Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझा आवडता सण होळी - Majha Aawadta San Holi - My Favorite Festival Holi Essay In Marathi -वर्णनात्मक

माझा आवडता सण होळी । Majha Aawadta San Holi | My Favorite Festival Holi Essay In Marathi.


             
होळी सण
होळी सण


मित्रमैत्रिणींनो, आपल्या संस्कृतीमध्ये वर्षभर आपण विविध सणवार खूप आनंदाने साजरे करत असतो परंतु लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण एका सणाची खूप आतुरतेने वाट बघीत असतात तो म्हणजेच होळी हा सण. आज आपण याच होळी सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

होळी म्हणजेच रंगांचा सण. होळी म्हणजेच आपापसातील प्रेमाची उधळण. होळी म्हणजेच एकमेकांविषयी कटुता विसरून एकत्र येऊन आनंदाने साजरा करायचा सण.

होळी हया सणाला ' होलीका दहन ' किंवा 'शिमगा ' असेही म्हणतात. कोकणातील काही गावात होळीला 'शिमगो' असे म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्रात होळी हा सण खूप उत्साहाने साजरा होतो परंतु विशेष: कोकणात हा सण मोठया पद्धतीने साजरा करतात. गावागावात फाल्गुन शुक्ल पंचमीला छोटी होळी लावतात व पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी करतात. होळी मध्ये लाकडे जाळून होळी लावल्यानंतर मंत्रोच्चार करत त्या होळीभोवती ' बोंबा ' मारत गोल प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. होळी लावण्याच्या पद्धतीला कोकणात ' होम ' लागणे असे म्हणतात. 

गावोगावी होळीला ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर पहिला होम लावण्याची पद्धत आहे. त्यानंतर गावी प्रत्येक घराघरात देवींची पालखी फिरवण्याची प्रथा आहे. देवांची ही पालखी घरोघरी नेली जाते त्यावेळी ही पालखी गावातील पुरुष मंडळीनी नाचविण्याची पद्धत आहे आणि हे नृत्य बघण्यासाठी खूप गर्दी होते.

घरी येणाऱ्या पालखीचे स्वागत करण्यासाठी स्त्रिया घराला सुंदर सजवतात. घराबाहेर नक्षिमय रांगोळ्या काढल्या जातात. दारात तोरण लावले जाते. पालखीतून येणाऱ्या देवतेचे घरातील स्त्रिया ओटी भरतात. त्याचप्रमाणे होळीच्या वेळी नवस करण्याची ही प्रथा प्रचलित आहे. नवीन लग्न झालेली जोडपी आवर्जून होळीच्या होमामध्ये नारळ द्यायला जातात. घराघरातील प्रत्येक जण घरी आलेल्या देवाचे मनापासून स्वागत करून त्यांच्यापुढे नतमस्तक होतो.

'होळी रे होळी पुरणाची पोळी....' असे नेहमी म्हंटले जाते कारण या दिवशी प्रत्येक घरात स्त्रिया आवर्जून पुरणपोळी बनवितात.

जसजसे गावे बदलतात तासातश्या थोड्याश्या पद्धतीही बदलत जातात. कोकणातील चिपळूण मधील 'हॉल्टी होळी' प्रसिद्ध आहे. या वेळी दोन्ही बाजूने लोक उभे राहून एकमेकांवर जळती लाकडे फेकतात. हा तेथील होळी मध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्येही होळीला खूप महत्व दिले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओब्या भाजण्याची पद्धत आहे म्हणजेच नवीन आलेले पीक शेतकरी अग्नी देवतेला सादर करतो.

शहरातील होळी गावाकडील होळी पेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. शहरात काही जण आपापल्या बिल्डिंगच्या, सोसायटीच्या खाली सगळे मिळून एकत्र होळी पेटवतात आणि सगळे मिळून तिची पूजा करतात. शहरातील जीवन हे धाकाधकीचे आणि धावपळीचे असल्यामुळे गावाप्रमाणे तिथे मोठया प्रमाणात होळी साजरी होत नाही. परंतु तरीही शहरातील लोक होळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात तर त्यातील काही लोक होळीच्या निम्मिताने आपापल्या गावी जातात.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला ' रंगपंचमी ' असे म्हणतात. रंगपंचमीच्या दिवशी सगळे लोक आपापसातील मनमुटाव दूर करून एकमेकांना गुलाल लावतात. काही ठिकाणी ' भांग ' पिण्याचीही पद्धत आहे. रंगपंचमीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सगळे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करतात. विशेषत: लहान मुले या सणाचा पुरेपूर आनंद घेतात. असा हा होळीचा सण सगळे जण खूप आनंदाने साजरा करतात. परंतु हा सण आपण आनंदाने साजरा करीत असताना सर्वांनी दक्षता बाळगून राहणे खूप आवश्यक आहे कारण रंगपंचमी खेळताना एकमेकांच्या डोळ्यामध्ये रंग जाऊ नये याची आपण सर्वांनीच पुरेपूर काळजी घेतली पाहिजे नाही तर या आनंदाच्या सणाला गालबोट लागू शकते.

अशी ही होळी आपण वर्षानुवर्षे आनंदाने आणि उत्साहाने साजरी करीत राहूया आणि होळी या सणाचा आनंद अजून द्विगुणित करीत राहूया.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close