Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी तक्रारपत्र - खरेदी केलेले खेळाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार पत्र - Marathi Takrar Patra - Kharedi Kelele Khelache Sahitya Nikrusth Darjache Aslyachi Takrar Patra - Letter Writing In Marathi.

मराठी तक्रारपत्र | खरेदी केलेले खेळाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार पत्र | Marathi Takrar Patra | Kharedi Kelele Khelache Sahitya Nikrusth Darjache Aslyachi Takrar Patra | Letter Writing In Marathi |




                  
मराठी तक्रारपत्र - खरेदी केलेले खेळाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार पत्र - Marathi Takrar Patra - Kharedi Kelele Khelache Sahitya Nikrusth Darjache Aslyachi Takrar Patra - Letter Writing In Marathi.
मराठी तक्रारपत्र - खरेदी केलेले खेळाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार पत्र.




तुम्ही खरेदी केलेले खेळाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करणारे पत्र लिहा.



दिनांक

प्रति,
चॅम्पियन स्पोर्ट्स शॉप,
एम.जी. रोड,
अकोला.

विषय - खेळाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे निघाल्याचे तक्रार पत्र.

महोदय,

मी कु. धीरज सुर्वे, नवजीवन हायस्कूल, स्टेशन रोड, अकोला येथील इयत्ता 10 अ मधील क्रीडा प्रतिनिधी असून दोन दिवसांपूर्वी मी आपल्या दुकानातून आमच्या शाळेसाठी काही खेळाचे साहित्य मागविले होते ते आजच मिळाले.

पत्रास कारण की, तुम्ही पाठविलेले सारे साहित्य आज मी आणि माझ्या सहकाऱ्याने तपासले असता त्यातील बहुतेक खेळाचे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आमच्या लक्षात आले आहे.

गेली 3-4 वर्षे आम्ही आमच्या शाळेसाठी लागणारे क्रीडा साहित्य हे आपल्याच दुकानातून घेत आलेलो आहे आणि त्याच्या उत्तम दर्जावर आम्हाला पूर्ण विश्वास असल्यामुळेच प्रत्येक वेळी आम्ही आपल्याकडूनच साहित्य मागवीत आलेलो आहे.
परंतु या वेळी मात्र साहित्याचा दर्जा ज्या प्रकारे खालावलेला आढळून आला त्याबद्दल आम्हाला अपॆक्षा नव्हती.

तरी आपण एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या निगराणीखाली आमच्या शाळेसाठी नवीन व चांगल्या प्रतीचे क्रीडा साहित्य पाठवून हे निकृष्ट दर्जाचे साहित्य घेऊन जाण्याची तजवीज करावी.

मी आमच्या शाळेतर्फे ही आशा करतो की, तुम्ही हे काम लवकरात लवकर करून पुढील वेळी क्रीडा साहित्य नीट तपासून पाठवाल.


प्रेषक,
कु. धीरज सुर्वे,
नवजीवन हायस्कूल,
अकोला
ई-मेल - [email protected]



आमचे हे पत्रलेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close