Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

औषधी वनस्पती कोरफडची मराठी माहिती - Korfadchi Marathi Mahiti - Medicinal Plant Aloe Vera Information In Marathi

औषधी वनस्पती कोरफडची मराठी माहिती - Korfadchi Marathi Mahiti - Medicinal Plant Aloe Vera Information In Marathi.


     
कोरफडची मराठी माहिती - Korfadchi Marathi Mahiti - Medicinal Plant Aloe vera Information In Marathi
कोरफडची मराठी माहिती 


आयुर्वेदातील अनेक प्रसिद्ध औषधी वनस्पतींपैकी कोरफड म्हणजेच English मध्ये जिला Aloe Vera असेही म्हणतात ही वनस्पती खूप महत्वाची आहे. कोरफडीला 'कुमारी' असेही म्हणतात कारण कायम तरुण अशी राहणारी ही वनस्पती किंवा हे झाड जो ह्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करतो त्या मनुष्यालाही कायम तरुण ठेवण्याचे काम करतो असे म्हणतात.

हया कोरफडीला म्हणजेच Aloe Vera ला कुमारी हे नाव असल्यामुळे स्त्रियांच्या आजारामध्ये व विशेषत: बाळंतीण स्त्रियांसाठी असे उपयुक्त आयुर्वेदिक प्रसिद्ध असे 'कुमारी आसव' हे औषध याच वनस्पती पासून बनविले जाते. कोरफडीच्या गरापासून बनविलेला 'काळा वोळ' हा स्त्रियांच्या आजारावर खूपच फायदेशीर ठरतो.

कोरफडीच्या ज्यूसच्या सेवनाने शरीरातील आतील अवयवांना नवसंजीवनी मिळते म्हणून पूर्वीच्या काळी कोरफडीला (AloeVera) अमरता प्रदान करणारी वनस्पती असेही काही जण म्हणत.

कोरफडीचे झाड हे हिरवेगार असून ते जाड, मांसल व काटेरी अश्या प्रकारचे असते. कोरफडीचे (Aloe Vera) चे आपल्या दैनंदिन जीवनात खूप लहानमोठे उपयोग होत असल्यामुळे बहुतेक घरांमध्ये कुंडीत ही वनस्पती लावलेली आपल्याला आढळते.

अशा या आयुर्वेदिक वनस्पतीचे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात ते आपण पाहू.

कोरफडीचे फायदे :

  • त्वचारोगावर फायदेशीर- कोरफडीमध्ये एन्टीबॅक्टरिअल (Antibacterial) व अँटीफंगल (Antifungal) व अँटीमाक्रोबल (Antimacrobal ) गुणधर्म असल्यामुळे त्वचेवरील कोणत्याही आजारासाठी ही वनस्पती उपयोगी ठरते.

  • जळणे किंवा भाजण्यावर उपयुक्त - अचानक जर आपल्याला भाजले गेले किंवा गरम तेल उडाले असल्यास तेल त्वरित कोरफडीचा गर त्यावर लावल्यावर भाजल्यामुळे होणारा त्वचेचा दाह कमी होतो व भाजलेल्या ठिकाणी फोड येत नाहीत.

  • सौंदर्यवर्धक म्हणूनही उपयोगी - कोरफडीच्या पानाचा गर हा जेलीप्रमाणे असतो तो गर जर दररोज चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होऊन त्वचेला नैसर्गिक तकाकी मिळते व चेहरा मुलायम राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील व्रण, डाग व पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

  • बद्धकोष्टतेच्या समस्यामध्ये आरामदायक - आजकल बहुतेक लोकांना बद्धकोष्टतेची समस्या उद्धभवत आहे अशा वेळी अजीर्ण झाल्यासारखे ही वाटते. या समस्येचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी जर रोज सकाळी उपाशी पोटी कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने त्यांना हा त्रास कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर अपचनाचा त्रास जास्तच होत असेल तर कोरफडीच्या गरामध्ये थोडेसे हळद व सैंधव मीठ मिसळून घ्यावे.

  • डायबेटीस किंवा मधुमेही रुग्णासाठी उपयुक्त -डाईबेटीसच्या रुग्णासाठी कोरफडीचे ज्यूस संजीवनीसारखे काम करते. त्यांनी नियमित जर प्रमाणात कोरफडीचे ज्यूस घेतले तर त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

  •  पोटदुखीवर रामबाण उपाय - जर एखाद्या व्यक्तीला वारंवार पोटदुखीची समस्या सतावत असेल तर कोरफडीच्या गरामध्ये थोडीशी साखर मिसळून द्यावी त्याने पोटदुखी बरी होते.

  •  डांग्या-खोकल्यावर गुणकारी - ज्यांना जुना खोकला किंवा डांग्या खोकल्याचा त्रास होत असेल अश्या व्यक्तीनी कोरफडीच्या रसामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतल्यास डांग्या खोकला थांबण्यास मदत होते.

  • केसांसाठी फारच गुणकारी - कोरफडीचा रस जसा त्वचेसाठी फारच उपयोगी असतो तसेच तो केसांसाठीही उत्तम काम करतो. जसे जर केस गळतीची समस्या असेल तर कोरफडीच्या रस केसांना लावल्यास केसांची गळती थांबून त्यांची चांगली वाढही होते त्याचबरोबर याच्या नियमित वापराने केस मऊ होण्यासही सुरुवात होते.

कोणतीही गोष्ट प्रमाणात घेतल्यास तिचा फायदा होतो परंतु तिचा अतिवापर केल्यास तिच्यापासून आपल्याला नुकसानही होऊ शकते. म्हणून आता कोरफडीचे काही नुकसान आपण पाहू.

कोरफडीचे नुकसान -

  • कोरफडीचा रस जास्त प्रमाणात घेतल्यास त्याची ऍलर्जी होऊ शकते किंवा अंगावर पित्त उठू शकते.

  • ज्या व्यक्तीना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी कोरफडीचे सेवन कमी प्रमाणात करावे अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.

  • लहान मुलांना कोरफडीच्या रसाचे सेवन करण्यास शक्यतो टाळावे.

कोरफड म्हणजेच Aleo Vera ही वनस्पती आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्यासाठी कितीही उपयोगी असली तरी तिचा कधी आणि कसा वापर करावा यासाठी आधी तज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा ही विनंती.



टीप - वरील कोणतेही उपाय करण्याआधी कृपया तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close