Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी विनंती पत्रलेखन - शाळेतील विद्यार्थीनिधी मिळवण्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती पत्र - Letter Writing In Marathi.

मराठी विनंती पत्रलेखन | शाळेतील विद्यार्थीनिधी मिळवण्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती पत्र | Letter Writing In Marathi |




           
मराठी विनंती पत्रलेखन - शाळेतील विद्यार्थीनिधी मिळवण्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती पत्र - Letter Writing In Marathi.
मराठी विनंती पत्रलेखन - शाळेतील विद्यार्थीनिधी मिळवण्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती पत्र 



आपल्या शाळेत मुख्याध्यापकांना विद्यार्थीनिधी ( आर्थिक सहायता ) मिळवण्याबाबत विनंती पत्र लिहा.


दिनांक -

प्रति,
मुख्याध्यापक,
सरस्वती विद्यालय,
नाशिक.

विषय : विद्यार्थी निधी (आर्थिक सहायता ) मिळवण्याबाबत विनंती करणारे पत्र.

आदरणीय सर,

मी आपल्या शाळेत इयत्ता ८ वी अ मध्ये शिकणारा विद्यार्थी असून माझे नाव अभय आहे. माझ्या वर्गशिक्षिका सौ. पाटील बाई यांच्या संमतीने आज मी तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. सर, माझ्या घरची परिस्थिती बेताची आहे व घरी मी, माझी आई व माझी बहीण असे आम्ही तिघेच जण राहतो. माझी आई घरकाम करून आम्हाला सांभाळते. मला शिक्षणाची आवड आहे परंतु घरच्या परिस्थितीमूळे मला शाळेची फी भरण्यास अडचण येत आहे.

तरी या अडचणीवर पर्याय म्हणून आमच्या वर्गशिक्षिकांच्या मार्गदर्शनानुसार मी आपल्याकडून शाळेच्या विदयार्थीनिधी ( आर्थिक सहायता ) मिळावण्यासाठी अर्ज करीत आहे. तरी कृपया मला हा विदयार्थीनिधी प्राप्त करण्याची आपण परवानगी द्यावी ही विनंती.

मला शिक्षणाची खूप आवड आहे त्यामुळेच या मिळालेल्या विदयार्थीनिधीतून मी शाळेची फी भरण्याचा प्रयत्न करीन व चांगले मार्क मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी अभ्यासात मेहनत करेन.

मी आशा करतो की, आपण लवकरात लवकर माझा हा अर्ज मंजूर कराल व मला या योजनेचा लाभ मिळवून द्याल.

धन्यवाद.


प्रेषक,
आपला विद्यार्थी,


अभय सावंत.
इयत्ता ८ वी अ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close