Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

व्यायामाचे महत्व - Vyayamache Mahatva- मराठी निबंध - Importance Of Exercise.

व्यायामाचे महत्व - Vyayamache Mahatva



                    
व्यायामाचे महत्व - Vyayamache Mahatva
व्यायामाचे महत्व


मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या जीवनात व्यायामाचे महत्व आणि व्यायामाचे फायदे काय आहेत याची माहिती घेणार आहोत. 

व्यायाम म्हणजेच थोडक्यात काय?

व्यायाम म्हणजेच कमी शब्दात समजवायचं म्हटले तर  'आपल्या शरीराची होणारी अशी क्रिया किंवा हालचाल ज्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवाना आणि इंद्रीयांना चालना मिळेल.'


व्यायामअभावी होणारे दुष्परिणाम :

व्यायामामुळे आपल्या शरीरातील अनेक चांगले आणि सकारात्मक बदल होतात. त्याचप्रमाणे व्यायामाअभावी खुपसे दुष्परिणामही सहन करावे लागतात.

आजच्या या युगात आपली पिढी एकविसव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे आणि त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानात भर पढीत असतानाना आधुनिक टेकनॉलॉजिचा उपयोग आपण सर्वच जण करीत पुढे पुढे चाललो आहोत परंतु त्यामुळे शारीरिक श्रम असणारी कामें कमी होऊन अत्यंत कमी श्रमामध्ये आपण आपली कामे टेकनॉलॉजिच्या साहाय्याने जलद गतीने करीत आहोत. त्यामुळे शरीराची हालचाल दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

विशेषतः शहरी भागांमध्ये गावाकडच्या तुलनेने शाररिक हालचाली कमी होत असतात त्यामुळे शरीराचा व्यायाम होतच नाही. परिणामी हालचाली अभावी लोक लठ्ठ आणि बैडोल होत चालली आहेत. त्याउलट गावाकडील लोकांचे काम थोडे जास्त श्रमाचे असल्यामुळे त्यांची शरीरयष्टी सडसडीत आणि काटक प्रवृतीची असते.

आजकाल बहुतेक लोकांकडे स्वतःची वाहने आल्यामुळे तितकेसे कोणाचे चालणे ही होत नाही. छोट्या मोठ्यां कामांसाठीही जर का जवळपास कोठेही जावयासे असल्यास लोक चालत जाण्यापेक्षा आपल्याकडील दुचाकीनेच जाणे पसंत करतात त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. बहुतेक लोक कार्यालयात तासनतास बसून कॉम्पुटर वर कामे करतात त्यामुळेही त्यांच्या शरीराची हालचाल हवी तशी होत नाही.

स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर आपल्याकडील स्त्रियांना तसें घरातील कामाबरोबरच बाहेरील कामे करतात परंतु त्या खाण्याच्या बाबतीत स्वतः कडे फारसे लक्ष देत नाहीत. आपल्याकडील स्त्रिया या घरातील लोकांचे जेवण झाल्यावर जे बाकी राहिलेले अन्न वाया जाऊ नये म्हणून खातात परंतु त्या ही स्वतःच्या शरीरासाठी व्यायामासाठी वेळ देत नाहीत आणि खाण्याच्या बाबतीत ही दुर्लक्ष करताना दिसतात. कधी वेळेला कमी खाऊन राहतात तर कधी अन्न वाया जाऊ नये म्हणून उरलेले खातात. परिणामी व्यायामाअभावी वजन वाढत जाते. 

लहान मुलांच्या बाबतीत घरचे सात्विक जेवण कमी होऊन बाहेरील जंक फूड वर जास्त ताव मारले जातात. ब्रेड, पिझ्झा, पास्ता, नूडल्स, वेफर्स हे मुलांना जास्त आवडू लागले आहे. त्यामुळे फळे आणि पालेभाज्यापासून मुले कुठे तरी दुरावात चालली आहेत. पूर्वी सारखे मैदानी खेळ खेळण्याऐवजी मुले घरीच बसून कॉम्पुटरवर आणि मोबाईलवर तासनतास विडिओ गेम खेळतात त्त्यामुळे त्यांच्या ही शरीराची हालचाल कमी होऊ लागली आहे आणि परिणामी आजकालच्या पिढीमध्ये ओबेसिटी चे प्रमाण जास्त दिसू लागले आहेत. या आणि अशा अनेक दुष्परिणामचे शेवटी एकच ठिकाण होते ते म्हणजेच सतत काही ना काही कारणांनी आपल्या दवाखान्यात फेऱ्या होऊ लागतात.

या सर्व दुष्परिणमांना जर आपल्याला थांबायचे असेल तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाला महत्व द्यावेच लागेल. आपण आपल्या आवडीनुसार व्यायामच्या वेगवेगळ्या प्रकारातील कोणताही एक प्रकार नक्कीच आपल्या जीवनशैलीत समाविष्ठ करू शकतो.

खालीलप्रमाणे व्यायामाचे काही प्रकार आहेत :

• चालणे
• धावणे
• सायकल चालवणे
• दोरीच्या उड्या मारणे
• पोहणे
• योगा
• सूर्यनमस्कार
• जिमन्यास्टिक करणे ( लहान मुले )
• डान्स
• ऐरॉबिक्स
• झुंबा
• पायऱ्या वर खाली चढणे उतरणे
• व्यायाम शाळेत जाऊन वेगवेगळ्या कसरती करणे.

जीवनात नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर असे उपयुक्त असे फायदे होतात.

• व्यायामामुळे शरीर हलके आणि सुटसुटीत राहते.
• व्यायामामुळे मन सदैव आनंदी आणि सकारात्मक राहते.
• व्यायामामुळे आरोग्य निरोगी राहण्यास खूप मदत होते आणि वजनही नियंत्रणात राहते.
• व्यायामामुळे वेगवेगळ्या व्याधी जसे बी. पी, डायबेटीस, हाई कोलेस्टल असे आजार दूर राहतात.
• व्यायामामुळे स्त्रियांना होणारे अनेक आजार ही दूर राहतात. उदा. थायरॉईड , पि.सी ओ. डी  
• व्यायामामुळे लहान मुलामधील ओबेसिटी सारखे आजार होत नाहीत.

तेव्हा आपण प्रत्येकाने आपल्या जीवनात कितीही धावपळ असेल तरी स्वतः साठी आणि स्वतःचे निरोगी ठेवण्यासाठी वेळात वेळ काढून व्यायामाला सुरुवात केलीच पाहिजे आणि व्यायामाबरोबरच सात्विक आणि घरचे ताजे अन्न खाण्याकडे आपला कल असला पाहिजे. कारण "आरोग्यम धन संपदा !" हे वाक्य खूप महत्वाचे आहे. तेव्हा चला तर मग आजपासूनच व्यायामाला सुरुवात करूया !


आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close