कथालेखन मराठी | आळशाला कामे दुप्पट | Kathalekhan Marathi | Aalashala Kame Duppat | Story Writing In Marathi |
कथालेखन मराठी - आळशाला कामे दुप्पट - Kathalekhan Marathi - Aalashala Kame Duppat . |
शिर्षक - आळशाला कामे दुप्पट.
श्रीमंत म्हातारा - एक नोकर - कोंबडा आरवला की म्हातारा उठे - नोकराला लवकर उठवून काम करायला सांगे - नोकराने विचार करून कोंबड्याला मारणे - म्हातार्याचे वेळी अवेळी उठणे - नोकराला पहिल्यापेक्षा जास्त काम - पश्चात्ताप - तात्पर्य.
एका गावात एक श्रीमंत आणि खडूस म्हातारा राहत होता. म्हाताऱ्याजवळ खूप पैसा व जमीन जुमला होता. भरपूर पैसा अडका असल्यामुळे म्हाताऱ्याला सगळी कामे नीटनेटकी झालेली हवी असायची. त्या म्हाताऱ्याजवळ एक कोंबडा होता. तो कोंबडा आरवला की म्हाताऱ्याचा दिवस सुरु होई.
कित्येक वर्षे म्हाताऱ्याची हीच सवय होती की कोंबडा आरवला की म्हातारा उठत असे आणि तो आपापल्या नोकरांना कामाला लावत असे आणि त्यांच्याकडून सगळी कामे व्यवस्थितपणे करून घेत असे.
म्हाताऱ्याकडे एक नोकर होता ज्याला म्हाताऱ्याच्या या लवकर उठवून सर्वाना कामाला लावण्याच्या सवयीचा राग येत असे. म्हातारा त्याच्या कोंबड्याच्या आरवण्याने इतक्या पहाटे पहाटे स्वतः ही उठतो आणि इतरांना ही कामाला लावतो हे बघून एके दिवशी त्या नोकराच्या मनात येते की त्या कोंबड्याचाच काही ना काही तरी बंदोबस्त करून टाकला की मग म्हातारा सकाळी लवकर उठणार नाही व त्याच्यासह इतर नोकरांना ही उठवणार नाही व त्याला जास्त काम ही करावे लागणार नाही असा विचार करून एके दिवशी तो त्या कोंबड्याला मारून टाकतो.
म्हाताऱ्याचा कोंबडा मरण पावलेला बघून म्हाताऱ्याला खूप वाईट वाटते. कोंबडा आरवल्यामुळे रोज लवकर उठून नोकरांना कामाला लावणारा म्हातारा हा त्याचा तो कोंबडा मरण पावल्यामुळे दररोज वेळी - अवेळी उठू लागला. अवेळी उठल्यामुळे म्हाताऱ्याची कामे वेळेत न होता उशीरा होऊ लागली व त्यामुळे त्याची रोजची चिडचिड होऊ लागली.
दररोज उठल्यास उशीर होऊ लागले परिणामी म्हातारा त्याच्या नोकराला रागाने एरवीपेक्षा जास्त कामे देऊ लागला व ती कामे करता करता त्या नोकराचा संपूर्ण दिवस कसा जाई तेच त्याला कळत नसे. नोकर या दिवसभराच्या धावपळीमुळे व जास्त कामामुळे खूप दमून जाऊ लागला व शेवटी म्हाताऱ्याच्या कोंबड्याला मारल्याच्या त्याच्या हया कृत्याबद्दल त्याला स्वतः ला खूप पश्चाताप झाला.
कारण त्याच्या आळशीपणामुळे त्याने आपली कामे कमी होण्यासाठी केलेल्या हया वाईट कृत्यामुळे उलट त्याच्यावर आता दुप्पट कामे करण्याची वेळ आली होती.
तात्पर्य -
( टीप - विद्यार्थ्यांनी कथेचे शिर्षक आणि तात्पर्य आपापल्या मते योग्य असे लिहावे. )
आमचे हे कथालेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.