Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्लास्टिक बंदी- प्लास्टिक शाप की वरदान -Plastic Bandi - Plastic Shap Ki Vardan - मराठी निबंध- वैचारिक

प्लास्टिक बंदी | प्लास्टिक शाप की वरदान |Plastic Bandi | Plastic Shap Ki Vardan|



           
प्लास्टिक बंदी- प्लास्टिक शाप की वरदान -Plastic Bandi - Plastic Shap Ki Vardan
प्लास्टिक बंदी- प्लास्टिक शाप की वरदान


मित्रमैत्रिणींनो, आज आपण प्लास्टिक बंदी किंवा प्लास्टिक शाप की वरदान या विषयावर निबंध बघणार आहोत.


मित्रांनो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो त्यात दगडी वस्तू, मातीपासून तयार झालेल्या वस्तू, कागदी वस्तू , लेदरने बनविलेल्या वस्तू त्याचबरोबर काचेच्या वस्तू या सर्वांचा समावेश असतो परंतु गेल्या काही वर्षात जे सर्वात जास्त वापरात आलेल्या वस्तू म्हणजेच प्लास्टिच्या वस्तू. 

हळूहळू काळानुसार हे प्लास्टिक सगळीकडे कधी एवढे लोकप्रिय झाले हे आपल्याला कळलेलंच नाही आणि मग जिथे तिथे सर्रास या प्लास्टिकचा वापर होऊ लागला. परंतु पुढे जाऊन याच लोकप्रिय झालेल्या प्लास्टिकचा वापर आपल्याला कधी आणि कसा त्रासदायक झाला याची माहिती आज आपण बघणार आहोत.


प्लास्टिक म्हणजेच काय?

प्लास्टिक म्हणजे ज्यामध्ये कार्बन हा घटक मुख्यपणे आढळतो असा पदार्थ.


प्लास्टिकची निर्मिती कशी होते?

मुख्यतः जमिनीच्या पोटातून किंवा खोल समुद्रातून मिळणाऱ्या तेलाला शुद्ध करून त्याला वेगवेगळ्या तापमानाला उकळवून त्यातील जे भाग वेगळे होतात त्यातून प्लास्टिकची निर्मिती केली जाते.


प्लास्टिकला पोलिमल का म्हणतात?

प्लास्टिक हे मानव निर्मित असल्यामुळे नैसर्गिक वायू, खनिजे, तेल व कोळशात मिळणारे हाईड्रोकार्बन वापरून जे प्लास्टिक निर्माण केले जाते त्यामुळे सामान असा रेणुनची जी साखळी निर्माण होते त्यामुळे प्लास्टिक निर्माण होते. या सामान रेणुनी तयार झालेल्या साखळ्यांना पोलिमर असे म्हणतात म्हणूनच बऱ्याचदा प्लास्टिकला पॉलिथिन, पोलिस्टर अशी नावे असतात.


प्लास्टिकला एवढी पसंती का दिली गेली?

प्लास्टिक हे पाण्यात भिजले तरी ते तुटत नाही आणि कुजतही नाही आणि त्यामुळे त्याचे विघटनही होत नाही म्हणून वर्षानुवर्षे प्लास्टिकला एवढी पसंती दिली गेली.


महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कधी सुरु झाली?

२३ जुन २०१८ पासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.


प्लास्टिकचे फायदे काय?

प्लास्टिकचे मानवाला साठी तसें काही विशेष फायदे नसून त्याचे दुष्परिणामच जास्त होतात. त्यामध्ये फायदा म्हणायचे झाले तर आपल्या देशात बेरोजगारीची समस्या ही खूप मोठी असल्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू निर्मिती कंपन्यामध्ये खुपश्या बेरोजगार मजुरांना काम मिळत असे  हा एक फायदा फक्त दिसण्यात येतो.


प्लास्टिकचे दुष्परिणाम :-

समाजात प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर जास्त प्रमाणात वापरल्यामुळे त्या रस्त्यावर अशाच  कचऱ्यात फेकल्या जात असत आणि अनेक गायी खाण्याच्या शोधात जेव्हा त्या कचरापेटीजवळ जात त्या वेळी त्या प्लास्टिक पिशवीतील खाण्यासोबत न कळतपणे ते प्लास्टिकही खाऊ लागल्या. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ लागला.

लोक जेव्हा समुद्रकिनारी अथवा पर्यटन क्षेत्राच्या जवळील तलावाजवळ फेरफटका मारण्यास जाऊ लागले तेव्हा ते खाण्याच्या वस्तूची प्लास्टिकचे कव्हर तेथेच पाण्यात फेकत असत त्यामुळे ते प्लास्टिक समुद्रात आत न जाता किनाऱ्यावर तसेच जमा होते आणि त्याचा परीणाम म्हणजेच गेली कित्येक वर्षे समुद्री जीव आणि मासे ते प्लास्टिक खात आहेत व त्यांच्या जीवाला धोका होऊ लागला.


स्वच्छ भारत अभियान -( स्वच्छ भारत अभियान ):-

अशा या धोकादायक प्लास्टिकला आपल्या देशातून नष्ट करण्यासाठी व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिकवर जी बंदी आणण्यात आली आहे ती स्वच्छ भारत अभियान ( Swach Bharat Abhiyan ) याअभियानात अंतर्गतच पर पाडण्यात येत आहे.


प्लास्टिक वापराव्यतिरिक्त पर्यायी उपाय :-

प्लास्टिक वापराव्यतिरिक्त पर्यायी उपाययोजना म्हणजेच आपण जास्तीत जास्त कापडी पिशव्याचा वापर करू शकतो कारण या कापडी पिशव्या आपण वापर झाल्यावर स्वच्छ धुवून परत वापरात आणू शकतो व त्यामुळे पर्यावरणाला काही हानीही होणार नाही.

तेव्हा आपण सर्वांनीच हा विचार करायला पाहिजे की प्लास्टिक शाप आहे की वरदान? म्हणूनच आपण सारे मिळून म्हणूया : " प्लास्टिक टाळा, प्रदूषण टाळा ! "



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close