Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी पत्रलेखन -शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला अभिनंदन पत्र - Shikshakana Aadarsh Shikshak Purskar Milala Abhinandan Patra - Letter Writing In Marathi.

मराठी पत्रलेखन | शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला अभिनंदन पत्र | Shikshakana Aadarsh Shikshak Purskar Milala Abhinandan Patra | Letter Writing In Marathi |



         
मराठी पत्रलेखन -शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला अभिनंदन पत्र - Shikshakana Aadarsh Shikshak Purskar Milala Abhinandan Patra -  Letter Writing In Marathi.
शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार अभिनंदन पत्र - Shikshakana Aadarsh Shikshak Purskar Abhinandan Patra 


   


तुमच्या शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.




दिनांक -


प्रति,
आदरणीय जोशी बाई,
सरस्वती विद्यामंदिर,
सांगली.



विषय : आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल.

आदरणीय बाई,

मी आपल्या शाळेतील विद्यार्थी कु. समीर पाटील, इयत्ता १० वी अ मध्ये शिकत असून मी माझ्या वर्गाचा विद्यार्थी प्रतिनिधी यां नात्याने व माझ्या वर्गशिक्षकांच्या परवानगीने आपणास हे पत्र लिहीत आहे. कालच समजलेल्या बातमीनुसार तुम्हाला या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे हे ऐकून आम्हा सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फारच आनंद झाला आहे. त्याबद्दल आम्हा सर्वतर्फे आपले मनपूर्वक खूप खूप अभिनंदन.

आपण गेली कित्येक वर्षें या शाळेत मनापासून आपल्या विद्यार्जनाचे काम अगदी नेटाने व शिस्तीने करीत आलेले आहात. आपल्या शिकवणीतून तयार झालेले कित्येक विद्यार्थी आज चांगल्या जागी कार्यरत आहेत. त्याचा आम्हा सर्वाना खूप अभिमान आहे. आपल्याला मिळालेला हा पुरस्कार ही या कार्याची एक छोटीशी पोचपावतीच आहे.

मी आशा करतो की, आपण असेच आपले कार्य आणि आपल्याकडील अमूल्य ज्ञान आम्हाला व आमच्या येणाऱ्या पुढील पिढीलाला देऊन त्यांचे भिवितव्य ही उज्ज्वल करण्यासाठी मदत कराल.
पुन्हा एकदा संपूर्ण शाळेतर्फे आपले खूप खूप अभिनंदन.


आपला विद्यार्थी,
कु. समीर पाटील.
सरस्वती विद्यामंदिर,
इयत्ता १० वी अ,
सांगली.


आमचे हे पत्रलेखन कसे वाटले नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close