मराठी पत्रलेखन | आजोबांच्या तब्येतीची चौकशी करणारे पत्र | Marathi Patralekhan | Letter Writing In Marathi |
![]() |
मराठी पत्रलेखन - आजोबांच्या तब्येतीची चौकशी करणारे पत्र |
आजोबांच्या तब्येतीची चौकशी करणारे पत्र लिहा.
दिनांक -
तिर्थस्वरूप आजोबा,
स. न. वि. वि.
आजोबा, तुम्ही कसे आहात? बरेच दिवस झाले तुमचे पत्र आले नाही. म्हणून मी आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही तुमची सर्व औषधे वेळेवर घेता की नाही? तुमचे पाय अधून मधून दुखत असतात याची ही मला पूर्ण कल्पना आहे परंतु दररोज सकाळ - संद्याकाळ जसे जमेल तसें थोडे थोडे बाहेर चालणे सुरु ठेवा म्हणजे तुमचा शारीरिक व्यायाम होत राहील.
योगा आणि प्रणायाम तर तुम्ही न चुकता नेहमी करताच व त्यात एक दिवसाचा ही कधी खंड पडू देत नाही हे ही मला माहितच आहे. त्याबद्दल तुमचे मला नेहमी कौतुकच वाटत राहिले आहे.
तुम्ही तुमच्या आरोग्याची व खाण्यापिण्याची काळजी घेतच असालच परंतु माझ्याकडून ही तुम्हाला हेच सांगणे आहे की तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा आणि औषधे चुकवू नका. म्हणजेच तुम्हाला कधी अशक्तपणा जाणवणार नाही.
आजोबा, माझी परीक्षा नुकतीच संपली आहे. तरी या वेळी दिवाळीला मी खूप दिवस गावी राहायला येणार आहे व तुमच्याबरोबर खूप मज्जा करायचे असे मी ठरविले आहे. मला तुमची खूप आठवण येते. तेव्हा तुम्ही नक्की तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मला पत्र लिहीत राहा. लवकरच भेटू.
अभय.
ई-मेल - ×××××××
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.