औषधी वनस्पती तुळस मराठी माहिती | Aushadhi Vanspati Tulsi Marathi Mahiti | Medicinal Plant Basil Information In Marathi |
आपल्याकडील अनेक आयुर्वेदिक वनस्पतींमधील एक महत्वाची वनस्पती म्हणजेच तुळस आहे. तुळशीला हिंदीमध्ये तुलसी आणि इंग्रजीमध्ये Basil Plant असे म्हणतात.
हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र व मंगल्याचे प्रतीक असे मानले जाणारे व प्रत्येक घरात आवर्जून लावले जाणारे झाड म्हणजे तुळशीचे झाड. महाराष्ट्रात तर प्रत्येक घराबाहेर तुळशीचे वृंदावन असतेच असते व तुळशीला दैवीय स्थान दिलेले आहे त्यामुळे तिची सकाळ संध्याकाळ नित्यानियमाने पूजा केली जाते. हिंदू स्त्रिया दररोज या तुळशीजवळ दिवा लावून तिला हळद कुंकू लावतात व तिच्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि या तुळशीचा आशीर्वाद घेतात.
तुळशीला सकारात्मक ऊर्जा देणारे झाड मानले गेले आहे व घरावर येणारी बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा थांबविण्याचे काम हे तुळशीचे रोप करते अशी अनेक लोकांची धारणा आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांची महती खूप मोठी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायतही या तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे. वैष्णव परंपरेत तुळशीला खूप पवित्र मानले जाते. त्यामुळे वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा असतात.
तुळशीचे रोप हे सर्वसाधारणपणे ३० ते १२० से. मी. पर्यंत वाढते. या रोपाची पाने लांबगोल व किंचितशी टोकदार असतात. तुळशीच्या रोपाला वाढ झाल्यावर बिया येऊ लागतात. या तुळशीच्या बियांना " मंजिरी " असे म्हणतात.
तुळशीच्या अनेक जाती प्रसिद्ध आहेत. त्यातील काहींची नावे अश्याप्रकारे आहेत:
• औषधी तुळस .
• कृष्णा तुळस .
• कपूर तुळस.
• काळी तुळस / सब्जा / पंजाबी तुळस .
• राम तुळस.
• रान तुळस.
• लवंग तुळस.
• नील तुळस.
• लक्ष्मी तुळस.
• ज्ञान तुळस.
• श्वेत तुळस.
• रक्त तुळस.
अश्या अनेक प्रकारच्या तुळशी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात. त्यातील काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
• सर्दीखोकल्यावर उपयोगी तुळस - तुळशीची पाने नित्यानियमाने खाल्ल्यास सर्दी पडसे होत नाही त्याचप्रमाणे तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर घेतल्यास जुनाट खोकला ही कमी होण्यास ही मदत मिळते.
• दातदुखीवर गुणकारी तुळस - ज्या लोकांना दात दुखी, दात किडणे या सारखे त्रास अधून मधून जाणवत असतील त्यांनी दररोज तुळशीची काही पाने चावून खाल्ली तर त्यांची दातदुखी कमी होते.
• मुखदुर्घधी दूर साठी तुळस - तुळशीच्या पानांचा सुगंध चांगला असतो त्यामुळे ज्या लोकांना मुखदुर्गंधीची समस्या जाणवते त्यांनी तुळशीची पाने चघळल्यास त्यांची ही समस्या कमी होते.
• ऊर्जावंत तुळस - शरीरात जर थकवा जाणवत असेल किंवा कामामुळे मानसिक तणाव आला असेल अश्या वेळी जर आपण चहा बनविताना त्यात तुळशीची काही पाने टाकून चहा उकळून तो चहा प्यायल्यास शरीराला ऊर्जा मिळते व ताजे जाणवू लागते.
• मूतखड्यासाठी उपयुक्त तुळस - ज्या लोकांना तुळशीचा मुतखड्यासारख्या आजाराचा त्रास असतो त्यांनी दररोज ४ ते ५ तुळशीची पाने उपाशीपोटी खाल्ल्यास मुतखडा निघून जाण्यास मदत होते.
• त्वचेचा दाह कमी करते तुळशी - उन्हामुळे जर त्वचेचा दाह होत असेल किंवा त्वचेचे संक्रमण झाल्यास तुळशीच्या पानांचा लेप लावल्यास लवकर आराम मिळतो.
• मुरूमांनवर उपयोगी - ज्या तरुण मुलामुलींना सतत चेहऱ्यावर मुरूम्यांच्या समस्या असतात त्यांनी काही दिवस तुळशीच्या पानांचा लेप आपल्या मुरुमांवर लावल्यास ते कमी होण्यास मदत मिळते.
• डोकेदुखीवर उपयोगी - ज्यांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असे अश्या लोकांनी जर तुळशीच्या पानांचा लेप आपल्या डोक्यावर लावला तर तो त्रास कमी होतो.
• कर्करोगावर उपयुक्त - तुळस ही अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे तिचे दररोज सेवन केल्याने ती शरीरातील फ्री रेडिकल्सच्या प्रभावापासून पासून आपले संरक्षण करते व कर्करोगाच्या कोशिकांना नष्ट करण्यास मदत करते.
• उष्णता कमी करते - तुळशीच्या सेवनाने पोटातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत मिळते.
• रोगप्रतिकारक शक्तीवर्धक तुळस - तुळशीमध्ये फ्लेवोनाईड व फेवोनिक हे घटक असल्यामुळे तुळस ही आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते.
• तापामध्ये उपयुक्त तुळस - ताप आल्यास जर पाण्यात थोडीशी वेलची पावडर, साखर व दुधासोबत तुळशी काही पाने उकळून घ्यावीत आणि काढा करावा. हा काढा काही अंतराने रुग्णाला दिल्यास त्याचा ताप कमी होण्यास मदत मिळते.
• रक्तशुद्धिकरणासाठी उपयोगी - तुळशीच्या सेवनाने आपल्या शरीरातील रक्ताचेही शुद्धीकरण होण्यास मदत मिळते.
• किटक दंशावर उपयुक्त - पावसाळ्यात एखादे कीटक जर चावल्यास तुळशीच्या मुळांची पेस्ट तिथे लावल्यास कीटक दंश कमी होण्यास मदत मिळते.
• ऑक्सिजनची कमी पूर्ण करते - तुळशीच्या रोपामुळे आपल्याला हव्या असणाऱ्या ऑक्सिजनची कमी पूर्ण होते, व घरात शुद्ध हवा खेळती राहते.
• अनेक आजारांवर उपयोगी - तुळशीची पाने दररोज खाल्ल्याने स्वाईन फ्लू, डेंगू, मलेरिया या आजारांवर आपण मात करू शकतो.
• केसांसाठी उपयोगी - केसात जर वारंवार कोंडा होत असेल तर तुळशीच्या पानांची पेस्ट केसांना लावली तर केसातील कोंडा दूर होण्यासाठी मदत होते.
• तुळशीच्या पानांचे चाटण - तुळशीच्या पानांचे चाटण घेतल्यास शरीरातील अशक्तपणा कमी होऊन हिमग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास ही मदत होते.
अशी ही तुळस धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या व त्याचबरोबर आरोग्यदृष्ट्याही आपल्यासाठी खूप महत्वाची अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप हे असलेच पाहिजे.
टीप - वरील कोणतेही उपाय करण्याआधी कृपया तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.