मराठी पत्रलेखन | साखळी चोरास पकडून दिल्याबद्दल आपल्या मित्राला अभिनंदन पत्र लिहा | Letter Writing In Marathi |
![]() |
मराठी पत्रलेखन - साखळी चोरास पकडून दिल्याबद्दल आपल्या मित्राला अभिनंदन पत्र - Marathi Abhinandan Patra- Letter Writing In Marathi. |
मराठी पत्रलेखन - साखळी चोरास पकडून दिल्याबद्दल आपल्या मित्राला अभिनंदन पत्र .
दिनांक :
प्रिय मित्र अभय,
सर्वप्रथम तुझे मन:पूर्वक अभिनंदन मित्रा! आजच तुझ्याबद्दल बातमी कळली की आपल्या आवारातील एका सोनसाखळी चोरास तु तुझ्या हुशारीने आणि धाडसाने पकडून दिलेस. खरंच मित्रा! प्रसंगावधानता आणि बुद्धीचतुर्याचा उपयोग तु अगदी उत्तम प्रकारे करून आसपासच्या कित्येक लोकांचे मौलाचे ऐवज वाचविण्यास आज तु फारच मदतगार ठरलास.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या आवरातील सोनसाखळी चोरांचा त्रास जास्तच झाला होता त्यामुळे कित्येक स्त्रियांचे दागिने ही हिरवले गेले होते. परंतु आता ते सर्व परत मिळतीलच ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे.
तुझ्या हया महत्वपूर्ण कामगिरीबद्दल तुझा स्थानिक पातळीवर लवकरच सत्कार होणार आहे ही बातमी ही सर्वत्र पसरली आहे. त्याबद्दल खरंच मला तुझा खूप गर्व आहे. असेच नेहमी चांगले काम करीत राहा हीच सदिच्छा. माझ्या आई बाबांकडूनही तुझे खूप खूप हार्दिक अभिनंदन.
तुझा मित्र,
संजय.
ई-मेल- [email protected]
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.