मराठी पत्रलेखन | विशेष सवलत दिल्याबद्दल आभार पत्र | Marathi Patralekhan | Vishesh Savlat Dilyabaddal Aabhar Patra | Letter Writing In Marathi |
![]() |
विशेष सवलत दिल्याबद्दल आभार पत्र - Marathi Patralekhan - Vishesh Savlat Dilyabaddal Aabhar Patra - Letter Writing In Marathi. |
विद्यालयासाठी विशेष सवलत दिल्याने पुस्तक विक्रेत्यांचे आभार मानणारे पत्र विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहा.
दिनांक -
प्रति,
आनंद बुक डेपो,
ना. म. जोशी मार्ग,
अकोला.
विषय - विशेष सवलत दिल्याबद्दल आभार पत्र.
महोदय,
मी कु. दीपक सावंत, सरस्वती विद्यालय येथे इयत्ता ९ वी अ मध्ये शिकणारा व माझ्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तसेच माझ्या वर्गशिक्षकांच्या परवानगीने आपल्याला हे पत्र लिहीत आहे.
पत्रास कारण की, गेल्याच आठवड्यात आपण आमच्या मागणीनुसार निबंधाची काही पुस्तके आमच्या शाळेला पाठवून दिली होती. त्यावेळी आम्ही आपणास केलेल्या विनंतीनुसार, आपण ती पुस्तके आम्हाला विशेष सवलतीच्या दरात पुरविली होती.
ती आम्हाला व्यवस्थित स्थितीत प्राप्त झालेली आहेत व त्याचमुळे आपण या सर्व पुस्तकांवर दिलेल्या विशेष सवलतीचा आम्हाला फारच फायदा झाला आहे त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने मी शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपले मनापासून आभार मानत आहे.
तसेच या पुढे ही आम्हाला जर काही पुस्तके मागावायची असल्यास आपण आम्हाला त्यावर अशीच विशेष सवलत द्याल अशी मी आशा करतो.
धन्यवाद.
प्रेषक,
कु. दीपक सावंत.
सरस्वती विद्यालय,
अकोला.
ई-मेल - [email protected]
आमचे हे पत्रलेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.