तक्रार पत्र | वृक्षारोपणासाठी मागविलेली रोपे खराब निघाल्याबद्दल तक्रार पत्र | Vruksharopanasathi Magvileli Rope kharab nighalyabaddal Patra | Letter Writing In Marathi |
वृक्षारोपणासाठी मागविलेली रोपे खराब निघाल्याबद्दल तक्रार पत्र -Vruksharopanasathi Magvileli Rope kharab nighalyabaddal Patra. |
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मागवलेल्या रोपांमधील निम्मी रोपे खराब निघाल्याबद्दल शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वनअधिकाऱ्यांना तक्रार पत्र लिहा.
दिनांक
प्रति,
वनअधिकारी,
सुंदरबन उद्यान,
सातारा.
विषय - शाळेच्या वृक्षारोपणासाठी मागविलेली रोपे खराब निघाल्याबद्दल.
माननीय वनअधिकारी सर,
माझे नाव कु. निलेश निकम असून मी सरस्वती हायस्कूल, सातारा येथे इयत्ता १० वी अ मध्ये शिकत असून माझ्या वर्गशिक्षकांच्या परवानगीने शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे लक्षात आणू इच्छितो की, आम्ही आमच्या शाळेतील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या उद्यानातून काही रोपे मागविली होती परंतु आपल्याकडून मागविलेली रोपे जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा त्या रोपांपैकी निम्मी रोपे ही खराब झालेली आढळली आहेत व प्राप्त रोपांचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसण्यात आले आहे.
आम्ही प्रत्येकवेळी आपल्याकडूनच रोपे विकत घेतो व कधीही अश्या प्रकारच्या दर्जाची रोपे आम्हाला आढळली नाहीत परंतु या वेळी मात्र रोपांचा दर्जा खराब आहे. तरी आपण यावर त्वरित लक्ष देऊन आम्हास उत्तम प्रकारची नवीन रोपे लवकरात लवकर पाठविणे.
आपण माझ्या तक्रारीकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हास खराब रोपे बदलून दुसरी नवीन रोपे त्वरित पाठवाल अशी मी आशा करतो.
प्रेषक,
निलेश निकम,
सरस्वती हायस्कूल,
सातारा.
Email- [email protected]
वरील पत्रलेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.