Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वारली चित्रकला मराठी माहिती - Warli Chitrakala Marathi Mahiti - Information About Warli Painting In Marathi.

वारली चित्रकला मराठी माहिती | Warli Chitrakala Marathi Mahiti | Information About Warli Painting In Marathi |




     
वारली चित्रकला मराठी माहिती - Warli Chitrakala Marathi Mahiti - Information About Warli Painting In Marathi.
वारली चित्रकला मराठी माहिती - Warli Chitrakala Marathi Mahiti.



भारतीय संस्कृती ही विविध जाती धर्माच्या लोकांनी बनलेली आहे म्हणूनच ही संस्कृती विविधतेने नटलेली आहे असे आपण म्हणतो व येथे अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहातात. यातील अनेक राज्यातील विविध जाती-जमातीचे लोक आपापली संस्कृती ही वर्षानुवर्षे जपून आहेत.

अशापैकीच महाराष्ट्रातील एक जमात म्हणजेच "आदिवासी वारली जमात" ही आहे. वारली जमात ही मुख्यतः महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात वास्तव्याला असल्याचे दिसण्यात येत असून महाराष्ट्रासह गुजरात व कर्नाटकातही हे लोक अधिक प्रमाणात दिसण्यात येतात.

डॉ. विल्सन यांच्या मते दक्षिणेतील सात कोकणापैकी वरलार हया कोकणात राहणारे ते वारली, अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. वारली जमातीचे लोक पाड्यात राहतात. पाडा म्हणजेच सात- आठ किंवा दहा - पंधरा खोपट्याचा समूह असतो. वारल्यांचे पाडे हे उंचावट्यावरील झाडांचा आश्रय घेऊन त्यांच्या सावलीला बसविलेले असतात.

वारली जमातीचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच त्यांची प्रसिद्ध अशी "वारली चित्रकला" (Warli Painting) ही होय. या वारली चित्रांममध्ये एक चौकोन, एक वर्तुळ, एक त्रिकोण असतो. या चित्रांमध्ये विशेष करून शिकार, मासेमारी, शेती, उत्सव, विविध नृत्य, प्राणी व झाडें अश्या अनेक दृश्याचा समावेश असतो. या चित्रांमध्ये "तारपा" हे पारंपरिक वाद्य वाजविणारा पुरुष माध्यभागी उभा राहून त्याच्या भोवती गोलाकारपणे नृत्य करणारे स्त्री -पुरुष अश्या प्रकारची चित्रे रेखाटलेली दिसण्यात येतात.

"विधी चित्रे" ही बहुदा झोपड्यांमध्ये आढळतात. या झोपड्यांच्या भिंती बनविण्यासाठी झाडाच्या फ़ांद्या, माती व शेण यांचे एकत्रित मिश्रण वापरले जाते. या वारली चित्रकलेची पाश्वभूमी ही लाल गेरूने रंगविलेली भिंत असते तर वारली चित्रकला ही संपूर्णपणे पांढऱ्या रंगाने केलेली असते. वारली चित्रकलेसाठी लागणारा पंधरा रंग म्हणजेच तेथील लोकांनी बनविलेले तांदळाची पिठी आणि डिंक येणाचे एक घट्ट असे मिश्रण असते.

ही वारली चित्रकला काठाण्यासाठी बांबूची लाकडी काठी दातांनी चावून त्याचा कुंचला बनविण्यात येतो व त्याचा चित्रे काढण्यासाठी उपयोग केला जातो.

वारली चित्रकला ही खूप प्रसिद्ध व अनेकांच्या पसंतीला येणारी अशी एक विशिष्ट कला आहे. हया चित्रांमधील भित्तीचित्रे ही फक्त विवाहसोहळ्यासारख्या महत्वाच्या प्रसंगी काढतात. आजच्या काळात घरे, भिंती, फुलदाण्या, कपडे व पिशव्या अश्या अनेक ठिकाणी ही सुंदर अशी नक्षीकामाची वारली चित्रकला सर्वत्र काढली जाते. अशी ही सुंदर वारली चित्रकला ही आपल्या आदिवासी बांधवांच्या जणू रक्तातच असते.

नवी दिल्ली येथील आनंदग्राम येथे वारली संस्कृतीचे संग्रहालय आहे. जिव्या सोमा म्हसे या वारली चित्रकराने वारली चित्रकला जगभरात पोहचविण्यात मदत केली. जिव्या सोमा म्हसे यांना या कलेसाठी भारत सरकारचा गौरव प्राप्त झालेला आहे. पद्मश्री जिव्या सोमा म्हसे व त्यांच्यासारख्या अश्या अनेक गुणी कलावंतांनी या वारली चित्रकलेस मोठे करण्यास आपला हातभार लावलेला आहे.


वरील माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close