Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शालेय क्रीडा महोत्सव - Shaley Krida mahotsav - मराठी निबंध - School Sports Day -वर्णनात्मक

शालेय क्रीडा महोत्सव - Shaley Krida Mahotsav.



         
शालेय क्रीडा महोत्सव - School Sports Day
शालेय क्रीडा महोत्सव.


मित्रमैत्रिणींनो, दरवर्षी आपल्या प्रत्येकाच्या शाळेत क्रीडामहोत्सव होत असते असेच या वर्षी आमच्या शाळेचे क्रीडांमहोत्सव कसे झाले मी मी सांगणार आहे.

जानेवारीचा महिना सुरु झाला होता. शाळेचे तास नेहमीप्रमाणे सुरु होते. गेल्याच महिन्यात डिसेंबरला शाळेची सहल जाऊन आलेली होती आणि आम्ही तिकडे खूप मज्जा केलेली होती. आता हळू हळू अभ्यासाला वेग येत होता तेवढ्यात माईक वरून सूचना सांगण्यात आली कीं दोन दिवसानंतर आपल्या शाळेचा क्रीडांमहोत्सव ठेवण्यात आलेला आहे. तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाच पैकीं किमान तीन खेळात आपली नावे वर्गशिक्षिकाकडे द्यावी. सुचना सांगताच वर्गात एकच कल्लोळ झाला. क्रीडांमहोत्सवाच्या दिवशी कोण कोण कशा कशात भाग घेणार याची चर्चा सुरु झाली. 

एक एक करून मुले बाईंकडे आपली नावे आणि भाग घेतलेल्या स्पर्धेचे नाव देऊ लागली. मी ही तीन खेळांमध्ये भाग घेतला होता. १०० मीटर धावणे, चमचा गोटी स्पर्धा आणि बटाटा शर्यत. लांब उडी आणि गोळा फेकही होते.

शेवटी क्रीडामहोत्सवाचा तो दिवस उजाडला. आम्ही सगळे विद्यार्थी पहाटेच मैदानावर जावून पोचलो. संपूर्ण मैदानावर पांढऱ्या रंगाच्या रांगा आखून ठेवल्या होत्या. कुठे धावण्यासाठी लांबच लांब रांगा तर कुठे गोळफेकीचे गोलाकार करून ठेवण्यात आलेले होते.सगळे शिक्षक लगबग करीत होते. प्रत्येकाला वेगवेगळ्या स्पर्धेची जबादारी दिलेली होती. आता हळू हळू शाळेच्या मैदानाच्या एकेकाळी कोपऱ्यावर एकेक स्पर्धा सूरू झाली होती.जसं जसे नावे घेतली जात होती तस तसें आम्ही तिकडे जमा होत होतो.

मी चमचा गोटी स्पर्धेच्या ठिकाणी गेलो होतो. पाच -पाचच्या गटामध्ये चमचा तोंडात घेऊन त्यात गोटी ठेऊन प्रत्येकाने भराभर शेवटपर्यंत पोचायचे होते. एक दोन तीन.... आणि शिट्टी वाजताच आम्ही सगळे आपल्या तोंडातील चमच्यावर लक्षात केंद्रित करीत भराभर पळू लागलो. बाकी उभे राहिलेले मुले जोरात टाळ्या वाजवून आम्हाला प्रोत्साहन देत होती. मी ही पूर्ण लक्ष देऊन पुढे पुढे जात होतो. मधेच माझ्या बाजूच्या मुलाची चमचा गोटी रस्त्यात पडली असं मला जाणवले आणि तो तिथेच थांबला पुढे जाऊन अजून एका मुलाचेही तसेच झाले आणि तो ही थांबला. आता बाकी राहिलेल्या आम्हा मुलांमध्ये जोराजोरात पण पूर्ण लक्ष देऊन पुढे जाण्याची चढा-ओढ लागली होती. मला खूप जास्त धडधड होत होती. चमचा तोंडात जोरात धरला आणि आजूबाजूला काय चालू आहे तिथे लक्ष विचलित न करता फक्त भराभर चालत राहिलो जेव्हा शेवटी पोचलो तेव्हा कळलं कीं मी पहिला आलो होतो. खूप जास्त आनंद झाला होता मला!

पुढे १०० मीटर धावणे स्पर्धेसाठी ही गेलो पण तितका जोरात पळू नाही शकलो. आता फक्त बटाटा शर्यत खेळ बाकी होती. प्रत्येकसमोर रांगेने काही अंतरावर एक एक बटाटा ठेवलं होता आणि आपल्या पायाखाली एक टोपली ठेवली होती. जसा शिट्टी चा आवाज होईल तस धावत जाऊन एका वेळी एक बटाटा आणून टोपलीत टाकायचा होता आणि शेवटी तिन्ही बटाटे टोपलीत टाकून धावत शेवटपर्यंत जायचे होते.

शिट्टी वाजताच बटाटा शर्यतीचा खेळ चालू झाला आणि मुले पटापट धावू लागली आणि एक एक बटाटा टोपलीत टाकू लागली. कोणी जवळचा बटाटा पहिला टोपलीत टाकला तर कोणी सर्वात लांबचा बटाटा. आणि आम्ही सगळे धावत शेवटपर्यंत पोचलो एक मुलगा जोरात धावण्यामुळे मधेच पडलाही. त्या खेळातही मला तिसऱ्या क्रमांकचे बक्षिसे मिळाले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कधी एकदा घरी जातोय आणि आईला सांगतोय असे मला झाले होते. माझ्या सगळ्या मित्रानी आणि शिक्षकांनी शाबासकी देऊन माझे खूप अभिनंदन केले.

काही ठिकाणी अजूनही स्पर्धा खेळ चालू होते. गोळफेकीच्या ठिकाणी आम्ही बघायला गेलो तर खूप जड असा गोळा मुलांना उचलून तो दूरवर फेकावा लागत होता आणि मग शिक्षक तो गोळा किती मीटर वर जाऊन पडला ते मोजीत होते. लांब उडीच्या ठिकाणी ही गेलो तिकडे लांबून धावत येऊन वाळूमध्ये लांबपर्यंत उडी घ्याची होती. खूप मज्जा येत होती बघायला.

क्रीडांमहोत्सवाच्या या खेळांच्या नादात भूक तहान विसरूनच गेलो होतो. पण नंतर मात्र हळू हळू भूक लागल्याची जाणवू लागली. हळू हळू सगळे खेळ संपले आणि आम्ही घरी निघालो. पुढील आठवड्यात बक्षीस समारंभ होणार होता आणि ते पाहण्यासाठी आमच्या आईबाबांनाही बोलवणार होते म्हणून मी खूप खुश होतो. शेवटी शाळा सुटली आणि मी आनंदाने घरी जात आजचा दिवस पुन्हा पुन्हा आठवत होतो. 

असा हा आमचा शाळेचा क्रीडामहोत्सवाचा दिवस प्रत्येक वर्षीप्रमाणेच यावर्षीही माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता.



आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close