Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी पत्रलेखन - स्कूलबस सेवा बंद करण्यासाठी वर्गशिक्षकांना पत्र - School Bus Facility Band Karnyasathi Vargshikshakana Patra - Letter Writing In Marathi.

मराठी पत्रलेखन | स्कूलबस सेवा बंद करण्यासाठी वर्गशिक्षकांना पत्र | School Bus Facility Band Karnyasathi Vargshikshakana Patra | Letter Writing In Marathi |




        
मराठी पत्रलेखन - स्कूलबस सेवा बंद करण्यासाठी वर्गशिक्षकांना पत्र - School Bus Facility Band Karnyasathi Vargshikshakana Patra - Letter Writing In Marathi.
स्कूलबस सेवा बंद करण्यासाठी वर्गशिक्षकांना पत्र - School Bus Facility Band Karnyasathi Vargshikshakana Patra - Letter Writing In Marathi.


      

स्कूलबस सेवा बंद करण्यासाठी वर्गशिक्षकांना पत्र लिहा.





दिनांक -


प्रति,
सौ. साक्षी सावंत,
सरस्वती विद्यालय,
जालना.


विषय - स्कूलबस सेवा बंद करण्याबाबत. 


आदरणीय वर्गशिक्षक सावंत बाई,

मी आपल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी कु. सिद्धेश भोसले, उपस्थिती क्रमांक - ११, आज आपणास हे पत्र लिहिण्यास कारण की, गेल्या २ वर्षांपासून मी घरातून शाळेत येण्याजाण्यासाठी आपल्या शाळेतील स्कूलबस सेवेचा उपभोग घेत आहे. परंतु या वर्षीपासून मला प्रवासासाठी ही स्कूलबस सेवा बंद करायची असून या पुढे मी माझ्या पालकांबरोबर शाळेत येणार जाणार आहे.

तरी माझी आपणांस ही विनंती आहे की, कृपया आपण माझे नाव स्कूलबसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीतून काढून टाकावे जेणेकरून  कोणा अन्य गरजवंत विद्यार्थ्याला या सेवेचा लाभ घेण्यासाठी जागा रिक्त मिळू शकेल.

माझ्या हया सुरु असलेल्या स्कूलबस सेवेला बंद करावे अश्या इच्छित असल्याच्या हया पत्राच्या मागे माझ्या पालकांनी ही त्यांची हमी भरणारी स्वाक्षरी केलेली आहे.

तरी आपण लवकरात लवकर माझे नाव स्कूलबस सेवेच्या विद्यार्थ्यांच्या यादीतून काढून टाकाल अशी मी आशा करतो.

धन्यवाद.


प्रेषक,
आपला विद्यार्थी,
कु. सिद्धेश भोसले.
सरस्वती विद्यालय,
जालना.
ईमेल - [email protected]




आमचे हे पत्रलेखन तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close