Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी संवाद लेखन- शाळेच्या सहलीबद्दल आई मुलीमधील संवाद - Shalechya Sahalibaddal Aai Mulimadhil Sanvad - Sanvad Lekhan In Marathi.

मराठी संवाद लेखन | शाळेच्या सहलीबद्दल आई मुलीमधील संवाद | Shalechya Sahalibaddal Aai Mulimadhil Sanvad | Sanvad Lekhan In Marathi |



         
मराठी संवाद लेखन- शाळेच्या सहलीबद्दल आई मुलीमधील संवाद - Shalechya Sahalibaddal Aai Mulimadhil Sanvad - Sanvad Lekhan In Marathi.
मराठी संवाद लेखन- शाळेच्या सहलीबद्दल आई मुलीमधील संवाद.




शाळेची सहल जाण्याबद्दल आई आणि मुलीमधील संवाद लिहा.



मुलगी - ( शाळेतून घरी येऊन ) आई! ए, आई!

आई - काय ग दिपू? अशी शाळेतून आल्या आल्या हाका का मारत आहेस?

मुलगी - हो. अग बातमीच तशी आहे. मी आज खूप आनंदी आहे.

आई - आनंदी! ते का बरे?

मुलगी - अग आई, आज शाळेत आम्हाला सूचना दिली आहे की पुढील आठवड्यात आमच्या शाळेची सहल जात आहे. किती मज्जा ना?

आई - अरे वाह. शाळेची सहल. म्हणजेच तुम्हा मुलाची तर अगदी चंगळच आहे मग.

मुलगी - हो ना. आम्ही सर्व जण ही सुचना ऐकल्यावर इतके खूष झालो काय सांगू तुला!

आई - अग पण तू मला सांगितले नाहीस की तुझी सहल कोणत्या ठिकाणी जाणार आहे आणि त्याची फी किती द्यायची आहे?

मुलगी - अरे हो. मी तर आनंदाच्या भरात तुला सांगायचेच विसरले की माझी सहल राणीच्या बागेत जाणार आहे आणि त्याची फी प्रत्येकी २०० रुपये द्यायची आहे आणि सहल पुढील आठवड्यात शनिवारी सकाळी 7 वाजता जाणार आहे.


आई - पुढील शनिवारी? म्हणजेच लगेचच आहे.

मुलगी - हो ना. पण आई मी जाऊ ना ग शाळेच्या या सहलीला?

आई - हो हो. नक्की जा तू. पण त्याआधी संद्याकाळी तुझे बाबा ऑफिसमधून घरी आले की त्यांना सहलीबद्दल सर्व कल्पना दे आणि त्यांची ही परवानगी नक्की घे.

मुलगी - हो नक्कीच. कधी एकदा बाबा घरी येतात आणि मी त्यांना ही आनंदाची बातमी सांगतेय असे मला झाले आहे.

आई - अग राणीच्या बागेत तुला बरेच प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील. छानच आहे.

मुलगी - अग हो आई. आमच्या वर्गशिक्षिका तर सांगत होत्या की तिथे पेंग्विन ही आहेत. मला पेंग्विन बघण्याची खूपच इच्छा होती.

आई - हो पेंग्विन तेथील एक प्रमुख आकर्षण आहेत आणि आणखी ही विविध प्राणी पक्षी बघायला मिळतील तुला. खूप मज्जा करा तुम्ही सर्व मुले तेथे.

मुलगी - हो मी खूप मज्जा करणार.

आई - पण लक्षात ठेव तेथे गेल्यावर शिक्षकांच्या सुचनांचे पालन कर आणि आपल्या शाळेच्या गटाबरोबरच राहा. काळजी घे स्वतःची.

मुलगी - हो आई. मी नक्की तू सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवीन. चला शाळेच्या सहलीला!



आमचे हे संवाद लेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close