संवाद लेखन मराठी | शिक्षणाचे महत्व सांगणारा दोन मित्रांमधील संवाद लिहा | Sanvad Lekhan In Marathi |
अभय - अरे दिनू! कालच आपला दहावीचा निकाल लागला ना? मग चल पुढील शिक्षणासाठी आपण कॉलेजचा फॉर्म आणायला जाऊया. मी निघालोय तू पण येतोस ना?
दिनू - नाही रे अभय. तू जा मी नाही येत.
अभय - अरे पण का? काही अडचण आहे का?
दिनू - अरे मी आता पुढील शिक्षण न घेण्याचे ठरविले आहे. मला काही तरी कामधंदा करायचा आहे.
अभय - काय? तू पुढील शिक्षण घेणार नाहीस? अरे पण तुला तर आपल्या सर्व मित्रांमध्ये सर्वत्र जास्त गुण मिळाले आहेत. मग तू असे का म्हणतोस?
दिनू - मला माझ्या वडिलांना घरखर्चात मदत करायची आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.
अभय - ऐक राजू! तुझे बोलले मला पटले आहे तरीही माझ्या मते तू कॉलेजचे शिक्षण घेत घेत एखादे काम ही करू शकतोस. म्हणजेच तुझे शिक्षणाचे नुकसान ही होणार नाही.
राजू - पण माझा अभ्यास बुडाला तर तो कसा काय कळेल मला?
अभय - अरे मित्रा! आम्ही तुझे मित्र आहोत ना? आम्ही तुला तुझ्या बुडलेल्या अभ्यासात मदत करू. जेणेकरून तू शिकू ही शकशील आणि तुझ्या घरच्यांना घरखर्चात मदत ही करू शकशील.
राजू - पण हे सगळे खरंच जमेल का मला?
अभय - का नाही जमणार तुला? तू हुशार आहेस, मेहनती आहेस आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच तुला तुझ्या घरची परिस्थिती बदलायची आहे. बरोबर ना?
राजू - हो बरोबर.
दिनू - मग ऐक मित्रा! शिक्षणामुळेच तू तुझ्या घरची आर्थिक परिस्थिती बदलू शकतोस. चांगले शिक्षण घेतलेस तर पूढे जाऊन तुला चांगली नोकरी मिळेल व हळू हळू कुटुंबाची आर्थिक जबाबदारी तू निर्धास्तपणे घेऊ शकशील व तुझ्या वडिलांना आराम मिळेल.
राजू - मला तुझे म्हणणे पटले आहे दिनू. आता मला शिक्षणाचे महत्व चांगले कळले आहे. मला जर माझ्या कुटुंबासाठी काही हातभार लावायचा असेल तर आता शिक्षण अर्धवट सोडून मी छोटी मोठी कामे करून चालणार नाही. त्यापेक्षा मी शिक्षणाचा आधार घेऊन माझे भवितव्य सुधारु शकेन.
अभय - चल तर मग कॉलेजला प्रवेश घेऊया.
राजू - धन्यवाद मित्रा. चल.
आमचे हे संवाद तुम्हाला कसे वाटले कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.