Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

औषधी वनस्पती कडुलिंब मराठी माहिती - Aushadhi Vanspati Kadulimb Marathi Mahiti - Medicinal Tree Neem Information In Marathi.

औषधी वनस्पती कडुलिंब मराठी माहिती | Aushadhi Vanspati Kadulimb Marathi Mahiti | Medicinal Tree Neem Information In Marathi |



       

            
औषधी वनस्पती कडुलिंब मराठी माहिती - Aushadhi Vanspati Kadulimb Marathi Mahiti - Medicinal Tree Neem Information In Marathi.
औषधी वनस्पती कडुलिंब मराठी माहिती - Aushadhi Vanspati Kadulimb Marathi Mahiti


मित्रमैत्रिणींनो , आज  कडुलिंब म्हणजेच  नीम या औषधी वनस्पतीबद्दल माहिती आहोत. 

कडुलिंब हे मुख्यतः भारत, पाकिस्तान, नेपाळ व बांगलादेश येथे आढळणारा एक औषधी वृक्ष आहे. त्याला लिंब किंवा निंब असेही म्हणतात. परंतु शास्त्रीय भाषेत कडुलिंबाला Azadirachta Indica असे नाव देण्यात आलेले आहे. याला मराठीमध्ये जसे कडुलिंब म्हणतात तसें हिंदी मध्ये नीम व English मध्ये  Indian Lilak, Neem किंवा Margosa Tree असेही म्हणतात. याला आराध्यवृक्ष असेही म्हंटले जाते.

आपल्याकडे भारतात कडुलिंब या वृक्षाला अनेक महत्वाच्या औषधी वृक्षापैकी एक समजले जाते कारण ह्याचे कामही तेवढेच महत्वाचे आहे. कडुलिंबाच्या झाडाच्या पानांची चव कडू असल्यामुळे याला कडुलिंब असे नाव देण्यात आले.

कडुलिंब हे एक नैसगिकरित्या उगवणारे अत्यंत उपयोगी झाड असून ते आकाराने खूप मोठे असते. हे झाड जरी आकाराने मोठे आणि विशाल असले तरी त्यावरील फुले ही लहान असून ती सुगंधी असून पांढऱ्या रंगाची असतात. कडुलिंबाच्या फळाच्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात

इतर झाडांपेक्षा या झाडाला औषधीदृष्ट्या जास्त महत्व या साठी प्राप्त झाले आहे कारण या झाडाची पाने, फुले, फळे व बिया हे सर्वच कडू असून ते आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला खूपच उपयोगी आहेत. त्याचमुळे आपण या कडुलिंबाचा उपयोगी Antibacterial (अँटीबॅक्टरियल), Antifungal( अँटीफंगल ) , व Antiaging (अँटीएजिंग) म्हणूनही करतो.

आपल्याकडे हिंदू संस्कृतिमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा करतात या दिवशी गुढी उभारताना कडुलिंबाच्या पानांची डहाळी ही वापरता त्याचप्रमाणे या दिवशी कडुलिंबाच्या पानांबरोबर गूळ खाण्याची ही पद्धत आहे.

कडुलिंब हे औषधी असल्यामुळे त्याला आयुर्वेदातही खूप महत्व आहे.

आता आपण या महत्वपूर्ण झाडाचे काही फायदे पाहूया.

• काही ठिकाणी परंपरागत कडुलिंबाच्या काडीने दात घासण्याची पद्धत अजूनही सुरु आहे कारण ही काडी चवीला कडू असल्यामुळे ही कधी चावून दात स्वच्छ केल्यास दात किडत नाहीत व मजबूत होण्यास मदत होते.

• ज्या लोकांना उन्हाचा त्रास होत असेल त्यांनी जर कडुलिंबाच्या काड्यांचा रस घेतल्यास त्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

• कडुलिंबाची पाने जर साठवणीच्या धान्यांच्या डब्ब्यात थोडी थोडी टाकून ठेवली तर त्या धान्यामध्ये अळ्या किंवा कीड लागत नाही व ते धान्य चांगल्या प्रकारे महिनोमहीने टिकते.

• कडुलिंब हे Antifungal असल्यामुळे ज्या लहान मुलींच्या डोक्यात उवा किंवा कोंडा याचा त्रास असेल तर कडुलिंबाच्या पानांचा तेल जर काही दिवस त्यांना लावल्यास उवांपासून सुटका होण्यास निश्चितच मदत होते.

• घरातील वयस्क आणि वृद्ध व्यक्तीना जर सतत सांधेदुखीचा त्रास होत असेल तर काही दिवस कडुलिंबाच्या तेलाने मसाज केल्यास त्यांना सांधेदुःखीच्या त्रासापासून आराम मिळतो.

• कडुलिंबाच्या पानांचा लेप जर चेहऱ्यावरील मुरूम व तारुण्यपिटीकावर लावल्यास ते कमी होतात व त्याचे डाग ही नाहिशे होण्यास मदत मिळते.

• कडुलिंबची पाने जर गरम पाण्यात उकळवून त्या पाण्याने जर अंघोळ केली तर त्वचारोगाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते व त्वचेचे आजार आपल्यापासून लांब राहतात.

• ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारामध्ये ही कडुलिंबाचा काढा गुणकारी ठरतो.

• कडुलिंब हे मूळत: कडूच असल्यामुळे स्त्रियांच्या पोटासंबधी आजारामध्ये कडुलिंब हे रक्त शुद्ध करण्याचे काम करते व रक्तशुद्धिकरणामुळे शरीतील यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करू शकते.

• ज्या व्यक्तींना डायबेटीसचा त्रास आहे श्या व्यक्तीनी जर कडुलिंबाचे पान उपाशीपोटी खाल्ल्यास त्यांना डायबेटीस वर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळते.

• कडुलिंब हे Antioxidant असल्यामुळे त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत मिळते कारण तो फ्री रेडिकल्सचा प्रभाव थांबवितो.

परंतु ज्या प्रमाणे एखादी गोष्ट आरोग्यासाठी उपयोगी असते तसेच जर तिचा जास्त प्रमाणात वापर केल्यास ती आपल्याला अपायकारकाही ठरू शकते.

• कडुलिंबाच्या अतिसेवानाने किडनीचे त्रास उद्धभवू शकतात तसें यकृताचे आजारही बळावू शकतात.


कडूलिंबाची झाडें जिथे जास्त प्रमाणात आढळतात तेथील हवा कायम शुद्धच राहते आणि अश्या या झाडाच्या सानिध्यात राहिल्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत मिळते म्हणूनच काही लोक कडुलिंबाचे झाड घराजवळ असल्यास शुभ मानतात.

असे हे कडुलिंबाचे बहुपयोगी व औषधी झाड आपल्याला निरोगी आयुष्यासाठी नेहमीच मदत करीत असतो म्हणूनच आपण असे म्हंटले पाहिजे की "कडुलिंबच आपला खरा मित्र आहे."



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close