपल्या कुटुंबातील पालकांचा जेवढा वाटा असतो तेवढाच किंबहुना थोडा जास्तच वाटा आपल्या शाळेतील शिक्षकांचा असतो. असेच आपल्या प्रत्येकाला कोणते ना कोणते शिक्षक जास्त आवडतात. माझे ही एक आवडते शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल मी आज सांगणार आहे.
खरं तर माझे आवडते शिक्षक म्हणण्याऐवजी मी माझ्या आवडत्या शिक्षिका म्हणेन. कारण संपूर्ण शालेय जीवनाचा आराखडा लक्षात घेता ज्यांनी माझ्या आयुष्यावर खूप छाप पडली त्या म्हणजेच आमच्या गणिताच्या शिक्षिका बापट बाई.

बापट बाई म्हणजेच आमच्या वर्गशिक्षिका आणि त्याच आम्हाला गणित विषयही शिकवतात. गणित विषय म्हंटल कीं सर्वांनाच घाम फुटतो. परंतु आमच्या वर्गातील मुलांचे मात्र तसें काहींच  नाही  कारण आमच्या बाई ज्या प्रकारे हसत खेळत, वेगवेगळ्या क्लुप्त्या करून, नवनवीन उदरहरणे देऊन आम्हाला गणित शिकवतात ते खरंच उल्लेखनीय आहे.

आमच्या या शिक्षिका तशा खूप साध्या राहणीमान असणाऱ्या आहेत. लांब केस आणि डोळ्यांना नेहमी चष्मा अशा आमच्या बाई नेहमी सर्वांशी हसतमुख असतात. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून आणि वागण्यातून मला नेहमी सकारात्मकताच दिसून आलेली आहे.

माझ्या हया शिक्षिका आम्हाला फक्त अभ्यासापुरतेच मार्गदर्शन न करता वेळप्रसंगी पुढील आयुष्यात कोणत्या ही संकटाना कस धीराने सामोरे जावे हे ही वेळोवेळी आम्हाला गोष्टींच्या रूपाने समजावतात.

एखाद्या दिवशी जर आमच्यापैकी कोणी गैरसहजर राहिले तर दुसऱ्या दिवशी आपुलकीने त्या आमची चौकशी करतात. 
पालक सभेला त्या आमच्या पालकांना नेहमी आमच्याबद्दल सांगताना 'माझी मुले' असे आमच्याबद्दल संबोधीत करतात हे मला खूप आवडते.

बाईंचा अजून एक गुण जो मला आवडतो तो म्हणजेच त्या वेळप्रसंगी आम्हा सर्वाना रागे भरतात ही आणि थोड्या वेळाने मायेने जवळही घेतात. शाळेत असताना ही त्यामुळे मला नेहमी जणू काही आई जवळ असल्याची जाणीव होत राहते.

माझ्या हया आवडत्या बाईंची आमच्या सर्व विद्यार्थांकडून नेहमी एकच अपेक्षा असते कीं 'मुलांनो, आयुष्यात नेहमी मोठे व्हा, स्वतः चे नाव आणि आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करा '. बाई नेहमी म्हणतात कीं शाळेतील संस्कार कधी विसरू नका. नेहमी एक सुजाण आणि सुशिक्षित नागरिक व्हा.

माझ्या बाईंचा अजून एक विशिष्ट गुण आहे. मी जेव्हा पण शिक्षक खोलीत जातो त्या सतत काही ना काही तरी वाचन करीत असतात. त्या नेहमी आम्हा विद्यार्थ्यांच्या कर्तृत्व गुणांना वाव मिळावा म्हणून निरनिराळ्या आंतरशालेय स्पर्धाची माहिती मिळवत असतात आणि आम्हा सर्वाना खूप प्रोत्साहन देऊन त्यात भाग घेण्यासाठी सांगतात.

आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा अनेक ठिकाणी गौरव ही झालेला आहे आणि वेळोवेळी त्यांना बक्षिसेही मिळत असतात.

अशा हया माझ्या आवडत्या शिक्षिका नेहमी नवनवीन पिढीला स्वतःजवळील ज्ञान देऊन आमचे पुढील आयुष्य सुखकर करीत आहेत. त्यांच्याकडून जितके शिकता येईल तेवढे आमच्यासाठी नेहमी थोडेच असेल आणि म्हणून त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना असेच नेहमी चांगले मार्गदर्शन करीत राहावे हीच माझी त्यांच्याकडे सदैव विनंती राहील. म्हणूनच माझ्याकडून या माझ्या आदर्श आणि आवडत्या शिक्षिकांना सदैव कोटी कोटी प्रणाम राहील.


आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close