औषधी वनस्पती गवती चहा माहिती | Aushadhi Vanspati Gavti Chaha Mahiti | Medicinal Plant Lemon Grass Information In Marathi |
गवती चहा हे एक औषधी वनस्पती आहे. गवती चहाला बागेतील औषध असेही म्हणतात. हे बागेतील औषध घरोघरी पहायला मिळते. काही ठिकाणी गवती चहाच्या पानांना चहाची पात असेही म्हणतात.
गवती चहाचे शास्त्रीय नाव Cymbopogon Citratus व इंग्रजी नाव Lemon Grass असे आहे.
संस्कृतमध्ये हिला सुगंधीतृण, हिंदीत अग्याघास, गंधबेला, सिंधीमध्ये हरिचांय, तर बंगालीमध्ये गंधतृण म्हणतात.
गवती चहा ही महाराष्ट्रात, कर्नाटकात, व केरळ मध्ये जास्त प्रमाणात आढळते. यांच्या पानांची लांबी १-१.५ मी लांब व टोकाला निमुळती होत गेलेली हिरव्या रंगाची असतात.
गवती चहाचां अर्क बाजारात उपलब्ध असतो त्यास " ऑईल ऑफ व्हब्रेना " किंवा " इंडियन म्रेलिसा ऑइल " असे म्हणतात.
गवती चहा बनविण्याच्या पद्धतीमध्ये या चहाच्या पानांचे तुकडे करून उखळत्या गरम पाण्यात टाकून त्यात चहा पावडर टाकली की दररोजच्या साध्या चहाला पण वेगळीच चव निर्माण होते व अश्या प्रकारे बनविण्यात आलेली चहा ही आरोग्यासाठी ही उपयुक्त असते.
गवती चहाचे काही फायदे.
• गवती चहाच्या पानांचे तेल उध्वपतन पद्धतीने काढले जाते. हे तेल जंतनाशक, कुष्ठरोगावर उपयोगी, त्वचाविकारांवर ही उपयोगी असते. त्याचबरोबर पोटातील वात विकारांवर ही हे तेल अत्यंत उपयोगी ठरते.
• गवती चहाचे तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून छपाईचा कागद किंवा लिहिण्याचा कागद तयार करण्यात येतो.
• गवती चहा कफ व वात दोन्ही विकारांवर उपयुक्त ठरतो.
• गवती चहाच्या तेलाचा वापर सुगंधी तेले बनविण्यासाठी, सौंदर्यप्रसाधनात व अत्तर म्हणूनही केला जातो.
• गवती चहाच्या पानांचा वापर घरातील साठवणीच्या धान्याच्या डब्ब्यात कीटकनाशक म्हणूनही केला जातो.
• गवती चहाचे दररोज सेवन करण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
• गवती चहा सर्दी ताप या मध्ये ही गुणकारी ठरतो.
• दररोज गवती चहा पिण्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होते व संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते.
• पोट फुगण्याची तक्रार जाणवत असल्यास गवती चहाचे सेवन करावे त्यामुळे आराम मिळतो.
• तीव्र डोकेदुखीची समस्या जाणवत असल्यास गवती चहामुळे आराम मिळतो.
• शरीरातील कोणतेही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने मालिश केल्यास त्रास कमी होण्यास मदत मिळते.
अश्या प्रकारे औषधी अश्या हया गवती चहाचां वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात केला तर त्याचे आपल्याला अनेक फायदे जाणवतात.
अश्या या आयुर्वेदिक व उपयुक्त वनस्पतीचा वापर आपण तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या रोजच्या जीवनात योग्य प्रमाणात केल्यास गवती चहाचे आपल्याला खूप चांगले फायदे होऊ शकतात.
टीप - वरील कोणतेही उपाय करण्याआधी कृपया तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.