मराठी विनंती पत्र | शाळेत अभ्यासिकेची व्यवस्था व्हावी असे शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विनंती पत्र | Shalet Abhyasika Vhavi Ase Mukhyadhyapakankade Vinanti Patra| Letter Writing In Marathi |
मराठी विनंती पत्र- शाळेत अभ्यासिकेची व्यवस्था व्हावीअसे शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विनंती पत्र |
शाळेत अभ्यासिकेची व्यवस्था व्हावी अशी मागणी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विनंती अर्ज करा.
दिनांक -
प्रति,
मुख्याध्यापक,
बालमोहन विद्यालय,
लातूर.
विषय : शाळेत अभ्यासिका व्हावी असे विनंती करणारे पत्र.
आदरणीय सर,
मी कु. समीर राणे, आपल्या शाळेतील इयत्ता 10 वी अ मधील विद्यार्थी असून माझ्या वर्गशिक्षकांच्या परवानगीने मी माझ्या इतर विद्यार्थी मित्रांच्या वतीने आपल्याला ही विनंती करतो की, जर आपल्या शाळेत अभ्यासिका सूरु करण्यात आली तर फारच बरे होईल.
सर, मी याबाबत आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की, शाळेतील अनेक विद्यार्थी हे अभ्यासात हुशार असून ते आपल्या अभ्यासासाठी फार मेहनत ही घेताना दिसतात परंतु यामधील कित्येक विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याच्या घराच्या आसपासचे वातावरण अभ्यासासाठी पूरक व पोषक नाही आहे. त्यामुळे अश्या मुलांसाठी आपण जर शाळेत अभ्यासिका सुरु केल्यास त्यांना व आम्हा सर्वानाचा त्याचा लाभ घेता येईल व कोणाच्याही अभ्यासात परिस्थितीमुळे अडथळा निर्माण होणार नाही असे मला वाटते
तरी माझी आपल्याला ही विनंती आहे की, आपण माझ्या हया मागणीचा सर्व बाजूनी विचार करून योग्य तो निर्णय घ्याल व शाळेत अभ्यासिका सुरु कराल. आम्ही आपल्या सूचना पत्राची वाट बघत आहोत कृपया आपण याबाबत लवकर निर्णय घ्याल हीच विनंती.
आपला विद्यार्थी,
कु. समीर राणे,
इयत्ता -10 वी अ.
ई-मेल - [email protected]
आमचे हे पत्रलेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.