Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी कथालेखन - जे पेराल तेच उगवेल - Marathi Kathalekhan - Je Peral Tech Ugavel- Story Writing In Marathi.

मराठी कथालेखन | जे पेराल तेच उगवेल | Marathi Kathalekhan | Je Peral Tech Ugavel | Story Writing In Marathi |




      
       
मराठी कथालेखन - जे पेराल तेच उगवेल - Marathi Kathalekhan - Je Peral Tech Ugavel- Story Writing In Marathi.
मराठी कथालेखन - जे पेराल तेच उगवेल - Marathi Kathalekhan.




शिर्षक - जे पेराल तेच उगवेल.



एक शेतकरी - खूप कष्ट करणे - एका गावाहून दुसऱ्या गावाला पायी जाणे - तेथून बी बियाणे आणून विकणे व स्वतःच्या शेतात पेरणे - त्याच्या कडे दोन पोते - एका पोत्यात छिद्र असणे - मुलांचे विचारणे तुम्ही फाटके पोते का नेता - शेतकऱ्याचे उत्तर - त्या पोत्यातून मी फळझाडांचे व फुलझाडाचे बियाणे आणतो - ते बियाणे रस्त्याच्या कडेला पडणे - नवीन झाडे उगवणे - तात्पर्य.


रामपूर नावाच्या गावात एक महादू नावाचा शेतकरी राहत होता. महादू खूप कष्टाळू होता. तो त्याच्या पत्नी व दोन मुलांबरोबर आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे व फुलझाडे उगवीत असे.

हया फळझाडांची व फुलझाडांची शेती करण्यासाठी लागणारी बी - बियाणे खरेदी कऱ्यांसाठी महादू शेतकऱ्याला एका गावातून दुसऱ्या गावात पायी जाऊन आणावे लागत असे. दुसऱ्या गावातून आणलेली ही बियाणे महादू शेतकरी हा काही स्वतःच्या शेतात पेरत असे व काही बियाणे तो विकत ही असे.

बियाणे आणण्यासाठी शेतकरी दोन पोते आपल्या बरोबर नेत असे. त्यातील एका पोत्याला छिद्र पडलेले होते. शेतकऱ्याला माहिती होते की तो जे दोन पोते प्रत्येक वेळी स्वतः बरोबर नेत आहे त्यातील एका पोत्याला छिद्र आहे तरीही तो दरवेळी तेच छिद्र असलेले पोते नेत असे.

शेतकऱ्याच्या अश्या वागण्याचे त्याच्या मुलांना नेहमी आश्चर्य वाटत असे. एके दिवशी शेतकऱ्याच्या मुलांनी त्याला हे विचारायचे ठरविले. दोन्ही मुले आपल्या वडिलांजवळ गेली आणि त्यांनी शेतकऱ्याला विचारले कीं तुम्ही फाटके पोते कां बरे नेता?

यावर शेतकऱ्याने आपल्या मुलांकडे बघून स्मित हास्य केले आणि तो त्यांना म्हणाला कीं, मुलांनो, मी दोन प्रकारचे पोते हे बियाणे आणायला नेतो व चांगल्या पोत्यात आपल्या शेतासाठी लागणारे बियाणे आणतो व फाटक्या पोत्यात जे बियाणे आणतो त्यात ही मी फळझाडे व फुलझाडे यांचीच बियाणे आणतो.

परंतु हे पोते थोडेसे फाटके असल्यामुळे दुसऱ्या गावावरून आपल्या गावी येईपर्यंत मी जेवढा रस्ता प्रवास करतो प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या कडे - कडेने ही फळझाडांचे व फूलझाडांचे बियाणे पडत पडत येतात व आपल्या गावी येईपर्यंत ते सारी बियाणे रस्त्याच्या कडेने पाडून संपून जातात आणि याचाच फायदा पुढे जाऊन काही दिवसांनी असा होत आहे कीं पुढील वेळी जेव्हा मी त्याच रस्त्याने दुसऱ्या गावी जातो तेव्हा रस्त्याच्या कडेला मला नवीन झाडें उगवलेली दिसण्यात येतात.

झाडांचे आपल्या आयुष्यात फार महत्वाचे स्थान आहे आणि हीच झाडें आपल्याला ऑक्सिजन पुरवितात, वातावरणातील हवा शुद्ध ठेवतात व वेळेला आपल्याला फळे देऊन आपली भूक ही भागवितात.

माझे असे करण्यामागे एकच उद्देश आहे कीं झाडांची अनावश्यक छाटणी करण्याने निसर्गाचे जे नुकसान होते त्याची कमी भरून काढणे व झाडें लावून झाडें जगवण्यासाठी आपल्या बाजूने छोटासा प्रयत्न करणे.

कारण जर आपण चांगले कार्य केले तर त्यांचे पुढील परिणाम ही चांगलेच होतात. मुलांनो, तुम्ही जे पेराल तेच उगवेल हे लक्षात ठेवा. तेव्हा नेहमी सत्कर्म करा म्हणजेच त्याचे फळ ही चांगलेच मिळेल.

वडिलांच्या हया कार्याबद्दल त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांचे कौतुक वाटले व त्यांना आपल्या वडिलांचा अभिमान ही वाटला. आपणही तुमच्या सारखेच असे चांगले कार्य करू व तुमचा हा वारसा पुढे नेऊन हे कार्य असेच चालत ठेवू असे शेतकऱ्याची मुले त्याला आश्वासन देतात. शेतकऱ्याला ही हे ऐकून खूप आनंद होतो.



तात्पर्य -


( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )



आमची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close