Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मिल्खा सिंग यांच्याबद्दल मराठी माहिती - Information About Milkha Singh In Marathi.

मिल्खा सिंग यांच्याबद्दल मराठी माहिती | Information About Milkha Singh In Marathi.


            
मिल्खा सिंग यांच्याबद्दल मराठी माहिती - Milkha Singh Information In Marathi.
मिल्खा सिंग यांच्याबद्दल मराठी माहिती.



मित्रमैत्रिणींनो, आज आपण प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंगच्याबद्दल माहिती बघणार आहोत.

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ मध्ये गोविंदपुरा पंजाब येथे झाला. ते एका जाट परिवारात जन्माला आले होते. त्यांचे संपूर्ण नाव मिल्खा सिंग लाटीयान असे होते. भारत विभाजनाच्या वेळी आपल्या आई वडिलांना गमावल्यानंतर ते शरणार्थी बनून पाकिस्तानातून भारतात आले. 

त्याचवेळी त्यांनी जीवनात काहीतरी चांगले करून दाखवायचे हे मनाशी पक्के ठरविले होते. त्यानंतर पुढे १९५२ मध्ये भारतीय सेनेत विद्युत मॅकेनिकल इंजिनियरिंग शाखेमध्ये शामिल झाले व १९५६ मध्ये ते पटियाला मध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांच्या वेळी प्रसिद्धीच्या झोतात आले.

मिल्खा सिंग हे भारतातील सर्वश्रेष्ठ एथलिट्समधील एक मानले जातात. त्यांना 'Flying Sikh'- फ्लाईंग सिख म्हणजेच उडन सिख या नावानेही ओळखले जाते. Flying Sikh हे नाव त्यांना त्यांच्या वेगवान धावण्यामुळे मिळाले होते. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग हे क्रीडा विश्वात चांगलेच प्रसिद्ध होते.

भारत सरकारद्वारे त्यांना १९५९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

मिल्खा सिंग यांचे काही पुरस्कार :-

• इ.स.१९५८ मध्ये च्या एशियाई खेळामध्ये २०० मी व ४०० मी मध्ये सुवर्ण पदक.

• इ.स.१९५८ मध्ये राष्ट्रमंडळ खेळात सुवर्ण पदक.

• इ.स.१९५९ मध्ये पद्मश्री पुरस्कार.

• इ.स.१९६२ मध्ये एशियाई खेळात ४०० मी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक.

• इ.स.१९६४ मध्ये कलकत्ता राष्ट्रीय खेळात ४०० मी धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक.


मिल्खा सिंग हे चंदीगडला राहत असून त्यांच्या पत्नीचे नाव निर्मल कौर असे असून निर्मल कौर या देखील खेळाडू होत्या. त्या भारतीय महिला व्हॉलीबॉल टीमच्या कॅप्टन होत्या. त्यांच्या मुलाचे नाव जीव मिल्खा असे आहे.  मिल्खा सिंग यांचे पुत्र जीव मिल्खा हे एक गोल्फ खेळाडू आहेत.

भारतीय सेनेतील सेवानिवृत्तीनंतर मिल्खा सिंग हे खेळ निर्देशक पंजाब येथे रुजू झाले. मिल्खा सिंग यांनी खेळातून संन्यास घेतल्यानंतर ते भारत सरकारबरोबर खेळणार प्रोत्साहन देण्याचे काम करू लागले.

इ.स.२०१३ मध्ये प्रसिद्ध निर्माता, निर्देशक  व लेखक राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित " भाग मिल्खा भाग " हा चित्रपट बनविला आणि हा चित्रपट खूप चर्चित ही राहिला.

इ.स.२०१७ मध्ये मिल्खा सिंग यांचा लंडन मधील प्रसिद्ध  Madame Tussaude येथे मेणाचा पुतळा बनविण्यात आला आहे.

मिल्खा सिंग यांच्या ऑटोबायोग्राफीचे नाव "The Race Of My Life" असे आहे.

असे हे प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचे १८ जून, २०२१ रोजी चंदीगड येथे कोविड - १९ च्या आजाराने दुःखद निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close