Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संवाद लेखन मराठी - खेळाचे महत्व सांगणारे आई व मुलामधील संवाद लेखन लिहा - Sanvad Lekhan In Marathi.

संवाद लेखन मराठी | खेळाचे महत्व सांगणारे आई व मुलामधील संवाद लेखन लिहा | Sanvad Lekhan In Marathi |




      
संवाद लेखन मराठी - खेळाचे महत्व सांगणारे आई व मुलामधील संवाद लेखन लिहा - Sanvad Lekhan In Marathi.
संवाद लेखन मराठी - खेळाचे महत्व सांगणारे आई व मुलामधील संवाद .



खेळाचे महत्व सांगणारे आई व मुलामधील संवाद.



आई - राजू अरे इकडे ये.

राजू - काय ग आई? काय झाले?

आई - अरे राजू! मी सकाळपासून बघतेय तू उठल्यापासून फक्त मोबाईल वर गेम खेळत लोळत पडला आहेस. गृहपाठ झाला आहे ना तुझा सर्व?

राजू - हो ग आई. सगळा गृहपाठ झाला आहे आणि आज शाळेला सुट्टीच आहे म्हणून मी जरा मोबाईल वर गेम खेळतोय.

आई - अरे राजू, जर तुझा अभ्यास झालाय तर जरा मैदानी खेळ खेळायला मैदानात ही जात जा बाळा.

राजू - पण आई, मला तर मोबाईलवरचे गेम खेळायलाच खूप मज्जा येते. मला मैदानातील खेळ खेळायचा कंटाळा येतो.

आई - हे बघ राजू, आपल्या जीवनात मैदानी खेळाचे खूप महत्व आहे. खेळामुळे तुझ्या शरीराची हालचाल होईल, तुझ्या अवयवांचा व्यायाम होईल व तुझी उंची वाढण्यासही खूप मदत होईल.

राजू - ते कसे ग आई?

आई - अरे बाळा! घरी बसून मोबाईल वर खेळ खेळण्याने तुझ्या शरीराची हालचाल थांबून राहील व परिणामी तुझे वजन वाढून तुला लठ्ठपणा येऊ शकेल. खेळामुळे तुझ्यातील ऊर्जा सतत टिकवून ठेवण्याची तुझ्या शरीराला सवय होईल व त्यामुळे तुझ्यातील रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहील. त्याचबरोबर तुझी वाढ ही झपाट्याने होण्यास व तुझी उंची वाढण्यास चांगली मदत मिळेल.

राजू - हो ग आई! मला माझी चूक आता लक्षात आली आहे आणि मला खेळामुळे होणाऱ्या  व्यायामाचे महत्व ही चांगले समजले आहे. त्यामुळे या पुढे मी माझा अभ्यास पूर्ण झाला की घरी लोळत पडून मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी मैदानी खेळांचे विविध प्रकार शिकण्याचा नक्की प्रयत्न करीन.

आई - आता अगदी बरोबर बोललास तू!



आमचा वरील संवाद लेखनाचा नमुना तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close