मराठी पत्रलेखन | आपल्या आजोबांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहा | Letter Writing In Marathi |
![]() |
आजोबांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र. |
मराठी पत्रलेखन - आजोबांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पत्र.
दिनांक -
तिर्थस्वरूप आजोबा,
स. न. वि. वि.
आजोबा कसे आहात तुम्ही? बरेच दिवस झाले तुमचे पत्र आले नाही म्हणून आज मुद्दामच मी पत्र लिहिण्यास घेतले आहे. पत्रास कारण की, उदया तुमचा ७५ वा वाढदिवस आहे त्यासाठी सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
यंदा माझे दहावीचे वर्ष असल्यामुळे व शाळेला सुट्टी करू न शकता येण्यामुळे या वर्षी मला तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी यायला मिळू शकत नाही यांची मला खूपच खंत वाटत आहे.
परंतु या वर्षी जशी माझी परीक्षा संपेल तसें मी लगेच गावी निघून येईन आणि मग आपण पुन्हा एकदा तुमचा वाढदिवस जोमात साजरा करू कारण तुमच्या वाढदिवसाच्या निम्मिताने मी खूप बेत मनात आखून ठेवले आहेत. तेव्हा आपण सगळे मिळून खूप मजा करू.
बरे मला सांगा तुम्ही तुमची औषधे वेळेवर घेत आहात ना? मी नेहमी तुमच्या पत्राची वाट बघतो तेव्हा मला मध्ये मध्ये पत्र पाठवीत राहा.
पुन्हा एकदा तुमच्या ७५ व्या वाढदिवसाला माझ्याकडून व आईबाबांकडून खूप खूप शुभेच्छा.
तुमचा नातू,
समीर.
ई-मेल- [email protected]
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.